Skip to content

Paul बद्दल बायबलमधील वचने

619 वचने · 103 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तरी शौल अधिक सामर्थ्यवान होत गेला आणि येशू हेच ख्रिस्त आहेत असे सिद्ध करून दिमिष्कमध्ये राहणार्‍या यहूद्यांस त्याने निरुत्तर केले.

  2. यानंतर पुष्कळ दिवस झाल्यावर, यहूद्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला,

  3. परंतु शौलाला त्यांची योजना समजली. त्याला मारून टाकण्यासाठी रात्रंदिवस ते शहराच्या द्वारावर नजर ठेऊन होते.

  4. परंतु त्याच्या अनुयायांनी त्याला रात्रीच नेऊन टोपलीत बसविले आणि शहराच्या भिंतीतील झरोक्यातून खाली उतरविले.

  5. तो यरुशलेममध्ये आल्यावर, येशूंच्या शिष्यांबरोबर सामील होण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु त्या सर्वांना त्याचे भय वाटत होते, कारण तो खरोखर शिष्य आहे, या गोष्‍टीवर त्यांचा विश्वास नव्हता.

  6. परंतु बर्णबाने त्याला प्रेषितांपुढे आणले आणि कशाप्रकारे दिमिष्क रस्त्यावर शौलाला प्रभूचे दर्शन झाले आणि प्रभूने त्याला काय सांगितले आणि दिमिष्क येथे त्याने निर्भयपणाने येशूंच्या नावामध्ये शुभवार्ता कशी सांगितली, हे सर्व त्यांना कथन केले.

  7. शौल त्यांच्याबरोबर तिथे राहिला व यरुशलेममध्ये मोकळेपणाने फिरू लागला, प्रभूच्या नावामध्ये धैर्याने बोलू लागला.

  8. तो ग्रीक यहूद्यांशी बोलत असे व वादविवाद करीत असे, परंतु त्यांनी त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला.

  9. जेव्हा इतर विश्वासणार्‍यांनी यासंबंधी ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला कैसरीयास नेले आणि नंतर तिथून तार्सस येथे त्याची रवानगी केली.

  10. त्यानंतर शौलाचा शोध घेण्यासाठी बर्णबा पुढे तार्ससला गेला,

  11. जेव्हा तो त्याला भेटला, त्याने त्याला अंत्युखिया येथे आणले. बर्णबा व शौल दोघेही वर्षभर मंडळ्यांमध्ये अनेक लोकांना भेटून शिक्षण देत राहिले. अंत्युखिया मध्येच शिष्यांना ख्रिस्ती हे नाव प्रथम मिळाले.

  12. याकाळात काही संदेष्टे यरुशलेमकडून खाली अंत्युखियास आले.

  13. त्यांच्यामधील अगब नावाचा एकजण उभा राहिला आणि आत्म्याच्या साहाय्याने त्याने असे भविष्य सांगितले की, सर्व रोमी साम्राज्यात मोठा दुष्काळ पडणार आहे. (क्लौडियसच्या कारकिर्दीत हे झाले.)

  14. तेव्हा शिष्यांनी असे ठरविले की, प्रत्येकांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे यहूदीयामध्ये राहणार्‍या बंधू भगिनींना मदत करावी.

  15. त्याप्रमाणे त्यांनी केले, त्यांच्या देणग्या तेथील वडीलमंडळींना पाठविण्यासाठी त्यांनी शौल व बर्णबाच्या स्वाधीन केल्या.

  16. जेव्हा बर्णबा आणि शौल यांनी यरुशलेममधील त्यांचे सेवाकार्य पूर्ण केले, तेव्हा योहान ज्याला मार्क असेही म्हणत त्याला त्यांच्याबरोबर घेऊन ते परत आले.

  17. हे सर्वजण प्रभूची आराधना आणि उपास करीत असताना, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौल यांना ज्या कामासाठी मी पाचारण केले आहे त्यासाठी त्यांना वेगळे करा.”

  18. तेव्हा उपास आणि प्रार्थना केल्यावर त्यांनी आपले हात त्यांच्यावर ठेवले व त्यांना निरोप दिला.

  19. पवित्र आत्म्याने त्या दोघांना त्यांच्या मार्गावर पाठविले, ते खाली सलुकीयाला गेले आणि तारवात बसून सायप्रस बेटावर उतरले.

  20. सलमीस या शहरात आल्यानंतर, ते यहूदी लोकांच्या सभागृहांमध्ये गेले व त्यांनी परमेश्वराचे वचन जाहीर केले. योहान त्यांच्याबरोबर मदतनीस म्हणून गेला होता.

  21. त्या संपूर्ण बेटावर प्रवास करीत ते पाफोस येथे जाऊन पोहोचले. तिथे त्यांना यहूदी बार-येशू नावाचा जादूगार व खोटा संदेष्टे भेटला.

  22. सेर्गियोस पौलुस नावाच्या राज्यपालाचा तो एक सेवक होता. सेर्गियोस पौलुस हा बुद्धिमान व ज्ञानी मनुष्य होता. या राज्यपालाने बर्णबा व शौलना बोलाविले, कारण परमेश्वराचे वचन ऐकण्याची त्याची इच्छा होती.

  23. परंतु अलीम जादूगार (असा त्याच्या नावाचा अर्थ आहे) त्याने त्यांना विरोध केला आणि विश्वास ठेवण्यापासून राज्यपालाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केला.

  24. मग पवित्र आत्म्याने भरलेला शौल, ज्याला पौल देखील म्हणत असत, त्याने अलीमाकडे रोखून पाहात म्हटले,

  25. “तू सैतानाचा पुत्र आहेस आणि सर्व चांगुलपणाचा वैरी आहेस! तू सर्वप्रकारच्या कपटाने व चातुर्याने भरलेला आहेस. प्रभूच्या चांगल्या मार्गाला भ्रष्ट करण्याचे तू कधीच सोडणार नाहीस काय?