मुख्य मजकुरावर जा

Temptation बद्दल बायबलमधील वचने

346 वचने · 52 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमची सल्लामसलत माझे मार्गदर्शन करेल, आणि त्यानंतर गौरवात तुम्ही माझा स्वीकार कराल.

  2. स्वर्गात तुमच्याशिवाय माझे कोण आहे? पृथ्वीवर तुमच्याएवढे प्रिय मला दुसरे कोणीही नाही.

  3. माझे शरीर व माझे हृदय खचेल, तरी परमेश्वर माझ्या हृदयाचे सामर्थ्य असून सर्वकाळचा माझा वाटा आहेत.

  4. याहवेहने मला साहाय्य केले नसते, तर मी केव्हाच मरणाच्या निःशब्दतेत निवास केला असता.

  5. “हे याहवेह, मी घसरत आहे,” असा मी धावा केला, तेव्हा त्यांच्या करुणामय प्रीतीने मला सावरले.

  6. दुष्टाईच्या मार्गावर मी माझी पावले टाकीत नाही, जेणेकरून मी तुमच्या आज्ञांचे पालन करू शकेन.

  7. दुष्ट लोकांनी माझ्यासाठी सापळे लावलेले आहेत, तरीपण मी तुमच्या मार्गावरून ढळणार नाही.

  8. जे तुमच्या नियमांवर प्रीती करतात, त्यांना मोठी शांती लाभते, आणि ते कधीही विचलित होत नाहीत.

  9. माझ्या मुला, जर पापी माणसे तुला मोहात पाडतील, तर त्यांच्यामध्ये जाऊ नकोस.

  10. जर ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये; आपण निर्दोषांचा रक्तपात करण्यास टपून बसू, चला काही निरुपद्रवी आत्म्यावर हल्ला करू या;

  11. चला कबरेसारखे आपण त्यांना जिवंत गिळंकृत करू, आणि ते पूर्णपणे आत जातील, असे खोल खड्ड्यात घालू;

  12. आपल्याला सर्वप्रकारचा मौल्यवान खजिना मिळेल आणि लुटलेल्या वस्तूंनी आपण आपली घरे भरून टाकू;

  13. आमच्याबरोबर चिठ्ठी टाक; लुटलेला माल आपण सर्व वाटून घेऊ”—

  14. माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तू तुझे पाऊल त्यांच्या मार्गात टाकू नकोस;

  15. कारण दुष्कर्म करण्यासाठी त्यांचे पाय धावतात, ते रक्तपात करण्यासाठी चपळाई करतात.

  16. जिथे पक्षी स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकेल असे जाळे पसरविणे किती व्यर्थ आहे!

  17. सुज्ञान तुझ्या अंतःकरणात प्रवेश करेल, आणि ज्ञान तुझ्या जीवाला सुखदायक वाटेल,

  18. तेव्हा विवेक तुझे रक्षण करेल, आणि सुज्ञता तुझे राखण करेल.

  19. सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्‍या माणसांपासून दूर ठेवील.

  20. सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल, तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्‍या स्त्रीपासून,

  21. दुष्ट लोकांच्या मार्गात पाऊल टाकू नकोस, किंवा दुष्कृत्ये करणार्‍यांच्या मार्गाने जाऊ नकोस.

  22. त्याकडे पाठ फिरव, त्यावर प्रवास करू नकोस, त्यांच्यापासून मागे वळ आणि तुझ्या मार्गाने जा,

  23. जीवनाच्या मार्गाचा ती विचारच करीत नाही; तिचे मार्ग लक्ष्यहीनपणे भटकणारे आहेत, परंतु तिला ते माहीत नसते.

  24. मग माझ्या मुलांनो, आता माझे ऐका; माझ्या बोधवचनांकडे पाठ फिरवू नका.

  25. तू तुझा मार्ग अशा स्त्रीपासून दूर ठेव, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस,