Skip to content

Praise बद्दल बायबलमधील वचने: His mercy

32 वचने · 106 पैलू

His mercy बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लोकांबरोबर सल्लामसलत केल्यावर, यहोशाफाटने पुरुषांची नियुक्ती केली, याहवेहची स्तुती गाण्यासाठी आणि त्यांच्या पवित्रतेच्या वैभवाबद्दल त्यांची स्तुती करण्यासाठी जेव्हा ते सैन्याचे प्रमुख म्हणून निघाले तेव्हा ते म्हणाले: “याहवेहचे आभार माना, कारण त्यांचे प्रेम अनंतकाळ टिकते.”

  2. एज्रावंशातील एथानचा एक मासकील मी याहवेहच्या महान करुणामय प्रीतीचे सदासर्वदा गुणगान करेन; पिढ्यान् पिढ्या मी तुमच्या विश्वसनीयतेची माझ्या मुखाने साक्ष देईन.

  3. याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.

  4. इस्राएलने म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”

  5. अहरोनाच्या वंशजांनी म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”

  6. याहवेहचे भय धरणारे म्हणोत, “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”

  7. याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत, त्यांची करुणा सनातन आहे.

  8. देवाधिदेवाचे उपकारस्मरण करा, त्यांची करुणा सनातन आहे.

  9. प्रभूंच्या प्रभूचे आभार माना, त्यांची करुणा सनातन आहे.

  10. केवळ तेच असे महान चमत्कार करू शकतात, त्यांची करुणा सनातन आहे.

  11. ज्यांनी आपल्या बुद्धिसामर्थ्याने स्वर्गाची निर्मिती केली, त्यांची करुणा सनातन आहे.

  12. त्यांनी जलावर पृथ्वीचा विस्तार केला, त्यांची करुणा सनातन आहे.

  13. त्यांनी प्रचंड ज्योती निर्माण केल्या— त्यांची करुणा सनातन आहे.

  14. दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य, त्यांची करुणा सनातन आहे.

  15. रात्रीवरील प्रभुत्वासाठी चंद्र व तारे निर्माण केले; त्यांची करुणा सनातन आहे.

  16. त्यांनी इजिप्ती लोकांच्या प्रथम संतानास मारून टाकले, त्यांची करुणा सनातन आहे.

  17. त्यांनी इस्राएलास त्यांच्या तावडीतून सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे.

  18. ज्यांनी आपल्या सशक्त हातांनी व विस्तारलेल्या भुजांनी त्यांना सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे.

  19. तांबडा समुद्र दुभागला, त्यांची करुणा सनातन आहे.

  20. आणि इस्राएली लोकांना त्यामधून सुखरुपपणे पार नेले, त्यांची करुणा सनातन आहे.

  21. परंतु फारोह आणि त्याचे सैन्य तांबड्या समुद्रात बुडवून टाकले; त्यांची करुणा सनातन आहे.

  22. ज्यांनी आपल्या लोकांना अरण्यातून नेले, त्यांची करुणा सनातन आहे.

  23. ज्यांनी प्रबळ राजांचा नायनाट केला, त्यांची करुणा सनातन आहे.

  24. ज्यांनी प्रतापी राजांना ठार केले— त्यांची करुणा सनातन आहे.

  25. ज्यांनी अमोरी लोकांचा राजा सीहोन याला, त्यांची करुणा सनातन आहे.