Skip to content

Reproof बद्दल बायबलमधील वचने

165 वचने · 70 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याला शत्रूप्रमाणे लेखू नका, तर तुम्ही विश्वासणाऱ्या बंधूला द्याल त्याप्रमाणे त्याला ताकीद द्या.

  2. वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, तर तो जणू काही आपला पिताच आहे, असे मानून आदराने त्यांना बोध कर. जसे भावांशी बोलावे तसे तरुणांशी बोल.

  3. वयस्कर स्त्रियांना मातेसमान वागणूक दे आणि तरूणींविषयी केवळ शुद्ध भावना बाळगून त्यांना बहिणींसमान वागणूक दे.

  4. जे वडील पाप करीत असतात त्यांचा सर्वांच्यासमक्ष निषेध कर म्हणजे इतरांना त्याचे भय राहील.

  5. संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण याकरिता उपयोगी आहे.

  6. तू वचनाची घोषणा करीत राहा. वेळी अवेळी त्यामध्ये तत्पर राहा. सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर.

  7. कारण अनावर, व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे पुष्कळ लोक आहेत, त्यांच्यात विशेषकरून सुंता झालेल्या गटाचे आहेत.

  8. हा संदेश अगदी खरा आहे. यास्तव त्यांना कडकपणे ताकीद दे, जेणेकरून ते विश्वासात दृढ होतील,

  9. अधिकाराने या सर्व विषयांचे शिक्षण देऊन लोकांना बोध आणि प्रोत्साहित कर. यात कोणीही तुला तुच्छ मानू नये.

  10. अद्यापि “आज” म्हटलेला जो काळ आहे तोपर्यंत, दररोज एकमेकांना उत्तेजन द्या, म्हणजे पापाच्या कपटामुळे तुमचे मन कठीण होणार नाही.

  11. आणि तुम्हाला उद्देशून पिता आपल्या पुत्रास बोलतो ते परमेश्वराचे उत्तेजनाचे शब्द विसरलात काय? ते म्हणाले, “माझ्या पुत्रा, प्रभूच्या शिस्तीकडे दुर्लक्ष करू नकोस, त्याने तुझा निषेध केल्यास खचू नकोस,

  12. कारण प्रभू ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात, आणि ज्या प्रत्येकाला पुत्र म्हणून ते स्वीकार करतात त्याला फटकेही मारतात.”

  13. तुम्ही धीराने शिस्त सहन करत आहात; परमेश्वर तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितात आणि लेकरांना शिस्त लावत नाही असा कोण पिता आहे?

  14. ज्यांच्यावर मी प्रीती करतो, त्यांना मी दटावतो व शिक्षा देऊन शिस्त लावतो. म्हणून आस्थावान होऊन पश्चात्ताप करावा.

  15. उलट, आपला इतका छळ करणार्‍या या दोन संदेष्ट्यांच्या मृत्यूबद्दल सर्व जगभर लोक जागोजागी आनंदोत्सव करतील, एकमेकांना भेटी देतील.