मुख्य मजकुरावर जा

Select Readings बद्दल बायबलमधील वचने: The wrath of God

6 वचने · 47 पैलू

"Select Readings" साठी शोधा

The wrath of God बद्दल वचने

  1. मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले आणि ते म्हणाले: “खांबांच्या वरच्या भागावर प्रहार करा म्हणजे उंबरठे हलतील. आणि ते सर्व लोकांच्या डोक्यावर खाली पाड; जे त्यातून वाचतील त्यांना मी तलवारीने मारून टाकीन. एक सुद्धा वाचणार नाही, कोणीही निसटणार नाही.

  2. खोल खणीत ते अधोलोकापर्यंत जाऊन पोहोचले, तरी तिथे जाऊन माझ्या हात त्यांना वर ओढून आणेन; वर चढत ते आकाशापर्यंत आले, तरी तिथूनही मी त्यांना खाली आणेन.

  3. कर्मेल पर्वताच्या शिखरावर ते लपून राहिले, तरी मी त्यांची शिकार करून त्यांना पकडेन. ते महासागराच्या तळाशी माझ्या दृष्टिआड लपून बसले तरी, मी सर्पाला त्यांना चावा घेण्याची आज्ञा देईन.

  4. जरी शत्रूंनी त्यांना कैद करून बंदिवासात नेले, तरी मी तलवारीला त्यांना ठार मारण्याची आज्ञा देईन. “मी त्यांच्यावर माझी नजर ठेवेन ती तर हानीसाठी असणार भल्यासाठी नाही.”

  5. प्रभू, सेनाधीश याहवेह— भूमीला स्पर्श करतात आणि ती विरघळून जाते, आणि त्यामध्ये राहणारे सर्व लोक शोक करतात. संपूर्ण देश नाईल नदीसारखा वर येतो आणि इजिप्तच्या नदीप्रमाणे खाली बुडतो;

  6. ते आकाशात आपले भव्य राजवाडे बांधतात आणि त्याचा पाया पृथ्वीवर ठेवतात; ते समुद्राच्या पाण्याला बोलवितात आणि ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर ओततात; याहवेह हे त्यांचे नाव आहे.