Skip to content

Temptation बद्दल बायबलमधील वचने

346 वचने · 52 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. असे होऊ नये की, तू तुझा मान दुसर्‍यांना द्यावा आणि तुझी प्रतिष्ठा क्रूर मनुष्याला मिळावी,

  2. तुझ्या संपत्तीवर अपरिचित लोक मेजवानी करू नये आणि तुझ्या परिश्रमाने दुसर्‍याचे घर समृद्ध होऊ नये.

  3. तुझ्या जीवन अंती, जेव्हा तुझे मांस आणि शरीर झिजून जाईल तेव्हा तू दुःखाने विव्हळशील.

  4. तू म्हणशील, “अरेरे! मी शिस्तीचा किती तिरस्कार केला! माझ्या अंतःकरणाने सुधारणा कशी फेटाळून लावली!

  5. मी माझ्या शिक्षकांचे आज्ञापालन करत नसे किंवा मला मार्गदर्शन करणार्‍यांकडे मी कानाडोळा करीत असे.

  6. आणि म्हणून लवकरच मी परमेश्वराच्या लोकांच्या सभेपुढे गंभीर अडचणीत आलो.”

  7. तुझ्या स्वतःच्याच टाकीतील पाणी पी. तुझ्या स्वतःच्या विहिरीतील वाहते पाणी पी.

  8. तुझे पाण्याचे झरे भरून रस्त्यांवर वाहून जावेत काय, तुझे पाण्याचे प्रवाह भर चौकात वाहावेत काय?

  9. ते फक्त तुझ्यासाठीच असावेत, अनोळख्यांबरोबर ते कधीच वाटली जाऊ नयेत.

  10. तुझे पौरुषत्व आशीर्वादित होवो; आपल्या तारुण्यातील पत्नीबरोबर आनंदाचा उपभोग घे.

  11. प्रेमळ हरिणी सारखी, एक आकर्षक हरिणी अशी ती— तिचे स्तन तुला नेहमीच तृप्त करोत, तिच्या प्रेमाने तू नेहमी धुंद व्हावेस.

  12. माझ्या मुला, तू दुसर्‍या मनुष्याच्या पत्नीबरोबर धुंद का व्हावेस? आणि स्वैर स्त्रीला आलिंगन का द्यावेस?

  13. कारण तुझे मार्ग याहवेहच्या दृष्टीसमोर आहेत, आणि ते तुझ्या सर्व मार्गांचे परीक्षण करतात.

  14. मनुष्याने आपल्या उराशी निखारे बाळगले, तर त्याची वस्त्रे जळून जाणार नाहीत काय?

  15. मनुष्य जळत्या कोळशावरून चालल्यास त्याचे पाय पोळणार नाहीत काय?

  16. माझ्या घराच्या खिडकीच्या जाळीतून मी खाली पाहिले.

  17. साध्याभोळ्या पुरुषांमध्ये मी पाहिले, तरुणांचे मी अवलोकन केले, तेव्हा एक विवेकशून्य तरुण दिसला.

  18. तो तिच्या रस्त्याच्या कोपर्‍याजवळून जात होता, सरळ तिच्या घराच्या दिशेने जात होता.

  19. दिवसाच्या संधिप्रकाशात, संध्याकाळच्या अंधारात होता.

  20. तेव्हा त्याला भेटण्यास एक स्त्री बाहेर आली, तिची वेशभूषा एखाद्या वेश्येसारखी असून ती धूर्त होती.

  21. (ती बेशिस्त आणि उर्मट आहे, तिचे पाय तिच्या घरात थांबत नाहीत;

  22. आता तर ती रस्त्यावर आहे, आता ती चौकांमध्ये आहे प्रत्येक कोपर्‍यावर ती लपून बसते.)

  23. तिने त्याला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले, आणि निर्लज्ज चेहऱ्याने ती म्हणाली:

  24. आज मी माझी वचने पूर्ण केली आहेत, आणि माझ्या घरी शांत्यर्पण आहे.

  25. म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी बाहेर आले; मी तुला शोधले आणि तू मला सापडलास!