मुख्य मजकुरावर जा

Praise बद्दल बायबलमधील वचने

490 वचने · 106 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमचा प्रकाश आणि तुमचे सत्य मला लाभोत; तीच मला मार्ग दाखवोत; तुमच्या पवित्र पर्वतावरील, तुमच्या निवासमंडपात, तीच मला घेऊन जावोत.

  2. तेव्हा मी परमेश्वराच्या वेदीजवळ जाईन, तेच परमेश्वर जे माझे परमानंद आहेत; आणि तिथे हे परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, वीणेवर मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.

  3. संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. अहो सर्व लोकांनो, टाळ्या वाजवा; उत्साहपूर्ण शब्दांनी परमेश्वराचा जयजयकार करा.

  4. परमेश्वराची स्तुती गा, स्तुती गा; आमच्या राजाची स्तुती गा, स्तुती गा.

  5. कारण परमेश्वर अखिल पृथ्वीचे राजाधिराज आहेत; त्यांच्याप्रीत्यर्थ स्तुतिस्तोत्रे गा.

  6. एक गीत. कोरहाच्या पुत्रांची एक स्तोत्र रचना. याहवेह महान आहेत, आमच्या परमेश्वराच्या नगरामध्ये, त्यांच्या पवित्र पर्वतावर ते सर्वोच्च स्तुतीस पात्र आहेत.

  7. जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ करतो तो माझे गौरव करतो आणि जो कोणी आपले आचरण यथायोग्य ठेवतो, त्याला मी परमेश्वराचे तारण दाखवेन.”

  8. प्रभू, माझे ओठ उघडा, म्हणजे माझे मुख तुमची स्तुती करेल.

  9. कारण तुम्ही जे काही केले त्याबद्दल तुमच्या विश्वासू लोकांसमक्ष मी सदासर्वकाळ तुमची स्तुती करेन. आणि मी तुमच्या नावाची आशा करेन, कारण तुमचे नाव चांगले आहे.

  10. परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन, याहवेहमध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन—

  11. माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला नवस केला आहे; मी तुम्हाला उपकारस्तुतीची अर्पणे करेन.

  12. हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे, माझे अंतःकरण खंबीर आहे; मी तुमची स्तुती करीत गायन आणि वादन करणार.

  13. हे माझ्या जिवा, जागृत हो! अगे सारंगी, आणि वीणे, जागृत व्हा! मी प्रातःकाळाला जागृत करेन.

  14. हे प्रभू, मी प्रत्येक राष्ट्रात तुमची स्तुती करेन, मी सर्व लोकात तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.

  15. हे माझ्या सामर्थ्या, तुमची स्तुतिस्तोत्रे मी गात आहे, कारण हे माझ्या दयाळू परमेश्वरा, तुम्हीच माझ्या सुरक्षिततेचे उंच दुर्ग आहात.

  16. म्हणजे मी तुमच्या नावाला सतत धन्यवाद देईन आणि दररोज माझी शपथ पूर्ण करेन.

  17. कारण तुमची प्रीती जीवनाहून उत्तम आहे, माझे ओठ तुमचे गौरव करतील.

  18. माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला धन्यवाद देईन आणि माझे हात तुमच्या नावाने उंच करेन.

  19. उत्कृष्ट भोजनाने व्हावे तसा मी तृप्त होईल; गीत गाणार्‍या ओठांनी मी तुमची स्तुती करेन.

  20. माझ्या बिछान्यावर मी तुमचे स्मरण करतो; रात्रीच्या प्रत्येक प्रहरी मी तुमचे मनन करतो.

  21. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. एक गीत. हे परमेश्वरा, तुमची स्तुती सीयोनेत अपेक्षित आहे; तुम्हाला केलेला नवस तिथे पूर्ण करण्यात येईल.

  22. संगीत दिग्दर्शकासाठी. एक गीत. एक स्तोत्र. अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, आनंदाने परमेश्वराचा जयजयकार करा!

  23. त्यांच्या गौरवशाली नावाचा महिमा गा; ते किती अद्भुत आहेत, हे जगाला सांगा.

  24. पृथ्वीवरील सर्व लोक तुमच्यासमोर नतमस्तक होतील; ते तुमच्या गौरवांची गीते गातील, ते तुमच्या नावाच्या गौरवांची गीते गातील.” सेला

  25. अहो सर्व लोकहो. परमेश्वराची स्तुती करा, त्यांची स्तुतिस्तोत्रे ऐकू येवो.