मुख्य मजकुरावर जा

Prophecies Respecting Christ बद्दल बायबलमधील वचने

253 वचने · 66 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि त्यांनी तुमच्यासाठी ख्रिस्त म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे, त्या येशूंना पाठवावे.

  2. तरी ज्याविषयी फार पूर्वीपासून परमेश्वराने आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते की सर्व गोष्टींची पुनर्स्थापना होईपर्यंत, त्यांना स्वर्गामध्ये राहणे अगत्याचे आहे.

  3. कारण मोशे म्हणाला, ‘प्रभू तुमचे परमेश्वर, तुमच्या लोकांतून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील; तो सांगेल ते सर्वकाही तुम्ही ऐका.

  4. खरोखर हेरोद राजा आणि राज्यपाल पंतय पिलात आणि सर्व गैरयहूदी आणि त्याचप्रमाणे या शहरात राहणारे इस्राएली लोक तुमचे पवित्र सेवक येशू, ज्यांचा तुम्ही अभिषेक केला आहे, त्यांच्याविरुद्ध कट कारस्थान करण्यास एकत्र आले.

  5. कशाप्रकारे परमेश्वराने नासरेथकर येशूंना पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला आणि ते सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करीत फिरत होते, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर होते.

  6. पेत्राबरोबर आलेले विश्वासणारे, ज्यांची सुंता झाली होती ते आश्चर्यचकित झाले, कारण त्यांनी पाहिले की गैरयहूदी लोकांवरसुद्धा पवित्र आत्मा ओतून दिला आहे.

  7. “त्यांचा पाण्याने बाप्तिस्मा करण्यास निश्चितच कोणीही हरकत घेणार नाही, कारण पवित्र आत्मा जसा आपल्याला मिळाला, तसा त्यांनाही मिळालेला आहे.”

  8. “परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे, याच मनुष्याच्या वंशामधून येशूंना इस्राएली लोकांसाठी त्यांचा तारणारा म्हणून आणले आहे.

  9. त्यांच्या पुत्राविषयी, जे शारीरिक दृष्टीने दावीदाचे वंशज होते,

  10. तर असा कोण आहे जो आपल्याला दंडाज्ञा देईल? कोणी नाही. ख्रिस्त येशू जे मरण पावले, इतकेच नव्हे तर जिवंत असे उठविले गेले आणि तेच आता परमेश्वराच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहेत.

  11. का नाही? कारण विश्वासाने नव्हे तर कर्माने मिळेल म्हणून ते त्याच्यामागे लागले. ते अडखळविणार्‍या धोंड्याला अडखळले.

  12. कारण ख्रिस्तानेसुद्धा स्वतःला संतुष्ट केले नाही, परंतु असे लिहिले आहे: “तुझा अपमान करणार्‍याने केलेला अपमान माझ्यावर आला आहे.”

  13. ही अभिवचने अब्राहाम व त्याच्या संतानाला दिली होती. शास्त्रलेख “आणि संतानांना” असे अनेक लोकांविषयी म्हणत नाही, तर “आणि तुझ्या संतानाला,” म्हणजे एका व्यक्तीविषयी म्हणतात, आणि ते ख्रिस्त आहे.

  14. परंतु काळाची पूर्णता झाल्यावर परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले; ते स्त्रीपासून जन्मलेले, नियमांच्या अधीन असे जन्मले होते.

  15. म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले;

  16. परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीभ कबूल करेल की येशू ख्रिस्त हेच प्रभू आहेत.

  17. पुत्र परमेश्वराच्या गौरवाचे प्रतिबिंब आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे हुबेहूब प्रतिरूप आहेत. ते आपल्या वचनाच्या महान शक्तीने सर्व गोष्टींना सुस्थिर ठेवतात. पापांची शुद्धी केल्यानंतर, ते स्वर्गामध्ये वैभवाच्या उजवीकडे बसले आहेत.

  18. ते असे महायाजक नाहीत जे आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती दर्शविण्यास असमर्थ आहे, परंतु असे आहेत जे सर्वप्रकारे आमच्यासारखेच पारखलेले होते तरी निष्पाप राहिले.

  19. त्याच प्रकारे ख्रिस्तानेही स्वतःला महायाजक होण्यासाठी गौरविले नाही. परंतु परमेश्वर त्याला म्हणाले, “तू माझा पुत्र आहे; आज मी तुझा पिता झालो आहे.”

  20. आणखी दुसर्‍या ठिकाणी ते असे म्हणाले, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहे.”

  21. परमेश्वर अब्राहामाची परीक्षा घेत असताना त्याने इसहाकाचे अर्पण केले आणि ज्याला वारसाचे वचन प्राप्त झाले होते तो अब्राहाम यज्ञवेदीवर आपल्या एकुलत्या एक पुत्राचा वध करण्यासाठी सिद्ध झाला;

  22. जरी परमेश्वराने अभिवचन दिले होते: “इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.”

  23. अब्राहामाने तर्क केला की इसहाक मरण पावला तरी परमेश्वर त्याला पुन्हा जिवंत करतील; आणि तसे म्हणावे तर त्याला इसहाक मरणातून पुन्हा जिवंत मिळाला.

  24. कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी एक दगड ठेवितो निवडलेला आणि मौल्यवान कोनशिला, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”

  25. आता जे तुम्ही विश्वास ठेवता, त्या तुम्हासाठी हा दगड अति मोलवान आहे. परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत, “जो दगड बांधणार्‍यांनी नाकारला, तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.”