Paul बद्दल बायबलमधील वचने: Thwarted by his nephew
Thwarted by his nephew बद्दल वचने
परंतु पौलाच्या बहिणीच्या मुलाला त्यांचा हा कट समजला, तेव्हा बराकीत जाऊन त्याने पौलाला तसे कळविले.
तेव्हा पौलाने शताधिपतींपैकी एकाला बोलाविले व त्याला म्हणाला, “या तरुणाला सेनापतीकडे ने; या तरुणाला काहीतरी सांगावयाचे आहे.”
म्हणून त्याला सेनापतीकडे नेले. शताधिपती म्हणाला, “बंदिवान पौलाने, या मुलाला आपणास काही महत्त्वाचे सांगावयाचे आहे म्हणून आपणाकडे आणावे, अशी विनंती केली.”
तेव्हा सेनापतीने त्या तरुण मुलाचा हात धरून त्यास बाजूला नेऊन विचारले, “तुला मला काय सांगावयाचे आहे?”
तो म्हणाला: “पौलाकडून आणखी अधिक माहिती हवी आहे असे निमित्त सांगून उद्या आपण त्याला न्यायसभेपुढे आणावे, अशी विनंती काही यहूदी आपल्याला करणार आहेत.
परंतु आपण त्याकडे कृपया लक्ष देऊ नका, कारण चाळिसांहून अधिक जण त्याला ठार करण्यासाठी वाटेवर टपून बसलेली आहेत. त्याचा वध करेपर्यंत अन्न आणि पाणी सेवन करावयाचे नाही असा त्यांनी निर्णय घेतला आहे व आपण त्यांची विनंती मान्य कराल, ही त्यांची आशा आहे.”
तेव्हा सेनापतीने, “तू मला हे सांगितले आहेस हे कोणालाही कळू देऊ नकोस.” असा इशारा देऊन त्या तरुणाला पाठवून दिले.