Skip to content

Reproof बद्दल बायबलमधील वचने: General references

41 वचने · 70 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ ‘तुमच्याबरोबर असलेल्या इस्राएली मनुष्याचा तुमच्या अंतःकरणात द्वेष करू नये. तुमच्या शेजार्‍याला उघडपणे ताकीद द्यावी म्हणजे तुम्ही त्यांच्या पापाचे सहभागी होणार नाही.

  2. नीतिमान मला शासन करो—ते माझ्यासाठी कृपाच ठरेल; त्यांनी केलेली कान उघाडणी—मला तैलाभ्यंगासारखी वाटते. माझे मस्तक ते कधीही नाकारणार नाही, दुष्ट माणसांच्या दुराचाराविरुद्ध मी सतत प्रार्थना करेन.

  3. जो टवाळखोराची सुधारणा करतो, तो अपमानास आमंत्रण देतो; जो दुष्टाला धमकावितो त्याला अपशब्द ऐकावे लागतात.

  4. टवाळखोरांची कान उघाडणी करू नकोस, नाहीतर ते तुझा द्वेष करतील, सुज्ञ माणसांची कान उघाडणी कर आणि ते तुजवर प्रीती करतील.

  5. जो शिस्तीचे पालन करतो तो जीवनाचा मार्ग दाखवितो परंतु जो सुधारणा नाकारतो, तो दुसर्‍यांची दिशाभूल करतो.

  6. जो अनुशासन प्रिय असतो, त्याला ज्ञान प्रिय असते, परंतु ज्याला सुधारणा अप्रिय आहे, तो मूर्ख होय.

  7. जो शिक्षण नाकारतो, त्याला दारिद्र्य आणि लज्जा प्राप्त होतात, पण जो अनुशासन स्वीकारतो, त्याला सन्मान लाभेल.

  8. मूर्ख पुत्र आपल्या आईवडिलांचा सल्ला तुच्छ मानतो, पण जो सुधारणा अंमलात आणतो, तो सुज्ञपणा दाखवितो.

  9. जे सत्याचा मार्ग सोडतात, कठोर शिक्षा त्यांची वाट पाहते; आणि जे सुधारणेचा तिरस्कार करतील ते मृत्युमुखी पडतील.

  10. उपहास करणार्‍यांना सुधारणेचा राग येतो, म्हणून ते ज्ञानी लोकांस टाळतात.

  11. जीवनदायी शिक्षणाकडे जो काळजीपूर्वक लक्ष देतो, तो सुज्ञांसह वास करेल.

  12. जे शिस्तीकडे दुर्लक्ष करतात ते स्वतःचा तिरस्कार करतात, परंतु जो सुधारणेकडे लक्ष लावतो तो समंजसपणा प्राप्त करतो.

  13. मूर्खाला मारलेल्या शंभर फटक्यांपेक्षा विवेकी मनुष्याला रागावून बोललेला एक शब्द अधिक प्रभावी असतो.

  14. निंदकाला चाबकाचा मार द्या, म्हणजे साधाभोळा धडा शिकेल; सुज्ञांना फटकारणी करा, म्हणजे ते अधिक सुज्ञ होतील.

  15. जेव्हा टवाळखोरांना शिक्षा होते, ते बघून साधाभोळा मनुष्य शहाणा होतो; शहाण्या माणसांचे ऐकून ते ज्ञान मिळवितात.

  16. न्यायाधीशाने केलेली कान उघाडणी, ऐकणार्‍या कानासाठी सुज्ञ म्हणजे सोन्याचे कर्णफूल किंवा उत्तम सोन्याचा दागिना यासारखी आहे.

  17. मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर द्या, नाहीतर तो स्वतःला शहाणा समजू लागेल.

  18. उघडपणे कान उघाडणी करणे, गुप्त प्रीतीपेक्षा चांगले आहे.

  19. मित्राने केलेले घाव विश्वासयोग्य असतात, परंतु शत्रूची अनेक चुंबने कपटी होत.

  20. खोटी स्तुती करणारी जीभ असलेल्या मनुष्यापेक्षा, एखाद्याची कान उघाडणी करणारा, शेवटी कृपा प्राप्त करेल.

  21. सुज्ञानी व्यक्तीच्या निषेधाकडे लक्ष देणे मूर्खाचे गीत ऐकण्यापेक्षा उत्तम आहे.

  22. असे लोक आहे जे न्यायालयात न्यायाची बाजू घेणार्‍यांचा द्वेष आणि सत्य बोलणार्‍यांचा तिरस्कार करतात.

  23. “तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप केले असेल, तर त्याची चूक त्याला समजावून सांग, परंतु हे तुमच्या दोघांमध्ये असू दे. त्यांनी तुझे ऐकले, तर तू त्यांना परत मिळविले आहेस.

  24. जर त्यांनी ऐकले नाही तर, एक किंवा दोन साक्षीदारांना बरोबर घेऊन जा, म्हणजे ‘दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित होईल.’

  25. यावरही ते तुझे ऐकण्यास तयार झाले नाही, तर तुझा दावा मंडळीकडे घेऊन जा आणि मंडळीचेही ऐकण्याचे त्यांनी नाकारले, तर तो एखादा गैरयहूदी किंवा जकातदार आहे असे समजून तू त्याच्याशी वाग.