मुख्य मजकुरावर जा

War बद्दल बायबलमधील वचने

639 वचने · 45 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह म्हणाले, “कारण माझ्या लोकांनी माझ्या आज्ञांचा त्याग केला, जे मी त्यांच्यापुढे ठेवले होते; त्यांनी मला अनुसरण केले नाही व माझ्या नियमाचे पालन केले नाही.

  2. याउलट ते हट्टीपणाने मनाला येईल तसे वागले, आणि त्यांच्या पूर्वजांनी शिकविल्याप्रमाणे त्यांनी बआलच्या मूर्तीचे अनुसरण केले.”

  3. म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “पाहा, मी त्यांना कडू अन्न खावयास घालेन आणि विषारी पाणी प्यावयास देईन.

  4. जे त्यांच्या पूर्वजांना माहीत नाही, अशा देशात मी त्यांची पांगापांग करेन, तिथे सुद्धा त्यांचा पूर्ण नायनाट करेपर्यंत माझी तलवार त्यांची पाठ सोडणार नाही.”

  5. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “विचार करा! आक्रंदन करणार्‍या स्त्रियांना बोलवा; त्यामधून कुशल अशा स्त्रियांना पाठवा.

  6. त्यांना त्वरित येऊ द्या आणि आमच्यासाठी आक्रोश करतील व आमच्या डोळ्यातून अश्रू वाहतील आणि डोळ्याच्या पापण्या धारा काढतील.

  7. सीयोनातून आक्रंदन ऐकू येत आहे: ‘आमचा किती सत्यानाश झाला आहे! आमच्यावर घोर लज्जा आली आहे! आम्ही आमचा देश सोडून गेले पाहिजे कारण आमच्या घरांची पडझड झाली आहे.’ ”

  8. आता स्त्रियांनो, याहवेहचे शब्द ऐका! त्यांच्या मुखातील शब्द ऐकण्यासाठी तुमचे कान उघडा. तुमच्या कन्यांना विलाप करण्यास शिकवा; एकमेकींना आकांत करण्यास शिकवा.

  9. कारण तुमच्या खिडक्यातून मरणाचा शिरकाव झाला आणि त्याने आमच्या गडात प्रवेश केला आहे; त्याने रस्त्यांवरून बालकांना आणि तुमच्या तरुणांना चौकातून काढून घेतले आहे.

  10. माझा तंबू धुळीला मिळाला आहे; त्याच्या सर्व दोऱ्या तुटल्या आहेत. माझी मुले माझ्यापासून दूर गेली आहेत आणि नाहीशी झाली आहेत; माझा तंबू उभारण्यासाठी कोणीही राहिले नाही, माझे निवासस्थान पुन्हा बांधण्यास कोणीही नाही.

  11. “मी माझ्या लोकांचा त्याग करेन, माझ्या वारसांचा परित्याग करेन; माझ्या अतिप्रियजनांना मी त्यांच्या शत्रूंच्या हवाली करेन.

  12. उजाड वाळवंटाच्या टोकांवर संहार करणारे झुंडीने येतील, कारण याहवेहची तलवार भूमीला गिळून टाकेल, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कोणीही सुरक्षित राहणार नाही.

  13. ते सर्व एकमेकांना विरोध करतील, आईपिता व मुलेदेखील एकमेकांना चिरडतील असे मी करेन, त्यांचा सर्वनाश होईल. मी त्यांची मुळीच गय करणार नाही व त्यांना दयामाया दाखविणार नाही, असे याहवेह जाहीर करतात.’ ”

  14. म्हणून माझ्या नावाने भविष्यवाणी करणार्‍यांबद्दल याहवेह असे म्हणतात: “मी पाठविले नसतानाही ‘तलवार किंवा दुष्काळ या भूमीला स्पर्श करणार नाही,’ असे बोलणारे हे संदेष्टेच तलवारीला व दुष्काळाला बळी पडतील.

  15. नगराबाहेर जाऊन पाहावे तर, मी तलवारीला बळी पडलेल्यांची प्रेते बघतो; नगरातून गेलो तर उपासमारीला बळी पडलेले दिसतात. संदेष्टे व याजक त्यांना माहीत नसलेल्या देशात गेले आहेत.’ ”

  16. मी त्यांच्या विधवांची संख्या समुद्राच्या वाळूपेक्षा अगणित करेन. मी त्यांच्या तरुणांच्या आईविरुद्ध भर दुपारी मृत्यूचा विनाशक पाठवेन; अचानक त्यांच्यावर वेदना आणि क्लेश ओढवतील,

  17. सात मुलांची माता बेशुद्ध होऊन मृत्युमुखी पडेल. भरदिवसा तिचा सूर्य मावळेल; आता ती अपमानित आणि लज्जित होऊन बसेल. त्यातून वाचलेल्यांना त्यांच्या वैर्‍यांसमक्ष मी तलवारीस बळी देईन,” याहवेहने असे जाहीर करतात.

  18. म्हणून त्यांच्या मुलांना दुष्काळामध्ये जाऊ द्या; त्यांना तलवारीच्या बलाच्या स्वाधीन करा. त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होऊ द्या; त्यांचे पुरुष मृत्यू पावोत, व त्यांचे तरुण लढाईत तलवारीने मारले जावोत.

  19. “ ‘या ठिकाणी यहूदीया व यरुशलेम यांच्या योजना मी उधळून लावेन. मी त्यांच्या शत्रूच्या समक्ष तलवारीने त्यांचा वध करेन, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात, आणि मी त्यांची प्रेते पक्ष्यांना आणि हिंस्र पशूंना खावयास देईन.

  20. मी या नगराचा नाश करेन आणि ते दहशतीचे व आणि घृणेचे ठिकाण बनवीन; त्याच्या जवळून जाणारा कोणीही त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील.

  21. मी त्यांना त्यांच्या पुत्र आणि कन्यांचे मांस खाण्यास लावेन, आणि त्यांचे शत्रू त्यांच्या सभोवतीच्या वेढ्याने त्यांच्यावर एवढा दबाव आणतील की ते एक दुसऱ्याचे मांस खातील.’

  22. त्या दिवशी याहवेहने वधलेल्या लोकांनी पृथ्वी व्यापून जाईल—त्यांच्यासाठी कोणीही विलाप करणार नाही, अथवा मूठमाती देण्यासाठी त्यांची प्रेते कोणी गोळा करणार नाही. ते भूमीवर शेणाप्रमाणे पडून राहतील.

  23. जे राष्ट्र बाबेलच्या राजाला अधीन होणार नाही, त्यांना याहवेहने देऊ केलेल्या युद्ध, दुष्काळ व मरी यांनी तू आणि तुझे लोक का मरावे?

  24. तुझ्या आणि माझ्या आधी जे संदेष्टे होऊन गेले, ज्यांनी युद्ध, विनाश व मरी याविषयी अनेक राष्ट्रांना व शक्तिशाली राज्यांना संदेश दिला.

  25. “तुमच्या ढाली सिद्ध करा, लहान व मोठ्या अशा दोन्ही, आणि लढाईसाठी कूच करा!