मुख्य मजकुरावर जा

War बद्दल बायबलमधील वचने

639 वचने · 45 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही जे एका घरानंतर दुसरे घर बांधता, आणि जोपर्यंत जागा संपत नाही शेताला शेत जोडून घेतात, आणि मग त्या भूमीवर तुम्ही एकटेच राहता, त्यांना धिक्कार असो.

  2. म्हणूनच याहवेहचा क्रोध त्यांच्या लोकांविरुद्ध भडकला आहे; त्यांनी हात उगारला आहे आणि ते त्यांना मारून टाकतात. पर्वत डगमगतात, आणि मृतदेह रस्त्यांवर कचऱ्यासारखे पडलेले आहेत. हे सर्व करूनही, त्यांचा क्रोधाग्नी अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.

  3. दूरवरच्या राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उंचावतात, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जे आहेत, त्यांना ते शिट्ट्या वाजवून बोलवितात. हे बघा ते आले, तत्काळ आणि वेगाने!

  4. त्यांच्यापैकी एकजणसुद्धा थकत नाही किंवा अडखळत नाही, एकजणसुद्धा डुलकी घेत नाही किंवा झोपत नाही; एकाही कमरेचा पट्टा सैल केलेला नाही, एकाही चप्पलेचा पट्टा तुटलेला नाही.

  5. त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत, त्यांच्या सर्व धनुष्यांच्या तारा ताणून तयार आहेत; त्यांच्या घोड्यांचे खूर गारगोटी सारखे वाटतात, त्यांच्या रथाची चाके वावटळीसारखी दिसतात.

  6. त्यांची गर्जना एखाद्या सिंहासारखी आहे, तरुण सिंहाप्रमाणे ते गर्जना करतात; ते गुरगुरतात व त्यांचे सावज पकडतात, आणि ते घेऊन जातात तेव्हा कोणीही सोडविण्यास येत नाही.

  7. त्या दिवशी ते त्याच्यावर समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करतील. आणि जर कोणी भूमीकडे पाहिले तर, तिथे फक्त अंधार आणि संकट आहे; ढगांमुळे सूर्यदेखील काळवंडेल.

  8. नंतर मी म्हणालो, “हे प्रभू, आणखी किती वेळ?” आणि त्यांनी उत्तर दिले: “शहरे जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाहीत आणि तिथे कोणी लोक राहिले नाहीत, घरे ओसाड पडत नाहीत आणि शेतांची नासाडी होत नाही आणि ती उद्ध्वस्त होत नाहीत तोपर्यंत.

  9. याहवेह सर्व लोकांना दूर पाठवून देईपर्यंत आणि देशाचा पूर्णपणे त्याग केला जाईपर्यंत.

  10. लढाईत वापरलेले प्रत्येक योद्ध्याची पायतणे आणि रक्ताने माखलेले प्रत्येक वस्त्र जळण्यासाठी पूर्वनियोजित केले जाईल, जाळण्यासाठी इंधन असे होईल.

  11. प्रभूंनी याकोबाविरुद्ध संदेश पाठवला आहे; तो इस्राएलवर पडेल.

  12. सर्व लोकांना ते माहीत होईल— एफ्राईम आणि शोमरोन येथील नागरिक— जे अभिमानाने आणि अंतःकरणाच्या उद्धटपणाने असे म्हणतात,

  13. “विटा खाली पडल्या आहेत, परंतु आम्ही ते घडविलेल्या दगडाने पुन्हा बांधू; उंबराची झाडे कापली गेली आहेत, परंतु आम्ही त्यांच्या जागी देवदारू लावू.”

  14. परंतु याहवेहनी रसीनच्या शत्रूंना त्यांच्याविरुद्ध बळकट केले आहे आणि त्यांच्या शत्रूंना प्रेरित केले आहे.

  15. पूर्वेकडून अरामी आणि पश्चिमेकडील पलिष्टींनी इस्राएलला मोठा आ वासून गिळंकृत केले आहे. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.

  16. सर्वसमर्थ याहवेहच्या क्रोधाने भूमी होरपळून जाईल आणि लोक त्या आगीचे इंधन होतील; ते एकमेकांना वाचविणार नाहीत.

  17. उजव्या बाजूला असलेले ते फस्त करतील परंतु ते भुकेले राहतील; डाव्या बाजूला असलेलेही खातील परंतु समाधानी होणार नाहीत. प्रत्येकजण स्वतःच्याच संततीचे मांस खातील:

  18. मनश्शेह एफ्राईमला आणि एफ्राईम मनश्शेहला खाऊन टाकेल; ते एकत्र मिळून यहूदीयाच्या विरोधात जातील. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.

  19. ज्यांना मी युद्धासाठी सुसज्ज केले आहे, त्यांना मी आज्ञा दिली आहे. जे माझ्या विजयाचा आनंद करीत आहेत— मी माझा क्रोध अंमलात आणण्यासाठी त्या माझ्या योद्ध्यांना पाचारण केले आहे.

  20. ऐका, डोंगरावरील एक आवाज, मोठ्या लोकसमुदायासारखा आवाज! ऐका, राज्यांमध्ये चालू असलेला गोंधळ, राष्ट्रे एकत्र जमत असल्यासारखा आवाज! सर्वसमर्थ याहवेह, युद्धासाठी सैन्य जमा करीत आहेत.

  21. पाहा, याहवेहचा दिवस येत आहे —एक कठोर दिवस, क्रोधाचा आणि घोर संतापाचा— भूमी उजाड करण्यासाठी आणि तेथील पापी लोकांचा नाश करण्यासाठी.

  22. जो कोणी पकडला जाईल, त्याला आरपार खुपसले जाईल. जे सर्व पकडले गेले, ते तलवारीने मारले जातील.

  23. त्यांची बालके त्यांच्या डोळ्यासमोर आपटून, त्यांचे तुकडे केले जातील; त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रियांचा विनयभंग केला जाईल.

  24. परंतु तुला तुझ्या कबरेतून नको असलेल्या फांदीसारखे बाहेर टाकले आहे; ज्यांना तलवारीने भोसकून टाकले, जे दगडांच्या खड्ड्यात टाकण्यात येतात, ज्याप्रकारे माणसांची प्रेते पायाखाली तुडविली जातात तसे त्यांना तुमच्यावर झाकून टाकले आहे.

  25. मोआब देशाविरुद्ध भविष्यवाणी: मोआब येथील आर शहर उद्ध्वस्त झाले आहे, एका रात्रीत ते नष्ट झाले आहे! मोआबातील कीर शहर उद्ध्वस्त झाले आहे, एका रात्रीत ते नष्ट झाले आहे!