Select Readings बद्दल बायबलमधील वचने: Man in extremity
Man in extremity बद्दल वचने
संगीत दिग्दर्शकासाठी; याहवेहचा सेवक दावीदाची रचना. जेव्हा याहवेहने दावीदाला त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या तावडीतून सोडविले, तेव्हा दावीदाने या शब्दात याहवेहसाठी गीत गाईले. तो म्हणाला, याहवेह, माझे सामर्थ्य, माझे तुमच्यावर प्रेम आहे.
याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे; माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग ते माझे शरणस्थान आहेत.
स्तुतीस योग्य याहवेहचा मी धावा केला, आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली.
मृत्यूच्या साखळदंडानी मला जखडले, नाशाच्या प्रवाहांनी मला बुडवून टाकले.
मृतलोकाच्या दोर्यांनी माझ्याभोवती वेटोळे केले; मृत्यूचा पाश मला सामोरा आला.
मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला; परमेश्वराकडे मदतीसाठी मी हाक मारली. त्यांनी आपल्या मंदिरातून माझी आरोळी ऐकली; माझा धावा त्यांच्या कानांपर्यंत पोहोचला.
तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, आणि पर्वताचे पाये हादरले. याहवेहच्या क्रोधामुळे ते भयभीत झाले.
त्यांच्या नाकपुड्यातून धूर निघाला; भस्म करणारा अग्नी त्यांच्या मुखातून निघाला, जळते निखारे त्यातून निघाले.
आकाशाला विभागून याहवेह खाली आले; घनदाट ढग त्यांच्या पायाखाली होते.
करुबावर आरूढ होऊन ते उडून आले; वार्याच्या पंखांवर त्यांनी भरारी मारली.
अंधकार, व आकाशातील काळे मेघ यांचे आच्छादन; आपल्या सभोवती त्यांचा मंडप केला आहे.
त्यांच्या तेजस्वी समक्षतेतून ढगांमधून विजा लखलखल्या आणि गारांचे प्रचंड वादळ बाहेर पडले.
याहवेहने स्वर्गातून गर्जना केली; परात्पराच्या वाणीचा नाद झाला.
त्यांनी आपले बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण केली, मोठ्या विजेच्या कडकडाटांनी त्यांना पळवून टाकले.
हे याहवेह, तुमच्या धमकीने तुमच्या नाकपुड्यातील श्वासाच्या फुंकराने समुद्राचे तळ उघडकीस आले, आणि पृथ्वीचे पाये उघडे पडले.
वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले; खोल जलांमधून त्यांनी मला बाहेर काढले.
माझ्या बलवान शत्रूपासून माझे शत्रू जे माझ्यासाठी फार शक्तिमान होते, त्यांच्यापासून मला सोडविले.
माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले, परंतु याहवेह माझे आधार होते.
त्यांनी मला प्रशस्त ठिकाणी आणले; त्यांनी मला सोडविले कारण त्यांना माझ्याठायी हर्ष होता.