मुख्य मजकुरावर जा

Prophecies Respecting Christ बद्दल बायबलमधील वचने

253 वचने · 66 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी तुमचे तारण माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.

  2. जे तुम्ही सर्व राष्ट्रांच्या नजरेसमोर सिद्ध केले आहे,

  3. ते गैरयहूदीयांसाठी प्रकटीकरणाचा प्रकाश, आणि आपल्या इस्राएली लोकांचे गौरव आहे.”

  4. ज्या नासरेथ गावी त्यांची वाढ झाली होती, तिथे ते आले व नेहमीप्रमाणे शब्बाथ दिवशी आपल्या प्रथेप्रमाणे सभागृहामध्ये पवित्रशास्त्र वाचण्यासाठी उभे राहिले.

  5. यशायाह संदेष्ट्याचे भविष्य असलेल्या अभिलेखाची गुंडाळी त्यांच्या हाती देण्यात आली आणि त्यांनी ती उघडली, ज्यात असे लिहिलेले होते:

  6. “परमेश्वराचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी प्रभूने माझा अभिषेक केला आहे. कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी, अंधांना दृष्टी देण्यासाठी, त्यांनी मला पाठविले आहे.

  7. प्रभूच्या कृपेचे वर्ष जाहीर करण्यास पाठविले आहे.”

  8. नंतर गुंडाळी गुंडाळून, ती सेवकाकडे दिली व ते खाली बसले. सभागृहामधील प्रत्येक व्यक्तीची नजर त्यांच्यावर एकवटली होती.

  9. येशू पुढे त्यांना म्हणाले, “हा शास्त्रलेख जो आज तुम्ही ऐकत आहात, तो पूर्ण झाला आहे.”

  10. पण त्यांनी उत्तर दिले, “मला परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता दुसर्‍या गावांमध्येही सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.”

  11. येशूंनी उत्तर दिले, “हे लक्षात ठेवा की कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मानवपुत्राला, डोके टेकण्यासही जागा नाही.”

  12. “हे पित्या, जर तुमची इच्छा असेल, तर हा प्याला माझ्यापासून दूर करा; तरी माझी इच्छा नाही तर तुमची पूर्ण होऊ द्या.”

  13. येशू आत्म्यामध्ये इतके व्याकूळ झाले की, त्यांनी अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्यांचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.

  14. त्या दिवशी हेरोद आणि पिलात मित्र झाले. त्याआधी ते एकमेकांचे शत्रू होते.

  15. तेव्हा येशू म्हणाले, “हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना समजत नाही.” आणि येशूंची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.

  16. ते येथे नाही, ते पुन्हा उठले आहेत! गालीलात असताना त्यांनी तुम्हाला काय सांगितले होते याची आठवण करा.

  17. तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यांना ओळखले. त्याच क्षणाला येशू त्यांच्यापासून अंतर्धान पावले.

  18. जमलेले लोक म्हणत होते, “प्रभू खरोखर उठले आहे व त्यांनी शिमोनाला दर्शन दिले आहे.”

  19. येशू त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांना सोडून स्वर्गात वर घेतले गेले.

  20. ते स्वतःच्या लोकांकडे आले, परंतु त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही.

  21. त्यानंतर यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला असताना येशू वर यरुशलेमास गेले.

  22. तिथे त्यांनी मंदिराच्या अंगणात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि पैसे बदलून देणारे लोक यांना पाहिले,

  23. तेव्हा त्यांनी दोर्‍यांचा एक चाबूक तयार केला आणि त्या सर्वांना मेंढरे आणि गुरे यांच्यासहित मंदिराच्या परिसरातून बाहेर घालविले आणि नाणी बदलून देणार्‍यांचे मेज पालथे करून त्यांची नाणी उधळून टाकली.

  24. मग जे कबुतरे विक्रेते होते त्यांना ते म्हणाले, “यांना येथून काढा! माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका!”

  25. तेव्हा शिष्यांना हा शास्त्रलेख आठवला: “तुझ्या मंदिराविषयीच्या ईर्षेने मला ग्रासून टाकले आहे.”