Asaph
Asaph चा उल्लेख असलेली वचने
हेमानाचा भाऊ आसाफ त्याच्या उजवीकडे उभा राहात असे: आसाफ जो बेरेख्याहचा पुत्र, जो शिमाचा पुत्र,
लेवी लोकांनी योएलचा पुत्र हेमान, बेरेख्याहचा पुत्र आसाफ व मरारी कुटुंबातील कुशायाहचा पुत्र एथान, हे प्रमुख वादक नेमले.
संगीतकार हेमान, आसाफ व एथान यांना कास्याच्या झांजा वाजविण्यासाठी नेमले होते.
वादकांचा प्रमुख आसाफ, पुढच्या श्रेणीत जखर्याह, येइएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्याह, एलियाब, बेनाइयाह, ओबेद-एदोम व ईयेल हे सतार व वीणा वाजवित, व आसाफ उंच स्वरात झांज वाजवित असे.
त्या दिवसापासून दावीदाने याहवेहची अशा प्रकारे उपकारस्तुती करण्यासाठी आसाफ व त्याचे सहायक नेमले:
दररोज गरजेप्रमाणे आसाफ आणि त्याचे भाऊबंद यांची याहवेहच्या कोशाची नियमितपणे करारबद्ध सेवा करण्यासाठी दावीदाने नेमणूक केली.
दावीद व निवासमंडपाचे अधिकारी यांनी आसाफ, हेमान व यदूथूनच्या काही पुत्रांना सतारी, वीणा व झांजा वाजवून संदेशाची सेवा करण्यासाठी वेगळे केले. त्यांच्या सेवेनुसार त्यांची यादी अशी आहे:
आसाफच्या पुत्रा मधून: जक्कूर, योसेफ, नथन्याह आणि अशारेलाह. राजाच्या देखरेखीत आसाफ संदेश देत असे, त्याच्या देखरेखीत त्याचे पुत्र कार्य करीत.
हे सर्वजण याहवेहच्या मंदिरात आपल्या पित्याच्या नेतृत्वाखाली झांजा, सतारी व वीणा वाजवून परमेश्वराच्या भवनात सेवा करीत असत. आसाफ, यदूथून व हेमान राजाच्या नेतृत्वाखाली कार्य करीत.
पहिली चिठ्ठी निघाली आसाफ, योसेफ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, दुसरी गदल्याहची, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
सर्व लेवीय जे संगीतकार होते—आसाफ, हेमान, यदूथून आणि त्यांचे पुत्र आणि नातेवाईक—वेदीच्या पूर्व बाजूला उत्तम तागाची वस्त्रे घातलेले आणि झांजा, सारंग्या आणि वीणा वाजवित एकशेवीस याजक उभे राहिले.
तेव्हा जखर्याहचा मुलगा यहजिएल, जो बेनाइयाहचा पुत्र, जो ईयेलचा पुत्र, जो मत्तन्याहचा पुत्र, लेवी आणि आसाफ याचा वंशज त्याच्यावर याहवेहचा आत्मा आला व तो सभेमध्ये उभा राहिला.
एलीजाफानच्या वंशातील: शिम्री आणि ईयेल; आसाफाच्या वंशातील: जखर्याह आणि मत्तन्याह;
राजा हिज्कीयाह आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी लेवींना दावीद आणि संदेष्टा आसाफ यांच्या शब्दांमध्ये याहवेहची स्तुती करण्याचा आदेश दिला. म्हणून त्यांनी आनंदाने स्तुतिगीते गायली आणि खाली वाकून आराधना केली.
दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदूथून त्यांनी नेमून दिल्याप्रमाणे आसाफाचे वंशज जे संगीतकार होते त्यांनी आपआपले स्थान ग्रहण केले. प्रत्येक फाटकावरच्या द्वारपालांना त्यांचे काम सोडण्याची गरज नव्हती, कारण त्यांचे सहकारी लेव्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली होती.
संगीतकार: आसाफचे वंशज 128,
बांधकाम करणार्यांनी याहवेहच्या मंदिराच्या पायाचे बांधकाम पूर्ण केले, तेव्हा याजकांनी आपले याजकीय पोशाख घातले व आपल्या तुतार्या वाजविल्या. आसाफाच्या वंशातील लेव्यांनी आपल्या झांजा वाजविल्या. इस्राएलच्या दावीद राजाने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे त्यांनी याहवेहची स्तुती केली.
संगीतकार: आसाफचे वंशज 148.
यरुशलेमच्या लेव्यांवर व परमेश्वराच्या भवनात सेवेकर्यांचा प्रमुख अधिकारी उज्जी, हा बानीचा पुत्र, तो हशब्याहाचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, जो मीखाहचा पुत्र होता. उज्जी, हा आसाफाचा वंशज होता. त्याचे कूळ परमेश्वराच्या भवनातील संगीतकार म्हणून सेवा करीत होते.
तसेच काही याजकांनी कर्णे वाजविले आणि जखर्याह, योनाथानाचा पुत्र, तो शमायाहचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, तो मिखायाहचा पुत्र, तो जक्कूराचा पुत्र, तो आसाफाचा पुत्र होता,
दावीदाच्या व आसाफाच्या काळापासून संगीतकारांसाठी संचालक नेमण्याची व परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे व उपकारस्तुती गाण्यास सुरुवात झाली होती.
आसाफाचे स्तोत्र. सर्वसमर्थ याहवेह, परमेश्वर पृथ्वीला, सूर्याच्या उगविण्यापासून तो जिथे मावळतो तिथपर्यंत हाक मारून बोलवितात.
आसाफाचे स्तोत्र. निश्चितच परमेश्वर इस्राएलसाठी, जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत, त्यांच्यासाठी चांगले आहेत.
आसाफाचे मासकील हे परमेश्वरा, तुम्ही आम्हाला कायमचे टाकून दिले आहे का? स्वतःच्या कुरणातील कळपावर तुमचा क्रोधाग्नी एवढा का भडकला आहे?
संगीत दिग्दर्शकासाठी. अल्तश्केथ या चालीवर आधारित. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत हे परमेश्वरा, आम्ही तुमची उपकारस्तुती करतो, तुमची उपकारस्तुती करतो, कारण तुमचे नाव समीप आहे; लोक तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करतात.