Skip to content

Praise बद्दल बायबलमधील वचने

490 वचने · 106 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आता, हे आमच्या परमेश्वरा, आम्ही तुमचे उपकार मानतो, आणि तुमच्या वैभवी नावाची स्तुती करतो.

  2. रणशिंग वाजविणारे आणि संगीतकार याहवेहस्तव एकसुरात स्तुतिगान आणि आभारप्रदर्शन करण्यासाठी सहभागी झाले. कर्णे, झांजा आणि इतर वाद्यांसहित गायकांनी याहवेहची स्तुती करण्यासाठी त्यांचा आवाज उंचाविला व ते गाईले: “ते चांगले आहेत; त्यांचे प्रेम सर्वकाळ टिकते.” तेव्हा याहवेहचे मंदिर मेघांनी भरून गेले,

  3. जेव्हा सर्व इस्राएली लोकांनी पाहिले की, अग्नी खाली उतरत आहे आणि याहवेहचे गौरव मंदिराच्या वर आहे तेव्हा त्यांनी पदपथावर गुडघे टेकून त्यांची मुखे जमिनीकडे केली आणि आराधना केली आणि याहवेहना असे म्हणत धन्यवाद दिला, “ते चांगले आहेत; त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.”

  4. लोकांबरोबर सल्लामसलत केल्यावर, यहोशाफाटने पुरुषांची नियुक्ती केली, याहवेहची स्तुती गाण्यासाठी आणि त्यांच्या पवित्रतेच्या वैभवाबद्दल त्यांची स्तुती करण्यासाठी जेव्हा ते सैन्याचे प्रमुख म्हणून निघाले तेव्हा ते म्हणाले: “याहवेहचे आभार माना, कारण त्यांचे प्रेम अनंतकाळ टिकते.”

  5. राजा हिज्कीयाह आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी लेवींना दावीद आणि संदेष्टा आसाफ यांच्या शब्दांमध्ये याहवेहची स्तुती करण्याचा आदेश दिला. म्हणून त्यांनी आनंदाने स्तुतिगीते गायली आणि खाली वाकून आराधना केली.

  6. यरुशलेममध्ये जे इस्राएली लोक उपस्थित होते, त्यांनी बेखमीर भाकरीचा सण सात दिवस मोठ्या आनंदात साजरा केला, तर लेवीय लोकांनी आणि याजकांनी याहवेहना समर्पित केलेल्या प्रतिध्वनीच्या वाद्यांसहित दररोज याहवेहची स्तुती केली.

  7. बांधकाम करणार्‍यांनी याहवेहच्या मंदिराच्या पायाचे बांधकाम पूर्ण केले, तेव्हा याजकांनी आपले याजकीय पोशाख घातले व आपल्या तुतार्‍या वाजविल्या. आसाफाच्या वंशातील लेव्यांनी आपल्या झांजा वाजविल्या. इस्राएलच्या दावीद राजाने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे त्यांनी याहवेहची स्तुती केली.

  8. त्यांनी स्तुतिगान गाईले व पुढील गीत गाऊन याहवेहची उपकारस्तुती केली: “याहवेह चांगले आहेत. इस्राएलावरील त्यांची प्रीती व दया सर्वकाळ टिकणारी आहेत.” याहवेहच्या मंदिराचा पाया घातल्याबद्दल, त्यांनी मोठ्याने जयघोष करीत याहवेहची स्तुती केली.

  9. नंतर एज्राने महान परमेश्वर याहवेहची स्तुती केली आणि सर्व लोक आपले हात उंचाऊन उत्तरले “आमेन! आमेन!” आपली मस्तके लववून, भूमीकडे मुखे करून त्यांनी याहवेहची आराधना केली.

  10. मग लेवी—येशूआ, कदमीएल, बानी, हशबन्याह, शेरेब्याह, होदीयाह, शबन्याह व पथह्याह—हे लोकांना म्हणाले: “उभे राहा आणि याहवेह तुमच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते अनादि काळापासून शाश्वत परमेश्वर आहेत.” “तुमचे वैभवी नाव धन्य असो आणि ते सर्व प्रशंसा व स्तवनाच्या उच्चस्थानी राहो.

  11. केवळ तुम्हीच एकटे याहवेह आहात. तुम्ही आकाश, अत्युच्च स्वर्ग व त्यातील सर्व तारकामंडल, पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे. तुम्ही सर्वांना जीवन देता आणि स्वर्गातील असंख्य सेना तुमची आराधना करतात.

  12. त्यावेळी लेवीचे कुलप्रमुख—हशब्याह, शेरेब्याह, व कदमीएलचा पुत्र येशूआ व त्यांचे सहकारी. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आज्ञेप्रमाणे मंदिरात स्तवन व उपकारस्मरणाच्या वेळी त्यांचे कुलबांधव समोरासमोर उभे राहून एकमेकांना प्रतिसाद देत असत.

  13. ज्या कृत्यांबद्दल लोकांनी गीते गाऊन स्तुती केली, ती त्यांची कृत्ये आठवून त्यांची प्रशंसा कर.

  14. जेव्हा प्रभात तार्‍यांनी एकत्र गाणी गाईली आणि सर्व देवदूतांनी हर्षनाद केला तेव्हा तू कुठे होता?

  15. याहवेहच्या न्यायीपणाबद्दल मी ॠणी राहीन. परमोच्च याहवेहच्या नावाची मी स्तुतिस्तोत्रे गाईन.

  16. लेकरे आणि तान्ह्या बालकांच्या स्तुतीद्वारे तुमचे शत्रू व विरोध्यांना शांत करण्यासाठी शत्रूविरुद्ध बळ स्थापित केले आहे.

  17. संगीत दिग्दर्शकासाठी; मूथ लब्बेन रागावर आधारित दावीदाचे स्तोत्र. याहवेह, मी माझ्या संपूर्ण मनापासून तुमचे आभार मानेन; मी तुमच्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.

  18. सीयोनच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या याहवेहची स्तुतिस्तोत्रे गा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रांमध्ये जाहीर करा.

  19. मग मी सीयोनकन्येच्या वेशींवर तुमची स्तुतीची घोषणा करेन, आणि तुमच्या तारणात आनंद करेन.

  20. मी याहवेहची स्तुती करणार, ज्यांनी माझे मार्गदर्शन केले आहे; रात्रीच्या समयी माझे अंतःकरण मला बोध करते.

  21. स्तुतीस योग्य याहवेहचा मी धावा केला, आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली.

  22. याहवेह जिवंत आहेत! माझ्या खडकाची स्तुती असो! परमेश्वर माझा तारणारा सर्वोच्च असो!

  23. याहवेह, तुम्ही आपल्या शक्तीने उंचविले जावो; आम्ही तुमच्या सामर्थ्याचे गुणगान व स्तुतिगान करू.

  24. मी तुमचे नाव माझ्या लोकांसमोर जाहीर करेन; मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन करेन.

  25. जे याहवेहचे भय बाळगतात, ते तुम्ही त्यांची स्तुती करा! याकोब वंशजहो, त्यांचा सन्मान करा! इस्राएलचे वंशजहो, त्यांचा आदर करा.