मुख्य मजकुरावर जा

Select Readings बद्दल बायबलमधील वचने

802 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. असा गौरवशाली राजा कोण आहेत? याहवेह जे समर्थ व प्रबळ आहेत, जे युद्धात पराक्रमी आहेत.

  2. अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा; प्राचीन द्वारांनो, सताड उघडा; महातेजस्वी महाराज आत येतील.

  3. हा गौरवशाली राजा कोण आहेत? सर्वशक्तिमान याहवेह— तेच आहेत गौरवशाली राजा. सेला

  4. दावीदाचे स्तोत्र. अहो दिव्यदूतांनो, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.

  5. याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या; पवित्रतेच्या वैभवाने याहवेहची उपासना करा.

  6. याहवेहची वाणी जलांवर आहे; गौरवशाली याहवेहची वाणी महा जलाशयांवर गर्जत आहे.

  7. याहवेहची वाणी प्रतापशाली आहे; प्रभावी आहे याहवेहचा स्वर.

  8. याहवेहच्या गर्जनेने देवदारू वृक्ष मोडून पडतात; लबानोनमधील देवदारू वृक्ष दुभंगतात.

  9. लबानोनचा डोंगर वासराप्रमाणे आणि सिर्योन तरुण रानबैलाप्रमाणे बागडतो;

  10. याहवेहचा आवाज कडाडतो, विजा चमकल्यासारखा.

  11. याहवेहच्या आवाजाचा गडगडाट वाळवंटे ढवळून काढतात; कादेशचे अरण्य याहवेह कंपित करतात.

  12. याहवेहच्या आवाजाने हरिणी प्रसवतात आणि वने पर्णहीन होतात. आणि त्यांच्या मंदिरात सर्वजण म्हणतात: “याहवेहचा, महिमा असो.”

  13. याहवेह जलप्रलयावर सिंहासनावर आरूढ झालेले आहेत; याहवेहच महाराज बनून सिंहासनावर सर्वकाळ स्थानबद्ध झालेले आहेत.

  14. याहवेह आपल्या लोकांना सामर्थ्य देतात; याहवेह आपल्या लोकांना शांती देऊन आशीर्वादित करतात.

  15. संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांची रचना. अलामोथ चालीवर आधारित. एक गीत. परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत; संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.

  16. पृथ्वी उलथीपालथी झाली आणि पर्वत सागराच्या हृदयात कोसळले,

  17. सागरांच्या जलांनी गर्जना केल्या, आणि त्यांच्या प्रचंड कोलाहलाने पर्वत कंपित झाले, तरी आम्ही भिणार नाही. सेला

  18. आपल्या परमेश्वराच्या परमपवित्र वसतिस्थानातून एक आनंददायी नदी वाहते; तिचे प्रवाह परमेश्वराच्या नगरास आनंद देतात.

  19. परमेश्वर स्वतः त्या नगरीत राहतात; ती नगरी अढळ राहील; प्रभात होताच परमेश्वर साहाय्य करतील.

  20. राष्ट्रे खवळली, राज्ये कोलमडली; त्यांच्या मोठ्या गर्जनेने पृथ्वी विरघळून जाते.

  21. सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत; याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. सेला

  22. या आणि आमचे याहवेह करीत असलेली अद्भुत कृत्ये पाहा; त्यांनी पृथ्वीचा नाश कसा केला आहे.

  23. दिगंतापर्यंत युद्धे ते बंद करतात. ते धनुष्य तोडतात आणि भाल्याचे तुकडे तुकडे करतात; ते रथांना अग्नीत भस्म करतात.

  24. ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा; राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल. पृथ्वीवर माझी महिमा होईल.”

  25. सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत; याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. सेला