Skip to content

Praise बद्दल बायबलमधील वचने

490 वचने · 106 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एक स्तोत्र. एक गीत. शब्बाथ दिवसासाठी निर्धारित. याहवेहची स्तुती गाणे, आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे.

  2. प्रातःकाळी तुमच्या करुणामय प्रीतीची, आणि सायंकाळी तुमच्या विश्वसनीयतेची घोषणा,

  3. दशतंत्री सारंगीच्या संगीताद्वारे, आणि वीणेच्या तालावर गायन-वादन करीत आहे.

  4. या हो या, आपण याहवेहचा जयजयकार करू या; आपल्या तारणाच्या खडकासाठी आनंदाने जयघोष करू या.

  5. कृतज्ञ अंतःकरणांनी त्यांच्यापुढे येऊ; आणि वाद्यसंगीतासह स्तुतिस्तोत्रे गाऊन स्तवन करू.

  6. या हो या, आपण नतमस्तक होऊन आराधना करू या, आपले उत्पन्नकर्ता याहवेह, यांच्यापुढे गुडघे टेकू;

  7. कारण ते आपले परमेश्वर आहेत. आपण त्यांच्या कुरणातील प्रजा आणि त्यांचा संरक्षित मेंढरांचा कळप आहोत. आज जर तुम्ही त्यांची वाणी ऐकली, तर किती बरे!

  8. याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा; हे सर्व पृथ्वी, याहवेहला समर्पित गीत गा.

  9. याहवेहसाठी स्तुतिस्तोत्रे गा; त्यांच्या नावाचा महिमा करा; दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा.

  10. सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा.

  11. कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत; सर्व दैवतांपेक्षा त्यांचे भय बाळगणे यथायोग्य आहे.

  12. राजवैभव आणि ऐश्वर्य त्यांच्या पुढे चालतात. त्यांच्या उपस्थितीत सामर्थ्य आणि महिमा असतो.

  13. अहो राष्ट्रातील सर्व कुळांनो याहवेहला गौरव द्या, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.

  14. याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या; अर्पणे आणून त्यांच्या समक्षतेत या.

  15. त्यांच्या पवित्रतेच्या ऐश्वर्याने याहवेहची उपासना करा; त्यांच्या उपस्थितीत हे पृथ्वी कंपित हो!

  16. सर्व नीतिमान, याहवेहच्या ठायी आनंद करा, आणि त्यांच्या पवित्र नावाला गौरव द्या.

  17. अगे पृथ्वी, याहवेहकरिता अत्यानंदाने हर्षोल्लास कर, संगीतासह उचंबळून हर्षगीत गा;

  18. वीणेवरील संगीताच्या साथीने याहवेहचे स्तवन करा, वीणेच्या तालात आणि गीतांच्या सुरात गा,

  19. शिंगे आणि कर्णे हर्षनादाचा गजर करोत— याहवेह जे राजा आहेत, यांच्यापुढे आनंदाचा जयघोष करा.

  20. राष्ट्रे तुमच्या थोर व भयावह नामाची स्तुती करोत— याहवेह पवित्र आहेत.

  21. आपले परमेश्वर याहवेहची थोरवी गा, व त्यांच्या चरणी आराधना करा; याहवेह पवित्र आहेत.

  22. आपल्या परमेश्वराची थोरवी गा, आणि त्यांच्या पवित्र पर्वतावर उपासना करा, कारण आपले परमेश्वर याहवेह पवित्र आहेत.

  23. एक स्तोत्र. उपकारस्तुतीचे गीत हे समस्त पृथ्वी, याहवेहसाठी जयघोष कर.

  24. आनंदाने याहवेहची आराधना करा; हर्षगीतांसह त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करा.

  25. याहवेह हेच परमेश्वर आहेत, हे जाणून घ्या. ते आपले निर्माणकर्ते आहेत व तेच आपले स्वामी आहेत; आपण त्यांचे लोक, त्यांच्या कुरणातील मेंढराप्रमाणे आहोत.