Praise बद्दल बायबलमधील वचने: All creation
All creation बद्दल वचने
याहवेहचे स्तवन करा. आकाशमंडलातून त्यांचे स्तवन करा; ऊर्ध्वलोकी त्यांचे स्तवन करा.
त्यांचे सर्व स्वर्गदूत, त्यांचे स्तवन करो; त्यांची सर्व स्वर्गीय सेना, त्यांचे स्तवन करो.
सूर्य आणि चंद्रमा त्यांचे स्तवन करा; सर्व चमकत्या तारकांनो, त्यांचे स्तवन करा.
हे सर्वोच्च आकाशांनो, आणि आकाशाच्याही वरील जलांनो, त्यांचे स्तवन करा.
त्यांची निर्मिती याहवेहचे स्तवन करो, कारण त्यांनी आज्ञा दिली आणि ती अस्तित्वात आली.
आणि त्यांनी त्यांची स्थापना सदासर्वकाळासाठी केली आहे— त्यांची राजाज्ञा कधीही रद्द केली जाणार नाही.
पृथ्वीवर याहवेहचेच स्तवन होवो, खोल महासागर व त्यातील समस्त विशालकाय प्राण्यांनो,
विजा व गारा, हिम व धुके, तसेच वादळी वारे, त्यांचे स्तवन करोत.
अहो पर्वतांनो व सर्व टेकड्यांनो, फळझाडे व समस्त गंधसरू,
हिंस्र पशू आणि सर्व गुरे, सूक्ष्म जीव व उडणारे पक्षी,
प्रत्येक सजीव प्राणी याहवेहचे स्तवन करो. याहवेहचे स्तवन करा.