- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Select Readings बद्दल बायबलमधील वचने: The joy of the righteous
The joy of the righteous बद्दल वचने
संगीत निर्देशकाकरिता. गित्तीथ वर आधारित. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. हे सर्वशक्तिमान याहवेह, तुमचे निवासस्थान किती रम्य आहे!
याहवेह तुमच्या अंगणाच्या उत्कंठेने मी, मूर्छित होईपर्यंत आतुर झालो आहे; माझा जीव व माझा देह जिवंत परमेश्वराला आरोळी मारीत आहे.
हे सर्वशक्तिमान याहवेह, माझ्या राजा आणि माझ्या देवा, तुमच्या वेद्यांजवळ चिमणीला घरटी बांधण्याचे, व निळवीला देखील आपली पिल्ले ठेवण्याचे ठिकाण सापडले आहे.
जे तुमच्या मंदिरात राहू शकतात, ते किती धन्य आहेत; ते निरंतर तुमचे स्तवन करतात. सेला
ज्या मनुष्याच्या सामर्थ्याचा उगम तुम्हीच आहात, ते किती धन्य आहेत, ज्यांचे अंतःकरण तुमच्या मार्गाचे यात्रेकरू आहेत.
ते बाका दरीतून जात असताना, ती त्यांना झर्यांचे स्थान होईल; शरदॠतूतील पाऊसही तिला आशीर्वादाने झाकून टाकील.
सीयोनात परमेश्वराच्या समोर प्रत्येकजण उपस्थित होईपर्यंत, त्यांचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढेल.
याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका; याकोबाच्या परमेश्वरा, माझे ऐका. सेला
हे परमेश्वरा, तुम्ही आमच्या ढालीवर दृष्टी टाका; आपल्या अभिषिक्तावर कृपादृष्टी करा.
तुमच्या अंगणात घालविलेला एक दिवस, इतर कुठेही घालविलेल्या सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या मंडपात राहण्यापेक्षा, माझ्या परमेश्वराच्या भवनाचा द्वारपाल होऊन राहण्यात मला अधिक आनंद आहे.
कारण याहवेह परमेश्वर आमचा सूर्य आणि आमची ढाल आहेत; ते आम्हाला कृपा व गौरव देतात; जे निष्कलंक असतात, त्यांच्यापासून ते कोणतीही उत्तम गोष्ट रोखून धरणार नाहीत.
सर्वशक्तिमान याहवेह, जे लोक तुमच्यावर भाव ठेवतात, ते कितीतरी धन्य होत.