Skip to content

Temptation बद्दल बायबलमधील वचने

346 वचने · 52 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी माझा पलंग इजिप्त येथील सुताच्या रंगीबेरंगी चादरींनी सजविला आहे.

  2. ऊद, जटामांसी व दालचिनी यांनी मी माझी शय्या सुवासिक केली आहे.

  3. चल, पहाटेपर्यंत आपण प्रीतीत यथेच्छ रमून जाऊ; आपण एकमेकांना प्रीतीचा आनंद देऊ!

  4. कारण माझे पती घरी नाहीत; ते दूर प्रवासाला गेले आहेत;

  5. त्याने त्याची पैशाची थैली भरून घेतली आहे, आणि पौर्णिमेपर्यंत ते घरी परत येणार नाहीत.

  6. तिच्या मोहक शब्दांनी वश करून तिने त्याला चुकीच्या मार्गाने नेले; गोड बोलून तिने त्याला मोहात पाडले.

  7. जसा बैल कापणार्‍याकडे जातो, तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला, हरिण जसे दोर्‍यांच्या फासात पाय टाकते

  8. तोपर्यंत बाण त्याच्या पोटात घुसतो, ज्याप्रमाणे पक्षी वेगाने पाशात अडकतो, त्याला माहीत नसते की ते त्याच्यासाठी प्राणघातक आहे.

  9. तिच्याजवळून जाणाऱ्या, जे सरळ त्यांच्या मार्गाने जातात, त्यांना ती बोलाविते,

  10. “जे साधे भोळे आहेत त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते,

  11. “चोरलेले पाणी गोड लागते; गुप्तपणे खाल्लेले अन्न चविष्ट लागते!”

  12. नीतिमान आपल्या मित्रांची काळजीपूर्वकरित्या निवड करतो, परंतु दुष्ट लोकांचा मार्ग त्यांनाच बहकवितो.

  13. सुज्ञ मनुष्याचा सल्ला जीवनाचा झरा आहे. तो मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवितो.

  14. याहवेहचे भय म्हणजे जीवनाचा झरा आहे, ते मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवते.

  15. हिंसा करणारा आपल्या शेजार्‍याला मोहात पाडतो आणि त्याला कुमार्गावर जाण्यास प्रेरित करतो.

  16. माझ्या मुला, जर शिक्षण ऐकण्याचे थांबवलेस, तर ज्ञानाच्या वचनापासून तू दूर जाशील.

  17. जे कोणी नीतिमानाला वाईट मार्गाकडे घेऊन जातात, ते स्वतःच्याच जाळ्यात सापडतील, परंतु निर्दोष माणसांना उत्तम वारसा मिळेल.

  18. प्रामाणिक मनुष्याला भरपूर आशीर्वाद मिळेल, पण झटपट श्रीमंत होण्याची इच्छा धरणारा दंडापासून अलिप्त राहणार नाही.

  19. कारण असे होऊ नये, कि मी श्रीमंत झालो तर तुम्हाला विसरेन आणि म्हणेन, ‘याहवेह कोण आहे?’ किंवा दरिद्री झालो तर कदाचित मी चोरी करेन आणि माझ्या परमेश्वराच्या नावाची निंदा होईल.”

  20. मरणापेक्षाही अति कटू गोष्ट मला दिसून आली की, एक स्त्री जी एक पाश आहे, जिचे हृदय एक सापळा आहे जिचे हात साखळीप्रमाणे आहेत. जे परमेश्वराला प्रसन्न करतात ते तिच्यापासून निसटतील, परंतु पापींना ती पाशात अडकवेल.

  21. जे नीतीने चालतात आणि जे योग्य तेच बोलतात, जे पिळवणूक करून मिळविलेला लाभ नाकारतात आणि लाच घेण्यापासून त्यांचे हात लांब ठेवतात, खुनाच्या कारस्थानाबाबत जे त्यांचे कान बंद ठेवतात दुष्टतेचा बेत करण्याबाबत त्यांचे डोळे बंद करतात—

  22. ज्यांचा आश्रय पर्वतावरील गड असेल, तेच उच्चस्थानी वास करतील. त्यांच्या भाकरीचा पुरवठा केला जाईल, आणि त्यांना पाण्याची कमतरता पडणार नाही.

  23. वाळवंटात भटकण्याची सवय असलेल्या रानगाढवी प्रमाणे आहात, तुमच्या अनावर वासनांमुळे प्रत्येक वाऱ्याचा शोध घेणारे आहात; तुमच्या वासनांना कोणी आवर घालावा? कोणत्याही नराने तुमचा माग घेत असता स्वतःस थकवा आणू नये; संभोगासमयी त्यांना ती सापडेल.

  24. तुझे पाय पूर्णपणे खळ्यात उघडे पडेपर्यंत पळू नको, आणि तुझ्या घशाला कोरड पडली आहे. परंतु तू म्हटले, ‘याचा काही उपयोग नाही! मी परकीय दैवतावर प्रेम करतो, आणि मी त्यांचेच अनुसरण करणार.’

  25. मग त्या रेखाबीसमोर मी द्राक्षारसाचे कटोरे व काही पेले ठेवले आणि, “द्राक्षारस प्या,” असे त्यांना म्हणालो.