Skip to content

Reproof बद्दल बायबलमधील वचने

165 वचने · 70 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याऐवजी तुम्ही स्वर्गाच्या प्रभूच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या मंदिरातील पात्रे तुम्ही आपल्याकडे आणली. आपण स्वतः आणि आपले अधिकारी, राण्या, उपपत्नीसह द्राक्षारस प्याले. चांदी आणि सोने, कास्य, लोखंड, लाकूड आणि दगड या दैवतांची, ज्यांना पाहता येत नाही की ऐकता येत नाही की समजत नाही, त्यांची स्तुती केली. पण ज्यांच्या हातात तुमचे जीवन आणि तुमचे संपूर्ण मार्ग आहे त्या परमेश्वराचा तुम्ही आदर केला नाही.

  2. असे लोक आहे जे न्यायालयात न्यायाची बाजू घेणार्‍यांचा द्वेष आणि सत्य बोलणार्‍यांचा तिरस्कार करतात.

  3. परंतु माझ्याबाबतीत म्हणाल, तर याकोबाला त्याचे अपराध आणि इस्राएलला त्याचे पाप सांगण्यासाठी मी याहवेहच्या आत्म्याने, न्यायाने आणि सामर्थ्याने परिपूर्ण आहे.

  4. परंतु पुष्कळ परूशी व सदूकी लोक त्यांच्याकडे बाप्तिस्मा घेण्याच्या विचाराने येऊ लागले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो सापांच्या पिलांनो, येणार्‍या क्रोधापासून पळून जाण्यास तुम्हाला कोणी सावध केले?

  5. अरे ढोंगी माणसा! पहिल्याने तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ, मग तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्ट दिसेल.

  6. मग ज्या नगरांमध्ये सर्वात अधिक चमत्कार केले होते आणि तरीही त्यांनी पश्चात्ताप केला नाही, त्यांच्यावर येशूंनी टीका करण्यास सुरुवात केली.

  7. “खोराजिना, तुला धिक्कार असो! बेथसैदा, तुला धिक्कार असो! कारण जे चमत्कार तुमच्यामध्ये केले ते सोर आणि सीदोनात केले असते, तर त्यांनी गोणपाट नेसून आणि डोक्यात राख घालून केव्हाच पश्चात्ताप केला असता.

  8. परंतु मी तुम्हाला सांगतो, न्यायाचा दिवस तुमच्यापेक्षा सोर व सीदोनला अधिक सुसह्य असेल.

  9. हे कफर्णहूमा, तुला आकाशापर्यंत उंच केले जाईल काय? नाही, तू नरकात खोलवर जाशील, कारण जी अद्भुत कृत्ये मी तुझ्यात केली ती सदोममध्ये केली असती तर सदोम आजपर्यंत अस्तित्वात असते.

  10. परंतु मी तुम्हाला सांगतो की न्यायाचा दिवस तुमच्यापेक्षा सदोमाला अधिक सुसह्य असेल.”

  11. अहो ढोंग्यांनो! यशायाह संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे, तो म्हणतो:

  12. तुम्हाला अजून समजले नाही काय? पाच हजारांना पाच भाकरींनी जेवू घातले तेव्हा तुम्ही किती टोपल्या गोळा केल्या ते तुम्हाला आठवत नाही काय?

  13. तुम्हाला कसे समजत नाही की भाकरीविषयी मी बोलत नाही? परंतु परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असण्यास सांगत आहे.”

  14. येशूंनी उत्तर दिले, “हे विश्वासहीन व दुष्ट पिढी, आणखी किती काळ मी तुमच्याबरोबर राहिले पाहिजे? आणखी किती काळ मी सहन करू? त्या मुलाला माझ्याकडे आणा.”

  15. येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या अल्पविश्वासामुळे,” मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला आणि या डोंगराला तू इथून पलीकडे सरक, असे तुम्ही म्हणाला, तरी तो दूर सरकेल. तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही.

  16. “तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप केले असेल, तर त्याची चूक त्याला समजावून सांग, परंतु हे तुमच्या दोघांमध्ये असू दे. त्यांनी तुझे ऐकले, तर तू त्यांना परत मिळविले आहेस.

  17. जर त्यांनी ऐकले नाही तर, एक किंवा दोन साक्षीदारांना बरोबर घेऊन जा, म्हणजे ‘दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित होईल.’

  18. यावरही ते तुझे ऐकण्यास तयार झाले नाही, तर तुझा दावा मंडळीकडे घेऊन जा आणि मंडळीचेही ऐकण्याचे त्यांनी नाकारले, तर तो एखादा गैरयहूदी किंवा जकातदार आहे असे समजून तू त्याच्याशी वाग.

  19. ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, माझ्या घराला प्रार्थनेचे घर म्हणतील पण तुम्ही याला लुटारूंची गुहा केली आहे.”

  20. “अहो परूश्यांनो, आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, ढोंग्यांनो तुम्हाला धिक्कार असो. कारण तुम्ही लोकांच्या तोंडावर स्वर्गाचे द्वार बंद करता, स्वतःही प्रवेश करीत नाही, आणि जे प्रवेश करू इच्छितात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत.

  21. त्यांनी शिष्यांना विचारले, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हाला अद्यापही विश्वास नाही का?”

  22. “तुम्ही इतके मतिमंद आहात काय?” त्यांनी विचारले, “जे काही मनुष्यामध्ये बाहेरून शिरते ते त्याला अशुद्ध करू शकत नाही, हे तुम्ही पाहू शकत नाही काय?

  23. परंतु त्यांची चर्चा ऐकून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही भाकर नाही याबद्दल का बोलता? अजूनही तुम्ही पाहू शकत नाही किंवा समजू शकत नाही का? तुमची हृदये कठीण झाली आहेत का?

  24. नंतर अकरा शिष्य भोजन करण्यास बसले असताना, येशू त्यांना प्रकट झाले. ज्यांनी त्यांना मरणातून उठलेले पाहिले होते, त्यांच्या वार्तेवर त्यांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून त्यांनी अविश्वास व हृदयाच्या कठीणपणा बद्दल त्यांचा निषेध केला.

  25. योहानाने मांडलिक हेरोदाला दोष दिला, कारण त्याने आपल्या भावाची पत्नी हेरोदिया हिच्याशी विवाह केला आणि इतर अनेक वाईट गोष्टी केल्या,