मुख्य मजकुरावर जा

Select Readings बद्दल बायबलमधील वचने: The glory of God

11 वचने · 47 पैलू

The glory of God बद्दल वचने

  1. दावीदाचे स्तोत्र. अहो दिव्यदूतांनो, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.

  2. याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या; पवित्रतेच्या वैभवाने याहवेहची उपासना करा.

  3. याहवेहची वाणी जलांवर आहे; गौरवशाली याहवेहची वाणी महा जलाशयांवर गर्जत आहे.

  4. याहवेहची वाणी प्रतापशाली आहे; प्रभावी आहे याहवेहचा स्वर.

  5. याहवेहच्या गर्जनेने देवदारू वृक्ष मोडून पडतात; लबानोनमधील देवदारू वृक्ष दुभंगतात.

  6. लबानोनचा डोंगर वासराप्रमाणे आणि सिर्योन तरुण रानबैलाप्रमाणे बागडतो;

  7. याहवेहचा आवाज कडाडतो, विजा चमकल्यासारखा.

  8. याहवेहच्या आवाजाचा गडगडाट वाळवंटे ढवळून काढतात; कादेशचे अरण्य याहवेह कंपित करतात.

  9. याहवेहच्या आवाजाने हरिणी प्रसवतात आणि वने पर्णहीन होतात. आणि त्यांच्या मंदिरात सर्वजण म्हणतात: “याहवेहचा, महिमा असो.”

  10. याहवेह जलप्रलयावर सिंहासनावर आरूढ झालेले आहेत; याहवेहच महाराज बनून सिंहासनावर सर्वकाळ स्थानबद्ध झालेले आहेत.

  11. याहवेह आपल्या लोकांना सामर्थ्य देतात; याहवेह आपल्या लोकांना शांती देऊन आशीर्वादित करतात.