Skip to content

Solomon बद्दल बायबलमधील वचने

301 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण फरात नदीच्या पश्चिमेकडील तिफसाहपासून गाझापर्यंतच्या सर्व राज्यांवर शलोमोनचे राज्य होते आणि सर्व बाजूने शांती होती.

  2. शलोमोनकडे रथाच्या घोड्यांसाठी चार हजार तबेले आणि बारा हजार घोडे होते.

  3. जिल्हाधिकारी आपआपल्या महिन्यात शलोमोन राजाला व त्यांच्या मेजावर भोजन करणार्‍यांसाठी अन्नसामुग्रींचा पुरवठा करीत असत. कशाचीही वाण पडणार नाही याची ते दक्षता घेत असत.

  4. त्याचप्रमाणे रथाच्या घोड्यांसाठी व इतर घोड्यांसाठी देखील जव व वैरण त्यांच्या नेमलेल्या ठिकाणी आणत असत.

  5. परमेश्वराने शलोमोनला ज्ञान व समुद्रकाठच्या वाळूप्रमाणे मोजमाप काढता येत नाही इतके फार मोठे शहाणपण व अगाध समज दिली होती.

  6. पूर्वेकडील देशातील सर्व लोकांपेक्षा किंवा इजिप्तमधील सर्व ज्ञानापेक्षा शलोमोनचे ज्ञान फार मोठे होते.

  7. इतर मनुष्यांपेक्षा, म्हणजेच एज्रावासी एथान, माहोलचे पुत्र हेमान, कल्कोल व दारदापेक्षा शलोमोन ज्ञानी होता. आणि त्याची किर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांपर्यंत पसरली.

  8. शलोमोनने तीन हजार नीतिसूत्रे आणि एक हजार पाच गीते रचली.

  9. लबानोनातील गंधसरूपासून भिंतीतून उगविणार्‍या एजोबापर्यंत वनस्पती जीवनाविषयी तो बोलला. पशू व पक्षी, सरपटणारे जंतू व मासे याबद्दलही त्याने वर्णन केले.

  10. शलोमोनच्या ज्ञानाचे बोल ऐकायला सर्व राष्ट्रांतून लोक येत असत, ते जगातील सर्व राजे ज्यांनी शलोमोनच्या ज्ञानाविषयी ऐकले होते, त्यांच्याद्वारे पाठवले जात असत.

  11. शलोमोनच्या राजवाड्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तेरा वर्षे लागली.

  12. त्याने लबानोनच्या वनात जो राजवाडा बांधला त्याची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात होती, त्याला गंधसरूच्या खांबांच्या चार रांगा होत्या व त्याला आधार देण्यासाठी गंधसरूच्या छाटलेल्या तुळया होत्या.

  13. त्या खांबांवर एका ओळीत पंधरा तुळया; अशा पंचेचाळीस तुळया होत्या व त्यावर देवदारूच्या फळ्यांचे छत होते.

  14. त्याच्या खिडक्या उंचावर समोरासमोर तीन अशा जोडीने बसविल्या होत्या.

  15. सर्व दरवाजांना चौकट बाह्या होत्या; त्या समोरच्या बाजूने समोरासमोर तीन अशा जोडीने होत्या.

  16. त्याने पन्नास हात लांब व तीस हात रुंद अशी खांबांची एक पंक्ती बनविली. त्याच्यासमोर एक द्वारमंडप होता व त्यासमोर खांब व त्यावर छत होते.

  17. त्याने राजासनासाठी खोली बांधली, जी न्यायाची खोली, जिथे बसून तो लोकांचा न्याय करणार, त्या खोलीला जमिनीपासून छतापर्यंत गंधसरूच्या फळ्यांनी झाकले.

  18. आणि ज्या राजवाड्यात तो राहणार त्याची रचना याच खोलीप्रमाणे होती. फारोहच्या ज्या कन्येशी त्याने विवाह केला होता तिच्यासाठी सुद्धा शलोमोनने याच खोलीसारखा राजवाडा बनविला.

  19. या सर्व इमारती, बाहेरच्या बाजूपासून ते दरबारापर्यंत आणि त्यांच्या पायापासून छपराच्या वळचणीपर्यंत, उच्च प्रतीचे दगड घेऊन त्यांना आकारात कापून आतील व बाहेरील बाजूने त्यांना गुळगुळीत बनवून वापरले होते.

  20. उत्तम दर्जाच्या मोठमोठ्या दगडांनी त्यांचा पाया घातला गेला. काही दगड दहा हात तर काही आठ हात लांबीचे होते.

  21. त्याच्या वरच्या बाजूने योग्य आकारात कापलेले उच्च दर्जाचे दगड आणि गंधसरूच्या तुळया होत्या.

  22. मोठ्या अंगणाच्या सभोवती घडलेल्या दगडांच्या तीन रांगा व छाटलेल्या गंधसरूच्या तुळयांची एक रांग होती, याहवेहच्या मंदिराच्या आतील अंगणाला व द्वारमंडपालाही तसेच होते.

  23. तेव्हा शलोमोन आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्याबरोबर त्यावेळी सण साजरा केला—एक मोठी मंडळी, म्हणजे लेबो हमाथपासून इजिप्तच्या खाडीपर्यंतचे रहिवासी आले होते. त्यांनी याहवेह आमच्या परमेश्वरापुढे सात दिवस व आणखी सात दिवस असे मिळून चौदा दिवस उत्सव साजरा केला.

  24. शलोमोनने जेव्हा याहवेहचे मंदिर व राजमहाल बांधण्याचे काम संपविले, आणि त्याला जे काही करावयाचे मनोरथ होते ते साधल्यानंतर,

  25. याहवेहने शलोमोनला जसे गिबोन येथे दर्शन दिले होते, तसे त्याला दुसर्‍यांदा दर्शन दिले.