Skip to content

War बद्दल बायबलमधील वचने

639 वचने · 45 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दिबोन येथील लोक त्यांच्या उच्च स्थानावरील, मंदिरात विलाप करण्यासाठी जात आहेत; नबो आणि मेदबासाठी मोआब आक्रोश करीत आहे. प्रत्येकाच्या डोक्यावरील केस आणि दाढी काढलेली आहे.

  2. रस्त्यांवर ते गोणपाट घालतात; छतावर आणि सार्वजनिक चौकांमध्ये ते सर्व आक्रोश करतात, विलाप करीत पालथे पडतात.

  3. हेशबोन आणि एलिआलेह रडतात, त्यांचा आक्रोश दूरवर याहसपर्यंत ऐकू येतो. म्हणून मोआबचे सशस्त्र लोक आक्रोश करतात, आणि त्यांची अंतःकरणे दुर्बल झाली आहेत.

  4. माझे मन मोआबसाठी रडते; तिचे पलायन केलेले लोक सोअरपर्यंत, एग्लाथ-शलीशियापर्यंत पळतात. ते लुहिथकडे टेकडीवर जातात, जाताना ते विलाप करतात; होरोनाईमच्या वाटेवर ते त्यांच्या नाशासाठी विलाप करतात.

  5. निम्रीमचे सर्व पाणी आटून गेले आहे आणि गवत करपून गेले आहे; वनस्पती सुकून गेली आहे; आणि हिरवळीसारखे काहीही उरले नाही.

  6. म्हणून त्यांनी मिळवलेली आणि साठविलेली संपत्ती ते वाळुंजाच्या खोऱ्यापलीकडे घेऊन जातात.

  7. त्यांच्या आक्रोशाचे प्रतिध्वनी मोआबच्या सीमेपर्यंत येतात. त्यांचे आक्रंदन एग्लाइमपर्यंत पोहोचते, त्यांचा विलाप बीर एलिमपर्यंत पोहोचतो.

  8. दिमोनाचे पाणी रक्ताने भरलेले आहे, परंतु मी दिमोनवर आणखी विपत्ती आणेन— मोआबच्या पलायन केलेल्या लोकांवर आणि देशातील अवशिष्ट लोकांवर मी सिंह पाठवेन.

  9. म्हणून सिबमाहच्या द्राक्षवेलींसाठी याजेरसह मीही रडतो. हेशबोन आणि एलिआलेह, मी तुम्हाला अश्रूंनी भिजवितो! तुमच्या पिकलेल्या फळांसाठी आणि तुमच्या कापणीच्या आनंदाचा जयघोष शांत झाला आहे.

  10. फळबागेतून आनंद आणि हर्ष काढून घेतला आहे; द्राक्षमळ्यात कोणीही गाणे गात नाही किंवा हर्षनाद करत नाही; कोणीही द्राक्षकुंडातून द्राक्षारस काढीत नाही, कारण मी हर्षनाद करणे संपवून टाकले आहे.

  11. डोंगरावरील हिंस्र पक्ष्यांसाठी आणि वन्यप्राण्यांसाठी, भक्ष्य म्हणून त्या सर्वांना तिथेच सोडले जाईल; संपूर्ण उन्हाळ्यात पक्षी त्यांचे भक्षण करतील, आणि संपूर्ण हिवाळ्यात वन्यप्राणी त्यांचे भक्षण करतील.

  12. “मी इजिप्तच्या लोकांना इजिप्तच्या लोकांविरुद्ध चिथावेन— भाऊ भावाविरुद्ध लढेल, शेजारी शेजार्‍याविरुद्ध, शहर शहराविरुद्ध, राज्य राज्याविरुद्ध.

  13. इजिप्तच्या लोकांचे हृदय खचून जाईल, आणि मी त्यांच्या योजना विफल करेन; मूर्तींबरोबर आणि मृतात्म्यांबरोबर, माध्यमांशी आणि भूतविद्या करणाऱ्यांशी ते सल्लामसलत करतील.

  14. मी इजिप्तच्या लोकांना क्रूर धन्याच्या सत्तेच्या स्वाधीन करेन, आणि एक भयंकर राजा त्यांच्यावर राज्य करेल,” असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.

  15. नदीचे पाणी वाळून जाईल, आणि नदीचे पात्र कोरडे आणि शुष्क होईल.

  16. कालव्यांना दुर्गंधी येईल; मिसरचे झरे ओसरतील आणि कोरडे होतील. लव्हाळे आणि वेळू सुकून जातील,

  17. तसेच नाईल नदीच्या काठावरील, नदिमुखावरील झाडेसुद्धा, नाईल नदीच्या काठावर पेरणी केलेले प्रत्येक शेत कोरडे होईल व उडून नाहीसे होईल.

  18. जे नाईल नदीत आकड्या टाकतात, ते सर्व कोळीसुद्धा रडतील आणि विलाप करतील; जे पाण्यावर जाळे टाकतात ते झुरणीस लागतील.

  19. जे तागाच्या सूतकताईचे काम करतात ते निराश होतील, विणकर आशा हरवतील.

  20. कापडकामाचे कारागीर उदास होतील, आणि सर्व मजुरी करणाऱ्यांची अंतःकरणे रोगट होतील.

  21. सोअन येथील अधिकारी निरुपयोगीच नाहीत तर मूर्ख आहेत; फारोह राजाचे शहाणे सल्लागार निरर्थक सल्ला देतात. तुम्ही फारोहला कसे म्हणू शकता, “ज्ञानी लोकांपैकी एक मी आहे, प्राचीन राजांचा मी एक शिष्य आहे?”

  22. आता तुमची ज्ञानी माणसे कुठे आहेत? त्यांनी तुम्हाला दाखवावे किंवा तुमच्यापुढे यावे आणि माहीत करून द्यावे, कि सर्वसमर्थ याहवेह यांनी इजिप्तविरुद्ध काय योजना केली आहे.

  23. सोअनचे अधिकारी मूर्ख बनले आहेत, मेम्फीसच्या पुढाऱ्यांची फसवणूक झाली आहे; तिच्या लोकांच्या कोनशिलांनी इजिप्तला भरकटून टाकले आहे.

  24. याहवेहनी त्यांच्यामध्ये भोंवळ येण्याचा आत्मा ओतला आहे; त्यामुळे इजिप्तच्या सर्व कामात ती लटपटते, जसा मद्यपी, त्याने केलेल्या ओकारी भोवती फिरतो.

  25. इजिप्त काहीही करू शकत नाही— मस्तक किंवा शेपूट, वर झावळ्याची शाखा किंवा खालील लव्हाळे.