Skip to content

Praise बद्दल बायबलमधील वचने

490 वचने · 106 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नीतिमान लोकांच्या घरातून आनंदाच्या व विजयाच्या गीतांचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत: “याहवेहच्या उजव्या भुजाने सामर्थ्यवान कृत्ये केली आहेत!

  2. माझ्यासाठी नीतिमत्वाची दारे उघडू द्या; मी आत प्रवेश करून याहवेहचे उपकारस्मरण करेन.

  3. याहवेहची दारे हीच आहेत; याच दारातून नीतिमान प्रवेश करतात.

  4. मी तुम्हाला धन्यवाद देईन, कारण तुम्ही माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले; तुम्ही माझे तारण झाला आहात.

  5. तुम्हीच माझे परमेश्वर आहात आणि मी तुमचे स्तवन करेन; तुम्हीच माझे परमेश्वर आहात, मी तुमचे स्तुतिगान करेन.

  6. याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.

  7. जेव्हा मी तुमच्या सर्व धार्मिक नियमांचे पालन करेन, तेव्हा सात्विक हृदयाने तुमचे उपकारस्मरण करेन.

  8. मी मध्यरात्रीही उठून तुमच्या नीतियुक्त नियमांबद्दल तुमची उपकारस्तुती करेन.

  9. याहवेह, माझ्या मुखातून निघालेल्या स्वैच्छिक स्तवनाचा स्वीकार करा, आणि तुमचे नियम मला शिकवा.

  10. तुमच्या नीतियुक्त नियमांबद्दल दिवसातून सात वेळा मी तुमचे स्तवन करतो.

  11. माझे ओठ भरभरून तुमचे स्तवन करो, कारण तुम्ही मला तुमचे विधी शिकविले आहेत.

  12. माझी जीभ तुमच्या वचनांची स्तुतिगीते गाओ, कारण तुमचे सर्व नियम नीतियुक्त आहेत.

  13. मला आयुष्यमान करा, जेणेकरून मी तुझी स्तुती करेन, आणि तुमचे नियम माझी जोपासना करोत.

  14. याहवेह धन्यवादित असोत; त्यांनी आम्हाला शत्रूंचे भक्ष्य होऊ दिले नाही.

  15. प्रवाशांचे आराधना गीत. अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा. तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता.

  16. पवित्रस्थानात तुम्ही आपले हात उंच करा आणि याहवेहचे स्तवन करा.

  17. याहवेहचे स्तवन करा. याहवेहच्या नामाचे स्तवन करा; तुम्ही, जे याहवेहचे सेवक आहात, ते सर्व याहवेहचे स्तवन करोत.

  18. व तुम्हीही, जे याहवेहच्या आवासात, आमच्या परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात सेवा करतात.

  19. याहवेहचे स्तवन करा, कारण ते चांगले आहेत; त्यांच्या नावाचा महिमा गा, कारण ते करणे मनोरम आहे.

  20. हे संपूर्ण इस्राएला, याहवेहचे स्तवन कर; अहो अहरोनाच्या वंशजांनो, याहवेहचे स्तवन करा.

  21. अहो, लेवीच्या वंशजांनो, याहवेहचे स्तवन करा; त्यांचे भय धरणार्‍या लोकांनो, याहवेहचे स्तवन करा.

  22. सीयोनातून याहवेहचे स्तवन होवो, अहो यरुशलेमातील सर्व रहिवाशांनो, याहवेहचे स्तवन करा. याहवेहचे स्तवन करा.

  23. याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत, त्यांची करुणा सनातन आहे.

  24. देवाधिदेवाचे उपकारस्मरण करा, त्यांची करुणा सनातन आहे.

  25. प्रभूंच्या प्रभूचे आभार माना, त्यांची करुणा सनातन आहे.