Skip to content

War बद्दल बायबलमधील वचने

639 वचने · 45 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या दिवशी इजिप्तचे लोक दुर्बल होतील. सर्वसमर्थ याहवेहनी त्यांच्याविरुद्ध उगारलेल्या हाताच्या धाकामुळे ते घाबरून थरकापतील.

  2. सार्वभौम याहवेह, इस्राएलचे पवित्र परमेश्वर असे म्हणतात: “पश्चात्ताप आणि विश्रांती करणे हेच तुमचे तारण आहे, शांतता राखणे आणि विश्वास ठेवणे यामध्ये तुमचे सामर्थ्य आहे, परंतु यापैकी तुम्हाकडे काहीही नसेल.

  3. तुम्ही असे म्हणाला की, ‘नाही, आम्ही घोड्यांवर स्वार होऊन पळून जाऊ.’ म्हणून तुम्ही पळून जाल! तुम्ही असे म्हणाला, ‘आम्ही वेगवान घोड्यांवर स्वार होऊ.’ म्हणून तुमचे पाठलाग करणारे चपळ होतील!

  4. जोपर्यंत तुम्हाला डोंगराच्या शिखरावर असलेल्या ध्वजस्तंभाप्रमाणे, टेकडीवर लावलेल्या पताक्याप्रमाणे सोडून दिले जात नाही तोपर्यंत एका व्यक्तीच्या धमकीने एक हजार लोक पळून जातील; पाच जणांच्या धमकीने तुम्ही सर्वजण पळून जाल.”

  5. आणि माझ्या लोकांच्या भूमीसाठीही कारण शेतात सर्वत्र काटेकुसळे व झुडपे वाढतील— होय, आनंदोत्सव करणाऱ्या तुमच्या घरांसाठी, व चैनबाजी करणार्‍या या शहरांसाठी विलाप करा.

  6. गडाचा त्याग करण्यात येईल, गजबजलेली शहरे रिकामी होतील; किल्ले व टेहळणी बुरूज कायमची पडीक स्थाने होतील, जिथे रानगाढवांचे व शेरडेमेंढरांचे कळप आनंदात चरतील,

  7. नगरातील महामार्ग निर्जन झाले आहेत, रस्त्यावर कोणी प्रवासी नाहीत. करार मोडला आहे, त्याचे साक्षीदार तुच्छ झाले आहेत, कोणाचाही आदर केल्या जात नाही.

  8. भूमी शुष्क होत आहे आणि ओसाड झाली आहे, लबानोन शरमिंदा झाला आहे आणि कोमेजला आहे; शारोनची कुरणे अरबी वाळवंटसारखी झाली आहेत, आणि बाशान व कर्मेल त्यांची पाने गळून पडत आहेत.

  9. याहवेह सर्व राष्ट्रांवर रागावले आहेत; त्यांचा क्रोध सर्व सैन्यांवर आला आहे. ते त्यांचा संपूर्णपणे नाश करतील, ते त्यांना वध करणाऱ्यांकडे सोपवून देतील.

  10. त्यांच्या वधलेल्यांना बाहेर फेकून देण्यात येईल, त्यांच्या मृतदेहांना दुर्गंधी येईल; पर्वत त्यांच्या रक्ताने भिजून जातील.

  11. आकाशातील सर्व तारे विरघळून जातील आणि आकाशे चर्मपत्राच्या गुंडाळीसारखे गुंडाळले जातील; द्राक्षवेलावरील कोमेजलेल्या पानांप्रमाणे, अंजिराच्या झाडावरील सुकून गेलेल्या अंजिरांप्रमाणे सर्व तारांगण गळून पडतील.

  12. माझी तलवार आकाशांमध्ये पिऊन तृप्त झाली आहे. पाहा, एदोमावर न्यायनिवाडा करण्यासाठी ती उतरत आहे, त्या लोकांचा मी संपूर्णपणे नाश केला आहे.

  13. याहवेहच्या तलवारीने रक्तात आंघोळ केली आहे, ती चरबीने झाकलेली आहे— कोकरे आणि शेळ्यांचे रक्त, मेंढ्यांच्या मूत्रपिंडाच्या चरबीने ती झाकली आहे. कारण याहवेहसाठी बस्रा येथे अर्पणे आणि एदोम देशात मोठे यज्ञबली केले आहेत.

  14. आणि त्यांच्याबरोबर रानबैल आणि गोर्‍हे व मोठे बैल यज्ञात पडतील. त्यांची भूमी रक्ताने चिंब भिजून जाईल, आणि धूळ चरबीमध्ये पूर्ण भिजली जाईल.

  15. कारण याहवेहकडे सूड घेण्याचा एक दिवस आहे, सीयोनला पाठिंबा देण्यासाठी शिक्षा देणारे वर्ष.

  16. एदोम येथील प्रवाह मैदानासारखे होतील, तिची धूळ जळत्या गंधकात बदलली जाईल. तिची भूमी धगधगते मैदान होईल!

  17. रात्री किंवा दिवसा ते विझविले जाणार नाही. त्याचा धूर कायमचा उठत राहील. पिढ्यान् पिढ्या ते ओसाड पडून राहील. यामधून पुन्हा कोणीही प्रवास करणार नाही.

  18. ससाणे आणि साळू त्याचा ताबा घेतील; मोठी घुबडे आणि डोमकावळे तिथे घरटी बांधतील. कारण परमेश्वराने एदोमच्या भूमीवर मापनदोरी ताणली आहे आणि नाशाचा ओळंबा लावला आहे.

  19. तिच्या उच्चकुलीन लोकांना त्या ठिकाणी राज्य असे काहीही राहणार नाही, तिचे सर्व राजपुत्र नाहीसे होतील.

  20. काट्यांनी तिचे किल्ले व्यापून टाकले जातील, जंगली झाडे आणि रानटी काटेरी झुडूपे तिचे गड ग्रासून टाकतील. कोल्ह्यांना संचार करण्याची ती जागा होईल, घुबडांचे घर होईल.

  21. वाळवंटातील श्वापद तरसांना भेटतील, आणि रानबोकडे एकमेकांना साद घालतील; तिथे निशाचरही झोपतील आणि त्यांना विश्रांतीच्या जागा मिळतील.

  22. तिथे घुबड घरटे बांधून अंडी घालेल, ती तिच्या पंखाच्या सावलीत त्यांना उबवेल आणि पिलांची काळजी घेईल; तिथे प्रत्येक बाज पक्षीही आपल्या जोडीदारासह जमतील.

  23. म्हणूनच मी तुमच्या मंदिराच्या अधिपतींची मानहानी केली; मी याकोबाला विध्वंसाच्या हवाली केले व इस्राएलला तिरस्कारास्पद केले.

  24. मीच प्रकाश व अंधकार निर्माण करतो. मीच कल्याण व अरिष्ट आणतो, या सर्व गोष्टी करणारा याहवेह मीच आहे.

  25. ओसाडी आणि विध्वंस, दुष्काळ आणि तलवार ही दुप्पट अरिष्टे तुझ्यावर आली आहेत— कोण तुझे सांत्वन करू शकेल? कोण तुझे दुःखपरिहार करू शकेल?