Prophecies Respecting Christ बद्दल बायबलमधील वचने: His being hated by the Jews
His being hated by the Jews बद्दल वचने
माझा विनाकारण द्वेष करणार्यांची संख्या माझ्या डोक्यावरील केसांपेक्षा अधिक आहेत; पुष्कळ लोक विनाकारण माझे शत्रू झाले आहेत. मला नष्ट करण्याची त्यांची इच्छा आहे. मी जे चोरले नाही, त्याची भरपाई करण्याची माझ्यावर बळजबरी होत आहे.
ज्याला राष्ट्रांनी तुच्छ व घृणास्पद मानलेले आहे, जो शासनकर्त्यांचा सेवक आहे, त्याला: उद्धारकर्ता आणि इस्राएलचे पवित्र परमेश्वर, याहवेह असे म्हणतात— “जेव्हा राजे तुला बघतील तेव्हा ते उठून उभे राहतील, अधिपती तुला लवून मुजरा करतील, कारण याहवेहने, जे विश्वसनीय आहेत, जे इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत, त्यांनी तुला निवडले आहे.”