Skip to content

Reproof बद्दल बायबलमधील वचने

165 वचने · 70 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र. याहवेह, रागाने माझा निषेध करू नका, तीव्र क्रोधाने मला शासन करू नका.

  2. याहवेहचे नियम उत्कृष्ट आहेत; ते आत्म्याला ताजेतवाने करतात. याहवेहचे नियम विश्वसनीय आहेत, ते भोळ्यांना सुज्ञ करतात.

  3. याहवेहचे नियम योग्य आहेत, ते हृदयास आनंद देतात, याहवेहच्या आज्ञा तेजस्वी आहेत, त्या नेत्रांना प्रकाश देतात.

  4. याहवेहचे भय निर्मळ आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहेत. याहवेहचे निर्णय स्थिर आहेत, आणि ते सर्व पूर्णतः नीतिमान आहेत.

  5. सोन्यापेक्षा ते अधिक मौल्यवान आहेत, अतिशुद्ध सोन्यापेक्षाही; ते मधापेक्षा मधुर आहेत, पोळ्यातील मधाहूनही ते अधिक गोड आहेत.

  6. कारण ते तुमच्या सेवकांस सावध करतात; त्याचे पालन करणार्‍यास मोठे प्रतिफळ मिळते.

  7. तुम्ही मनुष्याला त्याच्या पापाबद्दल फटके मारून शिस्त लावता, त्याचे ऐश्वर्य कसर लागलेल्या वस्‍त्रांप्रमाणे निकृष्ट करता; निश्चितच मनुष्य खरोखर केवळ श्वासमात्र आहे. सेला

  8. तुम्ही हे करीत असता मी गप्प राहिलो, तेव्हा तुम्हाला वाटले की मी तुमच्यासारखाच आहे, परंतु आता तुम्हाला शासन करण्याचा काळ आला आहे; तुमचे आरोप मी तुमच्यापुढे ठेवणार.

  9. याहवेह, धन्य तो पुरुष, ज्याला तुम्ही शिस्त लावता, ज्याला तुम्ही तुमचे विधिनियम देण्यासाठी निवडले आहे;

  10. पीडित होण्याआधी मी पथभ्रष्ट झालो होतो, पण आता तुमचे वचन मी पाळतो.

  11. मला मिळालेली पीडा माझ्या हिताची होती, जेणेकरून मी तुमचे नियम शिकावे;

  12. हे याहवेह, तुमचे निर्णय अगदी न्याय्य आहेत, हे मला माहीत आहे; सत्यतेने तुम्ही मला शिक्षा दिली;

  13. नीतिमान मला शासन करो—ते माझ्यासाठी कृपाच ठरेल; त्यांनी केलेली कान उघाडणी—मला तैलाभ्यंगासारखी वाटते. माझे मस्तक ते कधीही नाकारणार नाही, दुष्ट माणसांच्या दुराचाराविरुद्ध मी सतत प्रार्थना करेन.

  14. ते माझा सल्ला स्वीकारणार नाहीत; आणि माझ्या दटावणीला झिडकारतील म्हणून,

  15. तू म्हणशील, “अरेरे! मी शिस्तीचा किती तिरस्कार केला! माझ्या अंतःकरणाने सुधारणा कशी फेटाळून लावली!

  16. कारण ही आज्ञा एक दीपक आहे, आणि हे शिक्षण म्हणजे प्रकाश आहे; आणि ही सुधारणा व बोधवचने जीवनाचे मार्ग आहेत.

  17. जो टवाळखोराची सुधारणा करतो, तो अपमानास आमंत्रण देतो; जो दुष्टाला धमकावितो त्याला अपशब्द ऐकावे लागतात.

  18. टवाळखोरांची कान उघाडणी करू नकोस, नाहीतर ते तुझा द्वेष करतील, सुज्ञ माणसांची कान उघाडणी कर आणि ते तुजवर प्रीती करतील.

  19. जो शिस्तीचे पालन करतो तो जीवनाचा मार्ग दाखवितो परंतु जो सुधारणा नाकारतो, तो दुसर्‍यांची दिशाभूल करतो.

  20. जो अनुशासन प्रिय असतो, त्याला ज्ञान प्रिय असते, परंतु ज्याला सुधारणा अप्रिय आहे, तो मूर्ख होय.

  21. जो शिक्षण नाकारतो, त्याला दारिद्र्य आणि लज्जा प्राप्त होतात, पण जो अनुशासन स्वीकारतो, त्याला सन्मान लाभेल.

  22. मूर्ख पुत्र आपल्या आईवडिलांचा सल्ला तुच्छ मानतो, पण जो सुधारणा अंमलात आणतो, तो सुज्ञपणा दाखवितो.

  23. जे सत्याचा मार्ग सोडतात, कठोर शिक्षा त्यांची वाट पाहते; आणि जे सुधारणेचा तिरस्कार करतील ते मृत्युमुखी पडतील.

  24. उपहास करणार्‍यांना सुधारणेचा राग येतो, म्हणून ते ज्ञानी लोकांस टाळतात.

  25. जीवनदायी शिक्षणाकडे जो काळजीपूर्वक लक्ष देतो, तो सुज्ञांसह वास करेल.