मुख्य मजकुरावर जा

Praise बद्दल बायबलमधील वचने

490 वचने · 106 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत, सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत.

  2. राष्ट्रे हर्ष करोत आणि आनंदाने जयघोष करोत, कारण तुम्ही न्यायाने लोकांचा न्यायनिवाडा कराल आणि पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवाल. सेला

  3. परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या नावाचे स्तवन करा, जे मेघांवर स्वार होतात, त्यांची महिमा करा; त्यांचे नाव याहवेह आहे—त्यांच्या समक्षतेत हर्ष करा.

  4. परमेश्वर, आमचे प्रभू, आमच्या तारकाचे स्तवन होवो, ते दररोज आमची ओझी वाहतात. सेला

  5. महासभेत परमेश्वराची स्तुती करोत; इस्राएलाच्या सभेत याहवेहची स्तुती करोत.

  6. पृथ्वीवरील राष्ट्रांनो, परमेश्वराचे गुणगान गा, प्रभूचे स्तवन करा, सेला

  7. अनादि काळापासून अत्युच्च आकाशात स्वारी करतात, ज्यांचा प्रचंड आवाज ढगांच्या गर्जनांसारखा आहे.

  8. परमेश्वराच्या सामर्थ्याची घोषणा करा; त्यांचे ऐश्वर्य इस्राएलवर प्रकाशित आहे; त्यांचे महान सामर्थ्य आकाशात आहे.

  9. मी परमेश्वराची स्तुती गीत गाऊन करेन आणि उपकारस्तुती करून त्यांचे गौरव करेन.

  10. हे आकाशा, अगे पृथ्वी, हे समुद्रा, अहो समुद्रात संचार करणाऱ्या सर्व प्राण्यांनो, त्यांचे स्तवन करा,

  11. परंतु जे सर्व तुमचा शोध घेतात ते तुमच्यामध्ये आनंद आणि हर्ष करोत; जे तुमच्या तारणाच्या साहाय्याची अपेक्षा बाळगतात ते सर्व नेहमी हेच म्हणोत, “परमेश्वर किती महान आहेत!”

  12. जन्मापासूनच मी तुमच्यावर अवलंबून आहे; तुम्ही मला माझ्या आईच्या गर्भातून बाहेर आणले. मी सर्वकाळ तुमची स्तुती करेन.

  13. अनेक लोकांसाठी मी एक उदाहरण झालो आहे; तुम्ही माझे प्रबळ शरणस्थान आहात.

  14. माझे मुख तुमच्या स्तुतीने भरलेले असते, दिवसभर तुमच्या वैभवाची घोषणा करतो.

  15. परंतु मी तर निरंतर आशा करीतच राहणार; मी तुमची अधिकाधिक स्तुती करेन.

  16. जरी मला त्यांचे वर्णन करण्याची क्षमता नाही तरी दिवसभर माझे मुख तुमच्या न्यायीपणाच्या— आणि तारणाच्या कृत्यांबद्दल घोषणा करेल.

  17. माझ्या परमेश्वरा, मी सतारीवर तुमच्या विश्वासूपणाबद्दल तुमचे स्तवन करेन; हे इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरा, मी वीणेवर तुमची स्तुती गाईन.

  18. संगीत दिग्दर्शकासाठी. अल्तश्केथ या चालीवर आधारित. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत हे परमेश्वरा, आम्ही तुमची उपकारस्तुती करतो, तुमची उपकारस्तुती करतो, कारण तुमचे नाव समीप आहे; लोक तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करतात.

  19. मग आम्ही तुमचे लोक, तुमच्या कळपातील मेंढराप्रमाणे असलेले, सदासर्वकाळ तुमचा धन्यवाद करू; एका पिढीपासून अनेक पिढ्यांपर्यंत, आम्ही तुमचे उपकारस्मरण करीत राहू.

  20. संगीत निर्देशकाकरिता. “गित्तीथ” वर आधारित. आसाफाची रचना. परमेश्वर, जे आमचे सामर्थ्य आहेत, त्यांच्यासाठी हर्षाने गा; याकोबाच्या परमेश्वरासाठी जयघोष करा!

  21. जे तुमच्या मंदिरात राहू शकतात, ते किती धन्य आहेत; ते निरंतर तुमचे स्तवन करतात. सेला

  22. माझ्या प्रभू परमेश्वरा, मी माझ्या संपूर्ण हृदयाने तुमचे स्तवन करेन; मी तुमच्या नामाला सदासर्वकाळ गौरव देईन.

  23. एज्रावंशातील एथानचा एक मासकील मी याहवेहच्या महान करुणामय प्रीतीचे सदासर्वदा गुणगान करेन; पिढ्यान् पिढ्या मी तुमच्या विश्वसनीयतेची माझ्या मुखाने साक्ष देईन.

  24. याहवेह, सारे गगनमंडळ तुमच्या अद्भुत चमत्कारांची स्तुती करीत आहे. भक्तांच्या सभेत तुमच्या विश्वसनीय पावित्र्याचेही गुणगान केले जाते.

  25. याहवेहचे सदासर्वकाळ स्तवन होवो!