मुख्य मजकुरावर जा

Select Readings बद्दल बायबलमधील वचने

802 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शिंगे आणि कर्णे हर्षनादाचा गजर करोत— याहवेह जे राजा आहेत, यांच्यापुढे आनंदाचा जयघोष करा.

  2. महासागर व त्यामधील सर्व स्तुतीचा हर्षनाद करोत, तसेच पृथ्वी आणि त्यावर राहणारे सर्व प्राणीही करोत.

  3. नदीच्या लाटा टाळ्या वाजवोत, डोंगर व टेकड्या परमेश्वरासमोर हर्षगान करोत;

  4. ते सर्व याहवेहच्या उपस्थितीमध्ये गावोत; कारण पृथ्वीचा रास्त न्याय करण्यासाठी ते येत आहेत. ते जगाचा आणि सर्व मनुष्यप्राण्यांचा न्याय त्यांच्या धार्मिकतेने व समानतेने करतील.

  5. आम्ही बाबेलच्या नदीकाठावर बसलो आणि सीयोनाची आठवण करीत रडलो.

  6. आम्ही आमच्या वीणा वाळुंजाच्या फांद्यावर टांगल्या,

  7. कारण आम्हाला कैद करणाऱ्यांनी आम्हाला गात गाण्यास सांगितले, आमचा छळ करणार्‍यांनी आनंद गीते गाण्याची मागणी केली, ते म्हणाले, “आमच्या करमणुकी करिता सीयोनाचे एखादे गीत गाऊन दाखवा!”

  8. या परदेशात आमच्या याहवेहचे स्तवनगीत गाणे आम्हाला कसे शक्य आहे?

  9. हे यरुशलेम, मी तुला विसरलो, तर माझा उजवा हात त्याचे कौशल्य विसरो;

  10. जर मी यरुशलेमला माझा सर्वोच्च आनंद मानत नसेन, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.

  11. हे याहवेह, माझ्या देवा, यरुशलेमचा पाडाव झाला त्या दिवशी एदोमाच्या वंशजांनी काय केले याचे स्मरण करा. ते आरोळ्या मारत होते, “तिला जमीनदोस्त करा, तिचा पाया देखील ढासळून टाका.”

  12. अगे बाबेलच्या कन्ये, तुझा नाश निश्चित आहे; तू जसा आमचा नाश केलास, तसा तुझी परतफेड करणारा धन्य होईल.

  13. जो तुझी तान्ही बालके घेऊन, त्यांना खडकावर आपटेल, तो धन्य!

  14. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझ्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर, आणि जोपर्यंत कष्टाचे दिवस येत नाहीत आणि अशी वर्षे येत नाहीत जेव्हा तुम्ही म्हणाल, “मला त्यांच्यामध्ये काही संतोष नाही”—

  15. जोपर्यंत सूर्य आणि प्रकाश, आणि चंद्र आणि तारे अंधकारमय होत नाहीत, पावसानंतर ढग परत जात नाहीत;

  16. जेव्हा घराचे पहारेकरी थरथर कापतील, आणि बलवान पुरुष वाकून जातील, दळण करणार्‍या थोडक्या आहेत म्हणून काम थांबवतील, आणि खिडक्यांमधून पाहणार्‍यांची नजर अंधुक होईल;

  17. जेव्हा रस्त्याच्या वेशी बंद असतील आणि जात्याचा आवाज मंद होईल; जेव्हा लोक पक्ष्यांच्या आवाजाने उठतील, परंतु त्यांची सर्व गीते शांत होतील;

  18. जेव्हा लोकांना उंच ठिकाणांची आणि वाटेतील धोक्याची भीती वाटते; जेव्हा बदामाची झाडे फुलतात आणि नाकतोडा त्याबरोबर फरफटत जातो आणि कोणतीही अभिलाषा जागृत होत नाही. तेव्हा लोक आपल्या सनातन घराकडे जातात आणि शोक करणारे रस्त्यावर येतात.

  19. आयुष्याचा चांदीचा दोर तुटण्याआधी, आणि सोन्याचे भांडे फुटण्याआधी; झर्‍यावरील घागर फुटण्याआधी, आणि विहिरीवरील रहाट मोडण्याआधी,

  20. आणि माती जिथून आली तिथे जाण्याआधी, आणि परमेश्वराने दिलेला आत्मा त्याकडे परतण्याआधी आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर.

  21. वाळवंट आणि शुष्क भूमी आनंदित होईल; अरण्य हर्षोल्हास करेल आणि बहरून येईल. केशराच्या फुलाप्रमाणे,

  22. त्याच्या फुलोऱ्याचा स्फोट होईल; तो मोठा आनंद करेल आणि उल्हासाने ओरडेल. लबानोनचे गौरव, कर्मेल आणि शारोन यांचे वैभव त्याला दिले जाईल; ते याहवेहचे गौरव, आमच्या परमेश्वराची भव्यता पाहतील.

  23. अशक्त हात बळकट करा, निर्बल झालेले गुडघे स्थिर करा;

  24. भयभीत अंतःकरणाच्या लोकांना सांगा, “बलवान व्हा, घाबरू नका; तुमचे परमेश्वर येतील, ते सूड घेण्यास येतील. दैवी प्रतिफळ देऊन तुम्हाला वाचवण्यासाठी येतील.”

  25. तेव्हा आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान उघडले जातील.