मुख्य मजकुरावर जा

Select Readings बद्दल बायबलमधील वचने

802 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांच्या नाकपुड्यातून धूर निघाला; भस्म करणारा अग्नी त्यांच्या मुखातून निघाला, जळते निखारे त्यातून निघाले.

  2. आकाशाला विभागून याहवेह खाली आले; घनदाट ढग त्यांच्या पायाखाली होते.

  3. करुबावर आरूढ होऊन ते उडून आले; वार्‍याच्या पंखांवर त्यांनी भरारी मारली.

  4. अंधकार, व आकाशातील काळे मेघ यांचे आच्छादन; आपल्या सभोवती त्यांचा मंडप केला आहे.

  5. त्यांच्या तेजस्वी समक्षतेतून ढगांमधून विजा लखलखल्या आणि गारांचे प्रचंड वादळ बाहेर पडले.

  6. याहवेहने स्वर्गातून गर्जना केली; परात्पराच्या वाणीचा नाद झाला.

  7. त्यांनी आपले बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण केली, मोठ्या विजेच्या कडकडाटांनी त्यांना पळवून टाकले.

  8. हे याहवेह, तुमच्या धमकीने तुमच्या नाकपुड्यातील श्वासाच्या फुंकराने समुद्राचे तळ उघडकीस आले, आणि पृथ्वीचे पाये उघडे पडले.

  9. वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले; खोल जलांमधून त्यांनी मला बाहेर काढले.

  10. माझ्या बलवान शत्रूपासून माझे शत्रू जे माझ्यासाठी फार शक्तिमान होते, त्यांच्यापासून मला सोडविले.

  11. माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले, परंतु याहवेह माझे आधार होते.

  12. त्यांनी मला प्रशस्त ठिकाणी आणले; त्यांनी मला सोडविले कारण त्यांना माझ्याठायी हर्ष होता.

  13. दावीदाचे स्तोत्र. याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही.

  14. ते मला हिरव्यागार कुरणात विश्रांती देतात, ते मला संथपणे वाहणार्‍या झर्‍याजवळ नेतात.

  15. ते माझा जीव ताजातवाना करतात. ते आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितात.

  16. मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात; तुमची आकडी व तुमची काठी मला धीर देतात.

  17. तुम्ही माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढता; तुम्ही माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक करता; माझा प्याला भरभरून वाहत आहे.

  18. खरोखर चांगुलपणा व करुणामयप्रीती मजबरोबर आयुष्यभर असतील, आणि मी याहवेहच्या, घरात सदासर्वदा राहीन.

  19. दावीदाचे एक स्तोत्र. पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत.

  20. कारण त्यांनीच तिचा पाया महासागरांवर घातला, आणि त्यांनीच तिला जलप्रवाहांवर स्थिर केले.

  21. याहवेहचा डोंगर कोण चढून जाईल? त्यांच्या पवित्रस्थानी कोण उभा राहील?

  22. ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे, जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही, जो खोटी शपथ वाहत नाही.

  23. त्यांना याहवेहपासून आशीर्वाद लाभेल. त्यांचा तारणकर्ता परमेश्वर त्यांना नीतिमान ठरवेल.

  24. हीच अशी पिढी आहे जी याहवेहचा शोध घेत आहे, याकोबाच्या परमेश्वरा, जे तुमच्या दर्शनासाठी आतुर आहेत. सेला

  25. अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा; प्राचीन द्वारांनो, उच्च व्हा; गौरवाच्या राजाला आत प्रवेश करू द्या.