Skip to content

Praise बद्दल बायबलमधील वचने: In heaven

40 वचने · 106 पैलू

In heaven बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. केवळ तुम्हीच एकटे याहवेह आहात. तुम्ही आकाश, अत्युच्च स्वर्ग व त्यातील सर्व तारकामंडल, पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे. तुम्ही सर्वांना जीवन देता आणि स्वर्गातील असंख्य सेना तुमची आराधना करतात.

  2. जेव्हा प्रभात तार्‍यांनी एकत्र गाणी गाईली आणि सर्व देवदूतांनी हर्षनाद केला तेव्हा तू कुठे होता?

  3. अहो प्रतापशाली स्वर्गदूतांनो, त्यांची आज्ञा अंमलात आणणारे, व त्यांच्या वचनाचे पालन करणारे, याहवेहचे स्तवन करा.

  4. अहो स्वर्गातील सर्व सैन्यहो, त्यांची इच्छापूर्ती करणारे त्यांचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा.

  5. त्यांचे सर्व स्वर्गदूत, त्यांचे स्तवन करो; त्यांची सर्व स्वर्गीय सेना, त्यांचे स्तवन करो.

  6. हे सर्वोच्च आकाशांनो, आणि आकाशाच्याही वरील जलांनो, त्यांचे स्तवन करा.

  7. आणि ते एकमेकांना म्हणत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वसमर्थ याहवेह आहेत; त्याच्या तेजाने सर्व पृथ्वी भरली आहे!”

  8. मग आत्म्याने मला वर उचलले आणि माझ्या पाठीमागून मोठ्या गर्जनेचा मी आवाज ऐकला, जेव्हा धन्य याहवेहचे वैभव आपल्या स्थानातून उठले.

  9. अचानक त्या दूताबरोबर स्वर्गदूतांचा एक मोठा समूह त्यांना दिसला, ते परमेश्वराची स्तुती करीत म्हणाले,

  10. “सर्वोच्च स्वर्गामध्ये परमेश्वराला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी झाली आहे, त्यांना शांती असो.”

  11. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की ज्या नव्याण्णव नीतिमान लोकांना पश्चात्तापाची गरज नाही, त्यांच्यापेक्षा पश्चात्ताप करणार्‍या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो.

  12. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चात्ताप करणार्‍या एका पाप्याबद्दल परमेश्वराच्या दूतांच्या समक्षतेत आनंद केला जातो.”

  13. आणि ज्या येशूंनी परमेश्वराची व त्यांच्या पित्याची सेवा करण्यासाठी आमची त्यांचे राज्य व याजक म्हणून निवड केली आहे, त्यांना सदासर्वकाळ गौरव व सामर्थ्य असो! आमेन.

  14. त्या चारही सजीव प्राण्यांना प्रत्येकाला सहा पंख होते. त्यांच्या पंखांभोवती आतून बाहेरून सर्वत्र डोळे होते. ते अहोरात्र अखंडपणे बोलत होते:

  15. जे राजासनावर बसलेले आहेत आणि जे युगानुयुग जिवंत आहेत, त्यांचा त्या सजीव प्राण्यांनी ज्या ज्यावेळी गौरव केला, त्यांना बहुमान दिला आणि त्यांची उपकारस्तुती केली,

  16. त्या त्यावेळी त्या चोवीस वडीलजनांनी त्या सर्वकाळ जिवंत असलेल्या परमेश्वरापुढे दंडवत घातले, त्यांची उपासना केली आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेऊन म्हटले:

  17. “हे आमच्या प्रभू आणि परमेश्वरा, गौरव, आदर, सामर्थ्य स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात; कारण तुम्ही सर्व निर्माण केले. तुमच्याच इच्छेने सर्वकाही अस्तित्वात आले.”

  18. ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द असे: “ती गुंडाळी घ्यावयास व त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, कारण तुमचा वध करण्यात आला होता आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी प्रत्येक वंश, भाषा, लोक व राष्ट्रे विकत घेतले आहे,

  19. तुम्ही त्या सर्वांना एक राज्य आणि आमच्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी याजक केले आहे; ते पृथ्वीवर राज्य करतील.”

  20. तेव्हा मी पाहिले हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांचे गीत ऐकू आले. ते राजासन, सजीव प्राणी व वडीलजनांच्या सभोवती उभे होते.

  21. ते मोठ्याने म्हणत होत: “ज्यांचा वध करण्यात आला होता, तो कोकरा सामर्थ्य, संपत्ती, सुज्ञता, बल, सन्मान, गौरव आणि उपकारस्तुती स्वीकारण्यास पात्र आहे!”

  22. मग स्वर्गातील, पृथ्वीवरील, पृथ्वीच्या खालील व समुद्रातील प्राण्यांना गाताना मी ऐकले. ते गात होते: “जे राजासनावर बसले आहेत, त्यांना व कोकर्‍याला उपकारस्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य

  23. तेव्हा ते चार सजीव प्राणी म्हणाले, “आमेन,” आणि त्या चोवीस वडीलजनांनी साष्टांग नमस्कार घालून आराधना केली.

  24. यानंतर मी पाहिले आणि सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यातील इतके लोक होते की त्यांचे मोजमाप करणे अशक्य होते. ते सर्व शुभ्र वस्त्रे घालून, हातात खजुरीच्या झावळ्या घेऊन, राजासनासमोर आणि कोकरासमोर उभे होते.

  25. ते प्रचंड आवाजात घोषणा करीत होते: “राजासनावर बसलेल्या आमच्या परमेश्वरापासून आणि कोकर्‍यापासून तारणप्राप्ती होत आहे.”