मुख्य मजकुरावर जा

Mordecai

50 वचने · 1 कुटुंब सदस्य

Mordecai चा उल्लेख असलेली वचने

  1. बिन्यामीन वंशातील कीशाचा पुत्र शिमीचा पुत्र याईर, याचा पुत्र मर्दखय हा यहूदी मनुष्य शूशन राजवाड्यात कामास होता.

  2. मर्दखयाला एक चुलतबहीण होती, तिचे नाव हदस्साह होते, जिला त्याने वाढविले होते, कारण तिला आईवडील नव्हते. या तरुणीस एस्तेरही म्हणत असत, जी बांधेसूद व देखणी होती. एस्तेरचे आईवडील मरण पावल्यामुळे मर्दखयने तिला आपल्या कुटुंबात स्वतःच्या मुलीसारखे वाढविले होते.

  3. एस्तेरने आपले राष्ट्रीयत्व व कौटुंबिक माहिती कोणालाही सांगितली नाही, कारण मर्दखयाने तिला ते सांगू नये असे बजावले होते.

  4. एस्तेरची विचारपूस करण्यासाठी आणि तिच्या बाबतीत पुढे काय घडते हे जाणून घेण्यासाठी, मर्दखय दररोज अंतःपुराच्या अंगणाजवळ येजा करीत असे.

  5. राजाकडे जाण्याची एस्तेरची (मर्दखयाने दत्तक घेतलेली, त्याचे काका अबीहाईलच्या कन्याची) पाळी आली, तेव्हा तिने अंतःपुराचा प्रमुख हेगाइचा सल्ला स्वीकारून त्याच्या सूचनेप्रमाणे वस्त्रे परिधान केली आणि ज्यांनीही तिला पाहिले, त्यांची कृपादृष्टी तिच्यावर झाली.

  6. त्यानंतर जेव्हा सर्व कुमारिका पुन्हा एकत्र आणल्या गेल्या, मर्दखय राजमहालाच्या व्दारात बसला होता.

  7. एस्तेरने आपले राष्ट्रीयत्व व कौटुंबिक माहिती मर्दखयाच्या सूचनेनुसार कोणालाही सांगितली नव्हती. कारण मर्दखयाच्या घरी असताना ती ज्याप्रमाणे आज्ञा पाळीत असे, त्याचप्रमाणे ती अद्यापही त्याच्या आज्ञा पाळीत होती.

  8. एके दिवशी मर्दखय राजवाड्याच्या द्वारात बसलेला असताना, राजाचे दोन अधिकारी बिग्थान व तेरेश, जे राजवाड्याच्या द्वारी द्वारपाल होते, ते राजावर संतापले आणि अहश्वेरोश राजाचा वध करण्याचा त्यांनी कट केला.

  9. मर्दखयाने या कटाची माहिती शोधून काढली व ती बातमी त्याने एस्तेर राणीला कळवली. तिने ती राजास कळवली आणि मर्दखयाकडून कटाची माहिती मिळाल्याचे त्याला सांगितले.

  10. आता राजाज्ञेप्रमाणे राजद्वारावरील सर्व अधिकारी हामानाला अतिशय आदराने गुडघे टेकवून मुजरा करू लागले. परंतु मर्दखयाने गुडघे टेकवून मुजरा करण्याचे नाकारले.

  11. मग राजद्वारावरील सर्व अधिकारी मर्दखयाला विचारू लागले, “तू राजाची आज्ञा का पाळीत नाहीस?”

  12. दररोज लोक त्याला सांगत असत, परंतु तरीही त्याने ते करण्याचे नाकारले. शेवटी त्याला या राजाज्ञेपासून सूट मिळू शकते की काय हे पाहण्यासाठी ते हामानाशी बोलले, कारण आपण यहूदी असल्याचे मर्दखयाने त्यांना सांगितले होते.

  13. जेव्हा हामानाने पाहिले की मर्दखया गुडघे टेकवित नाही व मुजराही करीत नाही, तेव्हा त्याला अतिशय संताप आला.

  14. परंतु मर्दखया कोणत्या समाजातून आला आहे हे कळल्यावर, एकट्या मर्दखयावर हात टाकण्याचा विचार त्याला कमीपणाचा वाटला. याउलट अहश्वेरोश राजाच्या संपूर्ण साम्राज्यातील मर्दखयाच्या समाजाच्या सर्व लोकांचा म्हणजे यहूद्यांचा नायनाट करण्याचा हामान मार्ग शोधू लागला.

  15. जेव्हा मर्दखयाला समजले, ज्या सर्व गोष्टी करण्यात आल्या होत्या, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून, गोणपाट नेसून, अंगाला राख फासून व बाहेर शहरात जाऊन मोठमोठ्याने व अतिशय दुःखाने विलाप केला.

  16. एस्तेरच्या दासींनी आणि खोजांनी येऊन तिला मर्दखयाबद्दल सांगितले, तेव्हा ती अतिशय खिन्न झाली. मर्दखयाने गोणपाट काढून वस्त्रे घालावी म्हणून तिने त्याच्याकडे वस्त्रे पाठविली, परंतु त्याने ते घेण्याचे नाकारले.

  17. मग एस्तेरने राजांच्या खोजांपैकी जो एस्तेरच्या तैनातीला असे, त्या हथाकाला बोलाविणे पाठविले. मर्दखयावर कोणते संकट गुदरले होते व तो असा का वागत होता, या गोष्टीची चौकशी करण्यासाठी तिने त्याला बाहेर मर्दखयाकडे पाठविले.

  18. तेव्हा हथाक मर्दखयाला भेटण्यास राजद्वारासमोरील शहराच्या चौकात गेला.

  19. मर्दखयाने त्याला त्याच्या बाबत घडलेले सर्वकाही सांगितले. यहूदी लोकांचा नाश करण्यासाठी जी धनराशी शाही खजिन्यात देण्याचे वचन हामानाने दिले होते त्यासंबंधीही सांगितले.

  20. मग हथाक परत आला व त्याने एस्तेरला मर्दखयाने सांगितलेला अहवाल दिला.

  21. एस्तेरने हथाकाला मर्दखयाकडे पुढील निरोप देऊन पाठविले,

  22. तेव्हा एस्तेरचा हा निरोप मर्दखयाच्या कानी घालण्यात आला.

  23. मर्दखयाने हे प्रत्युतर एस्तेरला पाठविले: “असा विचार करू नको की तिथे राजवाड्यात आहेस म्हणून इतर सर्व यहूदी मारले जात असताना तू एकटी वाचशील.

  24. तेव्हा एस्तेरने मर्दखयाला हे उत्तर पाठविले:

  25. तेव्हा मर्दखया तिथून गेला व एस्तेरच्या सूचनेप्रमाणे सर्व त्याने केले.