Select Readings बद्दल बायबलमधील वचने: The brevity of life
The brevity of life बद्दल वचने
“स्त्रीपासून जन्मलेल्या मानवाचे जीवन, अल्पकालीन व त्रासाने भरलेले आहे.
अशा फुलासारखे, जे फुलते आणि सुकून जाते; क्षणभंगुर सावलीप्रमाणे ते जास्त काळ टिकत नाही.
अशा मानवांवर तुम्ही आपली नजर लावता का? त्यांचा न्याय करण्यासाठी त्यांना आपल्या उपस्थितीत आणणार का?
अशुद्धतेतून जे शुद्ध ते कोण उत्पन्न करेल? कोणीही नाही!
मानवाचे दिवस ठरलेले आहेत; त्याच्या महिन्यांची संख्या तुमच्या स्वाधीन आहे आणि त्याची नेमलेली मर्यादा त्याला ओलांडता येत नाही.
रोजगाराच्या मजुराप्रमाणे त्याची वेळ पूर्ण होईपर्यंत, आपली दृष्टी त्याच्यावरून काढून त्याला एकटे असू द्या.
“झाडाला देखील आशा असते: की त्याला कापून टाकले तरी ते पुन्हा फुटणार, आणि त्याच्या नवीन फांद्या कोमेजणार नाहीत.
मातीत त्याची मुळे जुनी झाली असली, आणि त्याचा बुंधा मातीत मृत झाला असला,
तरी पाण्याच्या सुगंधाने ते फुलते आणि रोपट्याप्रमाणे, त्याला पुन्हा कोंब फुटतात.
परंतु मनुष्य मरण पावतो व त्याला पुरले जाते; तो आपला शेवटचा श्वास घेतो आणि नाहीसा होतो.