Skip to content

War बद्दल बायबलमधील वचने

639 वचने · 45 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आमची त्वचा भट्टीप्रमाणे तप्त झाली आहे, कारण भुकेमुळे आम्ही तापाळलेले आहोत.

  2. स्त्रियांना सीयोनात भ्रष्ट करण्यात आले आहे, व कुमारिकांना यहूदीयातील नगरात.

  3. आमच्या अधिपतींना त्यांच्या हातांवर लटकविण्यात आले आहे; आमच्या वडीलजनांचा मान राखला जात नाही.

  4. तरुण गिरणीवर काबाडकष्ट करतात; तर किशोर लाकडाच्या भारी ओझ्यांखाली डळमळतात.

  5. वडीलजनांनी वेशीतील बैठकी सोडून दिल्या आहेत; तरुणांनी त्यांचे संगीत बंद केले आहे.

  6. “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जसे मी द्राक्षवेलीच्या लाकडाला वनातील इतर झाडांबरोबर अग्नीचे इंधन म्हणून दिले आहे, त्याचप्रमाणे यरुशलेमात राहणार्‍या लोकांशी मी वागेन.

  7. मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन. जरी ते अग्नीतून बाहेर आले, तरीही अग्नी त्यांना संपुष्टात आणेल. आणि जेव्हा मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन, तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  8. ते अविश्वासू आहेत म्हणून मी त्या देशाला ओसाड करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  9. “मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि म्हण, ‘प्रभू असे म्हणतात: “ ‘एक तलवार, एक तलवार, धार लावलेली आणि चमकविलेली;

  10. कत्तल करण्यास धार लावलेली, विजेप्रमाणे चमकणारी अशी केलेली! “ ‘माझ्या राजपुत्राच्या राजदंडामुळे आम्ही आनंद करावा काय? तलवार अशा प्रत्येक काठीला तुच्छ लेखते.

  11. “ ‘हातात धरता यावी म्हणून, तलवार चमकण्यास नेमली आहे; ती धारदार व चमकविली गेली आहे, आणि कत्तल करणार्‍याच्या हातासाठी ती तयार केली गेली आहे.

  12. हे मानवपुत्रा, मोठ्याने रड आणि विलाप कर, कारण हे माझ्या लोकांविरुद्ध आहे; ते इस्राएलच्या सर्व राजपुत्रांविरुद्ध आहे. माझ्या लोकांसहित त्यांनासुद्धा तलवारीस देण्यात आले आहे. म्हणून तू आपले ऊर बडव.

  13. “ ‘कसोटी खचितच होणार आणि तलवारीने तुच्छ लेखलेला राजदंड पुढे चालला नाही तर काय होईल? असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’

  14. “तर हे मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि तुझ्या हातावर हात मार. तलवार दोन वेळा वार करो, किंवा तीन वेळाही चालेल. ही तलवार कत्तल करण्यासाठी; तलवार जी मोठ्या वधासाठी आहे, जिने त्यांना चहूकडून घेरले आहे.

  15. म्हणजे त्यांची हृदये भीतीने पाणी पाणी होतील आणि पुष्कळ पडतील, कत्तल करण्यासाठीच ही तलवार त्यांच्या सर्व फाटकांवर मी नेमली आहे. पाहा! विजेसारखा वार करण्यास ती बनविली गेली आहे, हत्येसाठी ती उपसली गेली आहे.

  16. अगे तलवारी, उजवीकडे वार कर, मग डावीकडे वार कर, जिथे तुझे पाते फिरेल तिथे वार कर.

  17. मी सुद्धा माझा हात हातावर मारीन, आणि माझा क्रोध शांत होईल. मी याहवेह हे बोललो आहे.”

  18. “म्हणून, हे ओहोलीबाह, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या तुझ्या प्रियकरांपासून तू तिरस्काराने दूर झालीस त्यांना मी तुझ्याविरुद्ध भडकवीन, प्रत्येक बाजूंनी मी त्यांना तुझ्याविरुद्ध आणेन;

  19. बाबेल व खास्द्यांचे लोक, पकोड, शोआ व कोआतील पुरुष आणि त्यांच्यासह सर्व अश्शूरी, सुंदर तरुण पुरुष, त्यांचे राज्यपाल आणि सरदार, रथ अधिकारी, उच्च पदाधिकारी व घोडेस्वार.

  20. हत्यारे, रथ व गाडे व लोकांचा घोळका घेऊन ते तुझ्याविरुद्ध येतील; ते सर्व बाजूंनी तुझ्याविरुद्ध मोठ्या व लहान ढाली आणि शिरटोप घालून तुझ्याविरुद्ध येतील. तुला शिक्षा करावी म्हणून मी तुला त्यांच्या हाती देईन आणि त्यांच्या मापदंडानुसार ते तुला शिक्षा करतील.

  21. मी आपला ईर्षायुक्त क्रोध तुझ्यावर आणेन आणि संतापाने ते तुझ्याशी वागतील. ते तुझे नाक व कान कापतील आणि तुझ्यातील मागे राहिलेले ते तलवारीने पडतील आणि त्यातूनही जे वाचतील ते अग्नीने भस्म होतील.

  22. “त्यांना असे सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या जीविताची शपथ, जे ओसाडीमध्ये उरलेले आहेत ते तलवारीने पडतील, जे शहराच्या बाहेर आहेत त्यांना जंगली जनावरांनी खावे म्हणून मी देऊन टाकेन, आणि जे गडात व गुहेत आहेत ते मरीने मरतील.

  23. “मानवपुत्रा, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: प्रत्येक प्रकारच्या पक्ष्यांना आणि हिंस्र पशूंना बोलावून सांग: ‘एकवट व्हा आणि जो यज्ञ, एक मोठा यज्ञ मी इस्राएलच्या पर्वतांवर तयार करीत आहे त्यासाठी चहूकडून एकत्र या. तिथे तुम्ही मांस खाल व रक्त प्याल.

  24. तुम्ही बलवान पुरुषांचे मांस खाल व पृथ्वीच्या राजपुत्रांचे रक्त प्याल, जणू ते बाशानातील पोसलेले सर्व प्राणी म्हणजेच मेंढे व कोकरे, बोकडे व वासरे आहेत.

  25. जो यज्ञ मी तुम्हासाठी तयार करीत आहे, त्यात तृप्ती होईपर्यंत तुम्ही चरबी खाल व पिऊन मस्त होईपर्यंत रक्त प्याल.