Skip to content

Reproof बद्दल बायबलमधील वचने: Ahijah

5 वचने · 70 पैलू

Ahijah बद्दल वचने

  1. जा, यरोबोअमला सांग, याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुला लोकांमधून वर काढले आणि माझ्या इस्राएली लोकांवर त्यांचा अधिकारी असे नेमले.

  2. दावीदाच्या घराण्यापासून राज्य फाडून ते मी तुला दिले, पण तू माझा सेवक दावीदाप्रमाणे नाहीस, त्याने माझ्या आज्ञा पाळल्या व त्याच्या आयुष्यभर त्यांचे अनुसरण केले आणि केवळ जे माझ्या दृष्टीने योग्य ते त्याने केले.

  3. पण तुझ्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा तू अधिक दुष्कर्मे केली आहेस. तू आपल्यासाठी इतर दैवत घडविलेस, धातूच्या मूर्ती बनविल्यास; तू माझा क्रोध पेटविला आहेस आणि माझ्याकडे पाठ केली आहेस.

  4. “ ‘यामुळे यरोबोअमच्या घरावर मी अरिष्ट आणणार आहे. मी इस्राएलातून यरोबोअमच्या घराण्याचा प्रत्येक शेवटचा पुरुष नष्ट करेन; मग तो गुलाम असो वा मोकळा असो. यरोबोअमचे घराणे संपूर्णपणे नष्ट होईपर्यंत शेणाप्रमाणे जाळून टाकीन.

  5. यरोबोअमच्या घराण्यातील जे कोणी शहरात मरण पावतील त्यांना कुत्रे खातील आणि जे शहराच्या बाहेर मरतील त्यांना पक्षी खाऊन टाकतील. याहवेहने हे म्हटले आहे!’