मुख्य मजकुरावर जा

Praise बद्दल बायबलमधील वचने

490 वचने · 106 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत.

  2. याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत.

  3. लोकांच्या सभेत त्यांनी जाहीरपणे परमेश्वराचा जयजयकार करावा, आणि पुढार्‍यांच्या सभेत त्यांची महिमा गावी.

  4. एक गीत. दावीदाचे एक स्तोत्र. हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे; मी पूर्ण अंतःकरणाने गायन आणि वादन करेन.

  5. अगे सारंगी आणि वीणे, जागृत व्हा! मी प्रातःकाळाला जागृत करेन.

  6. हे याहवेह, प्रत्येक राष्ट्रात मी तुमची स्तुती करेन, मी सर्व लोकात तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.

  7. परंतु माझ्या मुखाने मी याहवेहचा सन्मान करेन, उपासकांच्या विशाल समुदायासमोर त्यांचे स्तवन करेन.

  8. याहवेहचे स्तवन होवो. जिथे नीतिमान एकत्र येऊन सभा आयोजित करतात, तिथे मी संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहचे स्तवन करेन.

  9. याहवेहचे भय सुज्ञानाचा प्रारंभ होय; त्यांच्या नियमाचे पालन करणार्‍यांना उत्तम आकलन शक्ती प्राप्त होते. याहवेहची सदासर्वकाळ स्तुती होवो.

  10. याहवेहचे स्तवन करा. हे याहवेहच्या सेवकांनो, याहवेहचे स्तवन करा; याहवेहच्या नावाची स्तुती करा.

  11. याहवेहच्या नामाचे स्तवन होत राहो, आता आणि सदासर्वकाळ.

  12. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, याहवेहच्या नामाचे स्तवन होवो.

  13. परंतु आम्हीच याहवेहची स्तोत्रे गातो, आता आणि सदासर्वकाळ. याहवेहचे स्तवन करा.

  14. परंतु याहवेहचे माझ्यावरील सर्व उपकार, मी कसे फेडणार?

  15. मी तारणाचा प्याला उंच करून, याहवेहच्या नावाचा धावा करेन.

  16. मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.

  17. मी तुम्हाला उपकारस्तुतीचे अर्पण करेन, आणि याहवेहच्या नामाचा धावा करेन.

  18. मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.

  19. यरुशलेमात, तुमच्यासमक्ष याहवेहच्या या मंदिराच्या अंगणात ते पूर्ण करेन. याहवेहचे स्तवन करा.

  20. अहो सर्व राष्ट्रांनो, याहवेहची स्तुती करा; अहो सर्व लोकांनो, त्यांचे गौरव करा.

  21. कारण ते आमच्यावर परम प्रीती करतात; आणि याहवेहची विश्वसनीयता सर्वकाळ टिकते. याहवेहचे स्तवन करा.

  22. याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.

  23. इस्राएलने म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”

  24. अहरोनाच्या वंशजांनी म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”

  25. याहवेहचे भय धरणारे म्हणोत, “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”