मुख्य मजकुरावर जा

Prophecies Respecting Christ बद्दल बायबलमधील वचने

253 वचने · 66 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्या कोणाला परमेश्वराने पाठविले, ते परमेश्वराची वचने बोलतात, कारण परमेश्वर विपुलतेचा आत्मा देतात.

  2. मी स्वतःहून काही करू शकत नाही; मी ऐकतो त्याप्रमाणे न्याय करतो आणि माझा निर्णय योग्य आहे, कारण मी स्वतःस खुश करू इच्छित नाही, तर ज्यांनी मला पाठविले त्यांना खुश करू पाहतो.

  3. येशूंचे भाऊ त्यांना म्हणाले, “तुम्ही गालीलातून निघून यहूदीयात जा, म्हणजे तेथील तुमच्या शिष्यांना जे कार्य तुम्ही करता ते पाहावयास मिळेल.

  4. अधिकार्‍यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय?

  5. माझी आणखी काही मेंढरे आहेत, पण ती या मेंढवाड्यातील नाहीत. त्यांनासुद्धा मी माझ्या मेंढवाड्यात आणलेच पाहिजे. ते सुद्धा माझी वाणी ऐकतील आणि मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.

  6. मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी न्यायसभा बोलावली. ते विचारू लागले, “आपण काय साध्य केले आहे? या ठिकाणी हा मनुष्य अनेक चिन्हे करीत आहे.

  7. “मी तुम्हा सर्वांबद्दल बोलत नाही; मी ज्यांची निवड केली आहे ते मला माहीत आहेत. परंतु यासाठी की, ‘ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.’ हा शास्त्रलेखाचा भाग पूर्ण होण्यासाठी असे झाले आहे.

  8. असे बोलल्यानंतर, येशू आपल्या आत्म्यामध्ये व्याकूळ होऊन उत्तरले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्हातील एकजण मला विश्वासघाताने धरून देईल.”

  9. जे कोणीही केले नाही, ते कार्य मी त्यांच्यामध्ये केले नसते, तर ते दोषी समजले गेले नसते. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, त्यांनी आम्हा दोघांचा, म्हणजे माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला आहे.

  10. ‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला,’ असे त्यांच्या नियमात जे म्हटले आहे, ते पूर्ण झाले आहे.

  11. मग पिलात राजवाड्यामध्ये परतला आणि त्याने येशूंना आपल्यापुढे बोलावून विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”

  12. “ही तुमची स्वतःची कल्पना आहे की, इतरजण माझ्याबद्दल तुमच्याजवळ असे बोलले?” येशूंनी विचारले.

  13. तेव्हा प्रत्युत्तर करीत पिलात म्हणाला, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनीच तुला माझ्या स्वाधीन केले नाही का? तू काय केले?”

  14. मग येशूंनी उत्तर दिले, “माझे राज्य या जगाचे नाही. जर असते तर, यहूदी पुढार्‍यांनी मला अटक करू नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु आता माझे राज्य दुसर्‍या ठिकाणचे आहे.”

  15. यावरून पिलात त्याला म्हणाला, “मग तू राजा आहेस!” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता मी राजा आहे. खरेतर सत्याची साक्ष देण्यासाठीच माझा जन्म झाला व मी या जगात आलो. जे सत्याच्या बाजूचे आहेत, ते माझे ऐकतात.”

  16. मग पिलाताने येशूंना फटके मारविले.

  17. येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेले असे बाहेर आले, तेव्हा पिलात यहूद्यांना म्हणाला, “हा तो मनुष्य!”

  18. तिथे त्यांना आणि त्यांच्याबरोबर इतर दोघांना—त्यांच्या दोन्ही बाजूला एकएक व येशूंना त्यांच्यामध्ये असे क्रूसावर खिळले.

  19. परंतु जेव्हा ते येशूंजवळ आले, तेव्हा ते आधीच मरण पावल्याचे त्यांना दिसून आले, म्हणून त्यांनी येशूंचे पाय मोडले नाहीत.

  20. तरीपण, सैनिकांपैकी एकाने त्यांच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा रक्त व पाण्याचा ओघ बाहेर पडला.

  21. सैनिकांनी जे केले त्यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाले: “त्याच्या हाडांपैकी एकही हाड मोडले जाणार नाही,”

  22. आणि आणखी एक शास्त्रलेख असा आहे, “ज्याला त्यांनी भोसकले ते त्याच्याकडे पाहतील.”

  23. इतर शिष्य त्याला सांगू लागले, “आम्ही प्रभूला पाहिले!” परंतु तो त्यांना म्हणाला, “त्यांच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्यावाचून व जिथे खिळे ठोकले होते तिथे माझे बोट घातल्यावाचून आणि माझा हात त्यांच्या कुशीत घातल्यावाचून मी विश्वास ठेवणार नाही.”

  24. असे म्हटल्यानंतर ते त्यांच्या नजरेसमोर वर घेतले गेले आणि ढगांनी त्यांना त्यांच्या दृष्टिआड केले.

  25. पुढे होणार्‍या गोष्टी पाहता, तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल बोलला, की त्यांना अधोलोकात राहू दिले नाही किंवा त्यांच्या देहाला कुजणे पाहू दिले नाही.