Skip to content

Reproof बद्दल बायबलमधील वचने: Fearlessly

5 वचने · 70 पैलू

Fearlessly बद्दल वचने

  1. तो म्हणाला, “हे मानवपुत्रा, ज्या राष्ट्राने माझ्याविरुद्ध बंड केले, अशा बंडखोर इस्राएल राष्ट्राकडे मी तुला पाठवित आहे; ते व त्यांचे पूर्वज यांनी आजपर्यंत माझ्याशी फितुरी केली आहे.

  2. ज्या लोकांकडे मी तुला पाठवित आहे ते उद्धट व हट्टी आहेत. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’

  3. ते ऐको किंवा न ऐकोत—कारण ते बंडखोर लोक आहेत—त्यांना कळेल की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा आहे.

  4. आणि हे मानवपुत्रा, त्यांना किंवा त्यांच्या शब्दांना घाबरू नकोस. तुझ्याभोवती झुडपे व काटे असतील आणि तू विंचवांमध्ये राहशील तरी घाबरू नकोस. जरी ते बंडखोर लोक आहेत तरी ते काय बोलतात त्याला तू घाबरू नकोस किंवा त्यांना भयभीत होऊ नकोस.

  5. तू माझे शब्द त्यांना सांगितले पाहिजे, मग ते ऐको किंवा न ऐकोत, कारण ते बंडखोर आहेत.