- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Praise बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
महासभेत उभा राहून तुमची स्तुती करण्याची प्रेरणा तुमच्याकडूनच येत आहे; तुमचे भय धरणार्यांपुढे मी माझे नवस फेडीन.
अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा; प्राचीन द्वारांनो, उच्च व्हा; गौरवाच्या राजाला आत प्रवेश करू द्या.
असा गौरवशाली राजा कोण आहेत? याहवेह जे समर्थ व प्रबळ आहेत, जे युद्धात पराक्रमी आहेत.
अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा; प्राचीन द्वारांनो, सताड उघडा; महातेजस्वी महाराज आत येतील.
हा गौरवशाली राजा कोण आहेत? सर्वशक्तिमान याहवेह— तेच आहेत गौरवशाली राजा. सेला
माझे पाय सपाट जमिनीवर स्थिर आहेत; महासभेत मी याहवेहची जाहीरपणे स्तुती करेन.
माझ्या सभोवती असणार्या शत्रूंसमोर माझे मस्तक उंच करतील. मी त्यांच्या पवित्र मंडपात हर्षगर्जना करून यज्ञ अर्पण करेन; मी गायन व संगीताने माझ्या याहवेहची स्तुती करेन.
याहवेहची स्तुती करा, कारण त्यांनी माझी दयेची आरोळी ऐकली आहे.
याहवेह माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहेत; माझे हृदय त्यांच्यावर भरवसा ठेवते, तेच माझे साहाय्य करतात. माझे अंतःकरण आनंदाने उड्या मारत आहे, माझ्या गीताद्वारे मी त्यांचे स्तवन करेन.
अहो याहवेहच्या भक्तांनो, त्यांची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.
नीतिमान लोकांनो, याहवेहमध्ये आनंद आणि हर्ष करा; तुम्ही जे सरळ मनाचे आहात, ते आनंदाने आरोळ्या मारा.
अहो नीतिमान लोकांनो, याहवेहमध्ये आनंद करा, कारण त्यांची प्रशंसा करणे सरळ माणसांना शोभादायक आहे.
वीणेवर याहवेहस धन्यवाद द्या; दशतंतू वाद्यावर त्यांचे संगीत गा.
त्यांच्यापुढे नवीन गीत गा; जयघोष करीत कुशलतेने वाद्ये वाजवा.
दावीदाचे स्तोत्र; जेव्हा अबीमेलेखापुढे त्याने वेडा झाल्याचे ढोंग केल्यावर त्याला हाकलून लावण्यात आले आणि तो निघून गेला. मी सर्व समयी याहवेहचा धन्यवाद करेन; माझ्या ओठांनी मी त्यांची निरंतर स्तुती करेन.
याहवेहने माझ्यावर केलेल्या दयेची मी प्रतिष्ठा मिरवीन; हे ऐकून दीनजन हर्ष करोत.
तुम्ही माझ्याबरोबर याहवेहची स्तुती करा; आपण सर्व मिळून त्यांच्या नावाला उंच करू या.
महासभेत मी तुमचे आभार व्यक्त करेल; मोठ्या मेळाव्यासमोर मी तुमची उपकारस्तुती करेन.
माझी जीभ तुमच्या नीतिमत्वाची घोषणा करणार आणि दिवसभर तुमची उपासना करीत राहणार.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. मी धीराने याहवेहची वाट पाहिली; तेव्हा त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले आणि माझी आरोळी ऐकली.
निसरड्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्यांनी मला बाहेर काढले; त्यांनी माझी पावले खडकावर ठेवली, आणि त्यांनी मला उभे राहण्यास भक्कम ठिकाण दिले.
त्यांनी आपल्या परमेश्वराचे स्तवन करण्यास माझ्या मुखात नवीन गीत दिले. हे अनेकजण पाहतील व याहवेहचे भय धरतील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतील.
इस्राएलचे परमेश्वर, याहवेह, जे अनादिकालापासून अनंत काळापर्यंत आहेत त्यांची स्तुती असो.
या गोष्टींची आठवण करून माझा आत्मा तुटत आहे: कसे मी परमेश्वराच्या भवनाकडे जाणार्या विशाल गर्दीचे नेतृत्व करीत होतो. त्यावेळी उत्सवाच्या वातावरणात आनंद, जयघोष आणि आभार यांचा आवाज प्रतिध्वनित होत होता.
हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? आतल्याआत का तू तळमळत आहेस? परमेश्वराची आशा धर. मी अजूनही माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती पुनः करेन.