मुख्य मजकुरावर जा

War बद्दल बायबलमधील वचने

639 वचने · 45 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. घोड्यांवर खोगीर चढवा, आणि अश्वारूढ व्हा! शिरस्त्राण घालून मोर्चा बांधा! भाल्यांना धार लावा, व चिलखते चढवा!

  2. मी हे काय पाहात आहे? ते भयभीत झालेले आहेत, ते माघार घेत आहेत, त्यांचे योद्धे पराजित झाले आहेत. मागे वळूनदेखील न पाहता ते घाईघाईत पळत आहेत, आणि सर्वत्र आतंक पसरला आहे,” याहवेह जाहीर करतात.

  3. “चपळ सैनिक पळू शकत नाहीत. वा बलाढ्य निसटून शकत नाहीत. उत्तरेकडे फरात नदीकाठी ते अडखळून पडत आहेत.

  4. “नाईल नदीसारखा हा कोण उभारून येत आहे, पाण्याने उफाळणार्‍या नदीसारखा हा कोण आहे?

  5. इजिप्त नाईल नदीसारखी उभारून येत आहे, पाण्याने उफाळणार्‍या नदीसारखी. ती म्हणते, ‘मी उभारेन व पृथ्वी व्यापून टाकेन; मी नगरांना व त्यांच्या लोकांना नष्ट करेन.’

  6. अश्वांनो, तुम्ही हल्ला करा! सारथ्यांनो, तुम्ही आवेशाने धाव घ्या! योद्ध्यांनो—पूट व कूश या प्रांतातील ढालधारक, लूदीमवासी बाण जे सोडतात, ते तुम्ही सर्वजण पुढे कूच करा!

  7. कारण हा दिवस प्रभू, सर्वसमर्थ याहवेहचा आहे— हा सूड उगविण्याचा, त्यांच्या शत्रूंवर सूड उगविण्याचा दिवस आहे. रक्त पिऊन तिची तृप्ती होईपर्यंत तलवार तृप्त होईपर्यंत गिळंकृत करीत राहील. कारण प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, उत्तरेकडील फरात नदीकाठील प्रदेशात यज्ञार्पण करणार.

  8. “हे इजिप्तच्या कुमारिके, वर गिलआदामध्ये जाऊन औषध आण. तुझे घाव बरे व्हावे म्हणून तू अनेक औषधे वापरलीस, पण तुझे घाव बरे करेल असे औषधच नाही.

  9. राष्ट्रे तुझ्या लज्जेची वार्ता ऐकतील; तुझ्या आक्रोशाने संपूर्ण पृथ्वी भरेल. तुझे योद्धे परस्परांवर अडखळून पडतील; दोघेही एकमेकांसोबत एकत्र पडतील.”

  10. तुमचे योद्धे कोलमडून का पडले? ते उभे राहू शकत नाहीत, कारण याहवेहने त्यांना खाली ढकलले आहे.

  11. ते पुन्हापुन्हा अडखळतील; ते एकमेकांवर कोसळून पडतील. ते म्हणतील, ‘चला, उठा, आपल्या लोकांकडे व आपल्या जन्मभूमीत आपण परत जाऊ, या छळवाद्यांच्या तलवारीपासून दूर जाऊ.’

  12. तिथे ते उद्गारतील, ‘इजिप्तचा राजा फारोह होफ्रा व्यर्थ गोंगाट करणारा मनुष्य आहे; त्याने त्याला मिळालेली सुसंधी घालविली.’

  13. तिच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक एखाद्या धष्टपुष्ट वासरांसारखे झाले आहेत. तेही वळून एकत्र पलायन करतील, ते भूमीवर टिकाव धरू शकणार नाही, कारण त्यांच्यावरील संकटाचा दिवस जवळ येत आहे, त्यांना शिक्षा मिळण्याचा हा समय आहे.

  14. At the noise of the stamping of the hoofs of his strong horses, at the rushing of his chariots, and at the rumbling of his wheels, the fathers shall not look back to their children for feebleness of hands;

  15. “ ‘हाय रे, याहवेहच्या तलवारी, तू पुन्हा केव्हा विसावा घेणार? जा! आपल्या म्यानात परत जा; शांत राहा व स्तब्ध हो.’

  16. परंतु जर याहवेहने तिला आज्ञा दिली आहे, तर ती स्वस्थ कशी बसेल, त्यांनीच तिला आदेश दिला आहे ना अष्कलोन व समुद्राकाठी राहणार्‍यांवर हल्ला कर?”

  17. “याहवेहने सोपविलेले कार्य आळशीपणाने करणारा शापित असो! रक्तपात न करता तलवार म्यानात ठेवणारे शापित असो!

  18. मोआबभूमीच्या रहिवाशांनो आपली नगरे सोडा आणि खडकांच्या कपारीत जाऊन राहा. गुहेच्या तोंडाशी घरी बांधणाऱ्या पारव्याप्रमाणे व्हा.

  19. मोआबभूमीच्या मळ्यामधून व शेतातून आनंद व हर्ष लयास गेले आहेत. द्राक्षकुंडातून द्राक्षारसाचा प्रवाह मी बंद केला आहे; हर्षनाद करून द्राक्षे तुडविणारा कोणी नाही. ओरडणे आहे, होय पण ते आनंदाचे नाही.

  20. तुझ्या सर्व बाजूने मी तुझ्यावर भयंकर अनर्थ आणेन, असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. तुझ्यातील प्रत्येकजण देशोघडीला लागेल, त्या फरारी लोकांना एकत्र करण्यास तिथे कोणीही नसेल.

  21. याहवेहने आपले शस्त्रागार उघडले व आपल्या क्रोधाचा स्फोट करण्यासाठी शस्त्रे बाहेर काढली, कारण सार्वभौम सर्वसमर्थ याहवेहस बाबेलच्या भूमीवर कार्य करावयाचे आहे.

  22. बाबिलोनचे योद्धे युद्ध करण्याचे थांबले आहेत; ते त्यांच्या गडात बसून आहेत. त्यांचे सामर्थ्य संपुष्टात आले आहे; ते दुर्बल झाले आहेत. तिचे आवास जळत आहेत; तिच्या प्रवेशद्वाराच्या सळया मोडल्या आहेत.

  23. बाबेलच्या राजाला वर्तमान सांगण्यासाठी, की त्याचे संपूर्ण नगर हस्तगत करण्यात आले आहे, संदेशवाहक एका पाठोपाठ धावत आहेत निरोपे एका पाठोपाठ येत आहेत,

  24. नदीवरील पूल जप्त करण्यात आले आहेत, दलदली जळत आहेत, सैन्य भयभीत झाले आहेत.”

  25. कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “बाबेलची कन्या अशा खळ्याप्रमाणे आहे जिची तुडवणी सुरू होण्याची वेळ आली आहे; तिचे पीक घेण्याचा समय लवकरच येणार आहे.”