- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Select Readings बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
मानवाला त्याचे मोल अवगत नाही; जिवंतांच्या भूमीत ते आढळू शकत नाही.
महासागर म्हणतात, “ते माझ्यात नाही”; आणि समुद्र म्हणतो, “ते माझ्याकडे नाही.”
अतिशुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही, किंवा चांदीच्या मापातही त्याचे मोल करता येत नाही.
ओफीराचे सोने, मोलवान गोमेद किंवा नीलमणी, यांनीही त्याचे मोल करता येणार नाही.
सोने आणि रत्ने किंवा, शुद्ध सोन्याचे अलंकार त्या ज्ञानाच्या तुलनेत बसत नाही.
प्रवाळ व सुर्यकांतमणींचा तर उल्लेखच नको; ज्ञानाचे मोल माणकांपेक्षाही खूपच अधिक आहे.
कूशचा पुष्कराजही त्याची बरोबरी करू शकत नाही, आणि शुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही.
तर मग ज्ञान कुठून येते? आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे?
ते प्रत्येक जीवजंतूंच्या नजरेपासून गुप्त ठेवलेले आहे, आकाशातील पक्ष्यांपासून देखील ते लपविलेले आहे.
विनाश आणि मृत्यू म्हणतात, “की आमच्या कानी तर त्याची केवळ वार्ता आली आहे.”
परमेश्वरालाच ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग अवगत असतो ते कुठे आढळेल, हे फक्त त्यांनाच माहीत आहे.
कारण परमेश्वर पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाहू शकतात. आणि आकाशाखालचे सर्वकाही त्यांना दिसते.
जेव्हा त्यांनी वार्याची गती स्थापित केली आणि जलांचे माप घेतले,
जेव्हा त्यांनी पावसाला नियम, आणि गर्जणार्या विजेला मार्ग आखून दिला,
तेव्हा त्यांनी ज्ञानाकडे पाहून त्याचे मुल्यमापन केले; त्याची पुष्टी करून त्याची पारख केली.
याहवेहने सर्व मानवजातीला म्हटले, “प्रभूचे भय—हेच ज्ञान आहे, वाईटापासून दूर राहणे हीच सुज्ञता होय.”
धन्य ते लोक, जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत, किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत, आणि थट्टा करणार्यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.
पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.
ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्या जलप्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.
परंतु दुष्ट तसे नाहीत. ते वार्याने उडून जाणार्या भुश्यासारखे आहेत.
म्हणून दुष्ट न्यायसभेत, किंवा पापी लोक नीतिमानांच्या सभेमध्ये उभे राहणार नाहीत.
कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात, परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.
राष्ट्रे कट का रचत आहेत, आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत?
याहवेह आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे एकत्र येऊन उठाव करीत, असे म्हणत आहेत,
“चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आणि त्यांच्या बेड्या काढून फेकून देऊ.”