Reproof बद्दल बायबलमधील वचने: The Scriptures are profitable for
The Scriptures are profitable for बद्दल वचने
याहवेहचे नियम उत्कृष्ट आहेत; ते आत्म्याला ताजेतवाने करतात. याहवेहचे नियम विश्वसनीय आहेत, ते भोळ्यांना सुज्ञ करतात.
याहवेहचे नियम योग्य आहेत, ते हृदयास आनंद देतात, याहवेहच्या आज्ञा तेजस्वी आहेत, त्या नेत्रांना प्रकाश देतात.
याहवेहचे भय निर्मळ आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहेत. याहवेहचे निर्णय स्थिर आहेत, आणि ते सर्व पूर्णतः नीतिमान आहेत.
सोन्यापेक्षा ते अधिक मौल्यवान आहेत, अतिशुद्ध सोन्यापेक्षाही; ते मधापेक्षा मधुर आहेत, पोळ्यातील मधाहूनही ते अधिक गोड आहेत.
कारण ते तुमच्या सेवकांस सावध करतात; त्याचे पालन करणार्यास मोठे प्रतिफळ मिळते.
संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण याकरिता उपयोगी आहे.