Skip to content

Prayer बद्दल बायबलमधील वचने

720 वचने · 120 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा दानीएलला हे फर्मान निघाल्याचे समजले, तेव्हा तो घरी गेला व माडीवर खोलीत गेला. या खोलीच्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेकडे उघडलेल्या होत्या. आपल्या नित्याच्या रिवाजाप्रमाणे दिवसातून तीन वेळा त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि त्याच्या परमेश्वराचे आभार मानले.

  2. तेव्हा मी याहवेह परमेश्वराकडे वळून प्रार्थना आणि उपवास करून आणि गोणपाट नेसून आणि अंगाला राख फासून त्यांना विनंती केली.

  3. याहवेह माझ्या परमेश्वराला मी प्रार्थना केली आणि पापे कबूल केली: “हे याहवेह, महान व प्रतापी परमेश्वरा, तुमच्यावर प्रीती करणार्‍यांना आणि तुमच्या आज्ञा पाळणार्‍यांकरिता तुम्ही केलेला तुमच्या प्रीतीचा करार पाळता,

  4. परंतु आम्ही पाप आणि चूक केली आहे. आम्ही दुष्ट आणि बंडखोर आहोत; तुमच्या आज्ञांपासून आणि नियमांपासून आम्ही बहकलो आहोत.

  5. आम्ही तुमचे सेवक संदेष्टे जे तुमच्या नावाने आमचे राजे, आमचे राजपुत्र आणि आमचे पूर्वज आणि देशातील सर्व लोकांना तुमच्या नावाने संदेश देत असत, त्यांचे आम्ही ऐकले नाही.

  6. “हे प्रभू, तुम्ही नीतिमान आहात, परंतु आज आम्ही लज्जित झालो आहोत; यहूदीयात राहणारे, यरुशलेमात राहणारे, जवळ व दूर राहणारे सर्व इस्राएली लोक आणि ज्यांना तुमच्याविरुद्ध केलेल्या अविश्वासाच्या कृत्यांमुळे सर्व देशांमध्ये तुम्ही घालवून दिले.

  7. हे याहवेह, आम्ही, आमचे राजे, आमचे राजपुत्र, आणि आमचे पूर्वज फार लज्जित आहोत, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

  8. जरी आम्ही त्यांच्याविरुद्ध बंडखोरी केली, तरीही याहवेह आमचे परमेश्वर दयाळू आणि क्षमा करणारे आहेत;

  9. आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही आणि त्यांनी आपल्या सेवक संदेष्ट्यांच्या मार्फत दिलेले नियम आम्ही पाळले नाही.

  10. सर्व इस्राएली लोकांनी तुमच्या नियमांचे आज्ञाभंग केले आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यास आपली पाठ फिरविली आहे. “म्हणूनच परमेश्वराचा सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात लिहून ठेवलेले शाप आणि शपथेवरचा दंड आमच्यावर ओतला गेला आहे, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

  11. आमच्यावर मोठी संकटे आणून तुम्ही आम्हाला आणि आमच्या अधिपतींविरुद्ध दिलेले वचन पूर्ण केले आहे. संपूर्ण स्वर्गाच्या खाली असे काहीही झाले नाही, जसे यरुशलेमसोबत करण्यात आले.

  12. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आमच्याविरुद्ध लिहून ठेवलेली सर्व संकटे आमच्यावर आली आहेत, तरीही आमच्या अपराधांपासून वळून आणि तुमच्या सत्याकडे लक्ष लावण्यास आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराला विनंती केली नाही.

  13. म्हणूनच याहवेहने कोणताही संकोच बाळगता आमच्यावर संकटे पाठविली, कारण याहवेह आमचे परमेश्वर जे काही करतात त्यामध्ये ते नीतिमान आहेत; तरीही आम्ही त्यांच्या आज्ञा पाळल्या नाहीत.

