मुख्य मजकुरावर जा

Asaph

34 वचने · 5 कुटुंब सदस्य

Asaph चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत. परमेश्वर यहूदीयात प्रसिद्ध आहेत; इस्राएलमध्ये त्यांचे नाव थोर आहे.

  2. संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनसाठी. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत. मी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला; परमेश्वराने माझे ऐकावे म्हणून मी त्यांचा धावा केला.

  3. आसाफाचे मासकील. अहो माझ्या लोकांनो, माझे विधिनियम ऐका; माझ्या मुखातून निघणार्‍या वचनाकडे कान द्या.

  4. आसाफाचे एक स्तोत्र. हे परमेश्वरा, इतर राष्ट्रांनी तुमच्या वतनावर आक्रमण केले आहे; त्यांनी तुमचे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे, आणि यरुशलेम नगरी नासधुशीचा ढीग झाली आहे.

  5. संगीत निर्देशकाकरिता. “कराराची कुमुदिनी” च्या चालीवर आधारित. आसाफाची रचना. एक स्तोत्र. इस्राएलाच्या मेंढपाळा, आमचा धावा ऐका, तुम्हीच योसेफाला मेंढरांच्या कळपाप्रमाणे चालविले. करुबांच्या मध्ये विराजमान असलेले, तुमचे तेजस्वी गौरव प्रगट करा.

  6. संगीत निर्देशकाकरिता. “गित्तीथ” वर आधारित. आसाफाची रचना. परमेश्वर, जे आमचे सामर्थ्य आहेत, त्यांच्यासाठी हर्षाने गा; याकोबाच्या परमेश्वरासाठी जयघोष करा!

  7. आसाफाचे एक स्तोत्र. परमेश्वराने महासभेत आपले स्थान ग्रहण केले आहे; त्यांनी “दैवतांसमोर” आपला न्याय जाहीर केला आहे:

  8. एक गीत. आसाफाचे एक स्तोत्र. हे परमेश्वरा, तुम्ही मौन धरू नका; आमच्यासाठी कान बहिरे करू नका, असे अलिप्त राहू नका.

  9. तेव्हा हिल्कियाहचा पुत्र एल्याकीम त्याच्या राजवाड्याचा कारभारी, चिटणीस शेबना व इतिहासलेखक योवाह जो आसाफाचा पुत्र, त्याच्याकडे गेले.