- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Mordecai बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
बिन्यामीन वंशातील कीशाचा पुत्र शिमीचा पुत्र याईर, याचा पुत्र मर्दखय हा यहूदी मनुष्य शूशन राजवाड्यात कामास होता.
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमातील यहूदीयाचा राजा यकोन्याह च्याबरोबर व इतर अनेकांना बाबेलला बंदिवासात नेले, तेव्हा मर्दखय यालाही पकडून नेले.
मर्दखयाला एक चुलतबहीण होती, तिचे नाव हदस्साह होते, जिला त्याने वाढविले होते, कारण तिला आईवडील नव्हते. या तरुणीस एस्तेरही म्हणत असत, जी बांधेसूद व देखणी होती. एस्तेरचे आईवडील मरण पावल्यामुळे मर्दखयने तिला आपल्या कुटुंबात स्वतःच्या मुलीसारखे वाढविले होते.
एके दिवशी मर्दखय राजवाड्याच्या द्वारात बसलेला असताना, राजाचे दोन अधिकारी बिग्थान व तेरेश, जे राजवाड्याच्या द्वारी द्वारपाल होते, ते राजावर संतापले आणि अहश्वेरोश राजाचा वध करण्याचा त्यांनी कट केला.
मर्दखयाने या कटाची माहिती शोधून काढली व ती बातमी त्याने एस्तेर राणीला कळवली. तिने ती राजास कळवली आणि मर्दखयाकडून कटाची माहिती मिळाल्याचे त्याला सांगितले.
जेव्हा तपास करण्यात आला तेव्हा ते दोन अधिकारी दोषी असल्याचे आढळून आले, तेव्हा त्यांना सुळावर चढविण्यात आले. हे सर्व वृत्त राजाच्या समक्षतेत कारकिर्दीच्या इतिहासग्रंथात नोंदण्यात आले.
त्या रात्री राजाला झोप येईना, म्हणून त्याने राज्याच्या इतिहासाचा ग्रंथ मागविला, त्याच्या कारकिर्दीचा इतिहास आणण्यात आला व त्याचे वाचन करण्यात येऊ लागले.
ग्रंथाचे वाचन चालू असताना, राजवाड्याचे दोन खोजे, द्वाररक्षक बिग्थाना व तेरेश यांनी अहश्वेरोश राजाचा वध करण्याचा कट मर्दखय याने कसा उघडकीस आणला होता, ही संपूर्ण हकिकत नोंदविण्यात आल्याचे कळले.
तेव्हा राजाने विचारले, “याबद्दल मर्दखयाचा सन्मान करण्यात आला होता का?” “त्याच्यासाठी काही करण्यात आले नाही,” सेवकांनी उत्तर दिले.
राजाने विचारले, “राजदरबारात कोण आहे?” त्याचवेळी हामानाने नुकताच राजदरबाराच्या बाहेरच्या चौकात प्रवेश केला. आपण उभ्या केलेल्या सुळावर मर्दखयाला फाशी देण्याची परवानगी राजापाशी मागण्यासाठी तो आलेला होता.
तेव्हा राजदरबारी उत्तरले, “हामान राजदरबारात उभा आहे.” “त्याला आत आणा,” राजाने फर्माविले.
मग हामान आत आल्यावर, राजाने त्याला विचारले, “जर एखाद्या मनुष्याला बहुमान देण्यात राजाला संतोष वाटत असल्यास काय करावयाला हवे?” आता हामानाने स्वतःबद्दल विचार केला, “राजाच्या मर्जीत सन्मानास योग्य असणारा माझ्याशिवाय दुसरा कोण असेल?”
म्हणून हामानाने राजाला उत्तर दिले, “जर एखाद्या मनुष्याला बहुमान देण्यात राजाला संतोष वाटत असल्यास,
राजाने स्वतः परिधान केलेला पोशाख व राजाने स्वारी केलेला घोडा मागवावा आणि राजमुकुट त्याच्या मस्तकावर ठेवावा.
आणि राजाच्या अत्यंत थोर सरदाराला तो पोशाख व घोडा द्यावा. आणि राजा ज्याचा सन्मान करू इच्छितो त्याच्या अंगावर ते कपडे चढवावे, आणि त्याच्यापुढे हे जाहीर करीत जावे, ‘राजाला जे प्रसन्न करतात, त्यांचा सन्मान राजा अशा रीतीने करतो!’ ”
राजाने हामानाला फर्माविले, “आता त्वरा कर आणि माझा पोशाख आणि माझा घोडा घे आणि तू सांगितलेस अगदी त्याप्रमाणे राजद्वारी बसणारा यहूदी मर्दखयाच्या बाबतीत कर. तू सुचवलेल्या कोणत्याही बाबीकडे दुर्लक्ष करू नको.”
मग हामानाने राजाचा पोशाख व घोडा घेतला व तो पोशाख मर्दखयाला घातला, राजाच्या घोड्यावर बसवून, शहराच्या रस्त्यांमधून त्याला मिरवणुकीने नेले आणि त्यावेळी त्याच्यापुढे तो ललकारत होता, “जे राजाला प्रसन्न करतात, त्यांचा अशा रीतीने सन्मान केला जातो.”
त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहूद्यांचा शत्रू हामानची मालमत्ता एस्तेर राणीला दिली. नंतर मर्दखयाला राजापुढे आणण्यात आले, कारण एस्तेरने मर्दखया कसा आपला नातेवाईक आहे राजाला सांगितले होते.
तेव्हा राजाने हामानापासून परत घेतलेली आपली मुद्रा मर्दखयाला दिली. व एस्तेरने त्याला हामानाच्या मालमत्तेचा कारभारी नेमले.
जेव्हा मर्दखया राजाच्या उपस्थितीतून बाहेर गेला, तेव्हा त्याने निळ्या व पांढर्या रंगांची राजकीय वस्त्रे परिधान केले होते व डोक्यावर सोन्याचा मोठा मुकुट ठेवून आणि व जांभळ्या रंगाचा व तलम वस्त्राचा झगा घातला होता. आणि शूशन शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
अहश्वेरोश राजाने आपल्या संपूर्ण साम्राज्याच्या मुख्य भूमीवर व समुद्रकिनाऱ्यावरील बेटांवर कर लावला.
मर्दखय यहूदीस उच्चपद प्रदान केले, मर्दखयाची थोरवी, त्याची महान कृत्ये आणि त्याचप्रमाणे त्याला राजाकडून प्राप्त झालेले सन्मान यांची साद्यंत हकिकत मेदिया व पर्शियाच्या राजाच्या इतिहासग्रंथात लिहिलेली नाही काय?
खुद्द अहश्वेरोश राजाच्या खालोखाल मर्दखयचे पद होते. अर्थात्, तो यहूदी लोकांमध्ये अतिशय थोर होता आणि त्याचे सर्व देशबांधव त्याचा फार आदर करीत, कारण तो आपल्या लोकांचे कल्याण व्हावे म्हणून खूप झटत असे व त्यांच्या हितासाठी रदबदली करीत असे.