Skip to content

Praise बद्दल बायबलमधील वचने: Unclassified scriptures relating to

362 वचने · 106 पैलू

Unclassified scriptures relating to बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्या सर्वसमर्थ परमेश्वराने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले ते परमेश्वर धन्यवादित असो.” मग अब्रामाने मलकीसदेकाला सर्वांचा दहावा भाग दिला.

  2. नंतर मोशे व इस्राएली लोकांनी याहवेहप्रीत्यर्थ हे गीत गाईले: “मी याहवेहला गीत गाईन, कारण ते अत्युच्च आहेत. घोडे व त्यांचे स्वार त्यांनी समुद्रात फेकले आहेत.

  3. “याहवेह माझे सामर्थ्य व माझे संरक्षण आहेत; याहवेह माझे तारण झाले आहेत. तेच माझा परमेश्वर आहेत आणि मी त्यांची स्तुती करेन, माझ्या पूर्वजांचे परमेश्वर, मी त्यांचा महिमा वर्णीन.

  4. तेच तुमच्या स्तुतीचा विषय आहे; तेच तुमचे परमेश्वर आहेत, त्यांनी केलेले महान व भयावह चमत्कार तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहेत.

  5. “अहो राजांनो हे ऐका! अधिपतींनो कान द्या! मी स्वतः याहवेहची स्तुती करेन; मी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराची स्तुती गाईन.

  6. “स्तुतीस योग्य याहवेहचा, मी धावा केला, आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली.

  7. आकाशे हर्ष करोत, पृथ्वी उल्लास करो; त्यांनी राष्ट्रांना हे सांगावे, “याहवेह राज्य करतात!”

  8. वनातील सर्व झाडे गुणगान करो, आनंदाने याहवेहची स्तुती करा, कारण ते पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहेत.

  9. याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.

  10. इस्राएलचे परमेश्वर याहवेहची, अनादिकालापासून अनंतकालापर्यंत स्तुती होवो. मग सर्व लोकांनी म्हटले “आमेन! याहवेहची स्तुती होवो.”

  11. दररोज सकाळी याहवेहसमोर उभे राहून ते उपकारस्तुतीचे स्तवनगान करीत असत व संध्याकाळीही ते हीच कामे करीत.

  12. जेव्हा सर्व इस्राएली लोकांनी पाहिले की, अग्नी खाली उतरत आहे आणि याहवेहचे गौरव मंदिराच्या वर आहे तेव्हा त्यांनी पदपथावर गुडघे टेकून त्यांची मुखे जमिनीकडे केली आणि आराधना केली आणि याहवेहना असे म्हणत धन्यवाद दिला, “ते चांगले आहेत; त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.”

  13. मग लेवी—येशूआ, कदमीएल, बानी, हशबन्याह, शेरेब्याह, होदीयाह, शबन्याह व पथह्याह—हे लोकांना म्हणाले: “उभे राहा आणि याहवेह तुमच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते अनादि काळापासून शाश्वत परमेश्वर आहेत.” “तुमचे वैभवी नाव धन्य असो आणि ते सर्व प्रशंसा व स्तवनाच्या उच्चस्थानी राहो.

  14. केवळ तुम्हीच एकटे याहवेह आहात. तुम्ही आकाश, अत्युच्च स्वर्ग व त्यातील सर्व तारकामंडल, पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे. तुम्ही सर्वांना जीवन देता आणि स्वर्गातील असंख्य सेना तुमची आराधना करतात.

  15. ज्या कृत्यांबद्दल लोकांनी गीते गाऊन स्तुती केली, ती त्यांची कृत्ये आठवून त्यांची प्रशंसा कर.

  16. याहवेहच्या न्यायीपणाबद्दल मी ॠणी राहीन. परमोच्च याहवेहच्या नावाची मी स्तुतिस्तोत्रे गाईन.

  17. लेकरे आणि तान्ह्या बालकांच्या स्तुतीद्वारे तुमचे शत्रू व विरोध्यांना शांत करण्यासाठी शत्रूविरुद्ध बळ स्थापित केले आहे.

  18. सीयोनच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या याहवेहची स्तुतिस्तोत्रे गा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रांमध्ये जाहीर करा.

  19. स्तुतीस योग्य याहवेहचा मी धावा केला, आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली.

  20. याहवेह, तुम्ही आपल्या शक्तीने उंचविले जावो; आम्ही तुमच्या सामर्थ्याचे गुणगान व स्तुतिगान करू.

  21. मी तुमचे नाव माझ्या लोकांसमोर जाहीर करेन; मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन करेन.

  22. जे याहवेहचे भय बाळगतात, ते तुम्ही त्यांची स्तुती करा! याकोब वंशजहो, त्यांचा सन्मान करा! इस्राएलचे वंशजहो, त्यांचा आदर करा.

  23. महासभेत उभा राहून तुमची स्तुती करण्याची प्रेरणा तुमच्याकडूनच येत आहे; तुमचे भय धरणार्‍यांपुढे मी माझे नवस फेडीन.

  24. अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा; प्राचीन द्वारांनो, उच्च व्हा; गौरवाच्या राजाला आत प्रवेश करू द्या.

  25. असा गौरवशाली राजा कोण आहेत? याहवेह जे समर्थ व प्रबळ आहेत, जे युद्धात पराक्रमी आहेत.