  14. “आणि आता याहवेह आमच्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या महान हातांनी तुमच्या लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले आणि आपल्या नावाची महिमा प्रस्थापित केली, जी आजपर्यंत आहे. आम्ही पाप केले आणि आम्ही चूक केली.

  15. हे प्रभू, तुमच्या पूर्ण न्यायकृत्यांप्रमाणे तुमच्या यरुशलेम नगरांवरून, तुमच्या पवित्र डोंगरावरील तुझ्या विश्वसनीय करुणेमुळे यरुशलेमवरील, तुझ्या स्वतःच्या नगरीवरील, तुझ्या पवित्र डोंगरावरील, तुमचा क्रोध आणि राग दूर करा. कारण आमच्या पातकांमुळे आणि आमच्या पूर्वजांच्या अपराधांमुळे यरुशलेम आणि तुमचे लोक सभोवतालच्या सर्वांना निंदा असे झालो आहोत.

  16. “आता हे आमच्या परमेश्वरा, आपल्या दासाची प्रार्थना आणि विनवणी ऐका. याहवेह, उजाड झालेल्या तुमच्या पवित्रस्थानावर तुमचे मुखतेज पडू द्या.

  17. हे आमच्या परमेश्वरा कान द्या आणि ऐका; आपले डोळे उघडा आणि ज्या नगरास तुमचे नाव दिले आहे ते कसे उद्ध्वस्त झाले आहे ते पाहा. आम्ही नीतिमान आहोत म्हणून विनवणी करीत आहोत असे नाही, परंतु तुमची दया विपुल आहे.

  18. हे याहवेह, ऐका! हे याहवेह, क्षमा करा! हे याहवेह, ऐका आणि कृती करा. अहो माझ्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या स्वतःकरिता विलंब करू नका, कारण तुमच्या नगराला आणि तुमच्या लोकांना तुमचे नाव दिले आहे.”

  19. तो स्वर्गदूताशी झगडला आणि त्याच्यावर विजयी झाला; तो रडला आणि त्याची मेहेरबानी व्हावी म्हणून त्याने भीक मागितली. बेथेलला ते त्याला भेटले आणि तिथे तो त्यांच्याशी बोलला—

  20. याहवेहसमोर सेवा करणार्‍या याजकांनी, द्वारमंडप आणि वेदी यांच्यामध्ये रडत उभे राहावे. आणि त्यांनी असे म्हणावे, “हे याहवेह, तुमच्या लोकांना वाचवा, आपल्या वतनाला राष्ट्रांमध्ये अप्रतिष्ठा किंवा चेष्टेचे कारण होऊ देऊ नका. ‘त्यांचा परमेश्वर कुठे आहे?’ असे त्यांनी लोकांमध्ये का म्हणावे.”

  21. मग याहवेहने आपल्या देशासाठी ईर्ष्या धरली, आणि ते आपल्या लोकांवर दया करतील.

  22. याहवेहने त्यांना उत्तर दिले: “मी तुम्हाला धान्य, नवा द्राक्षारस व जैतून तेल पाठवित आहे, जे तुम्हाला तृप्त करण्यास भरपूर आहे; पुन्हा कधीही मी तुम्हाला राष्ट्रांमध्ये उपहासाचा विषय होऊ देणार नाही.

  23. आणि प्रत्येकजण जो प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल; कारण याहवेहने म्हटले आहे सीयोन डोंगरावर आणि यरुशलेममध्ये व जे उरलेले असतील ते वाचतील आणि ज्यांना याहवेहने बोलाविले ते सुद्धा तारण पावतील.

  24. याहवेह इस्राएलाच्या लोकांना असे म्हणतात, “मला शोधा म्हणजे तुम्ही जिवंत राहाल.

  25. बेथेलचा शोध करू नका, गिलगाल येथे जाऊ नका, किंवा बेअर-शेबा येथे प्रवास करू नका. कारण गिलगाल खचितच बंदिवासात जाईल, आणि बेथेलचा पूर्ण नाश होईल”