Paul बद्दल बायबलमधील वचने: Visits Troas; preaches until break of day; restores to life the young man who fell from the window
Visits Troas; preaches until break of day; restores to life the young man who fell from the window बद्दल वचने
परंतु आम्ही बेखमीर भाकरीच्या सणानंतर फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसानंतर त्रोवास येथे एकत्रित जमलो. तिथे आम्ही सात दिवसांचा मुक्काम केला.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही भाकर मोडण्याकरिता एकत्रित आलो. पौल लोकांबरोबर बोलला आणि दुसर्या दिवशी तो जाणार होता, म्हणून मध्यरात्र होईपर्यंत बोलतच राहिला.
वरच्या मजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमलो होतो, तिथे पुष्कळ दिव्यांचा प्रकाश होता.
तेव्हा पौल बोलत राहिल्यामुळे युतुख नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असता, त्याला गुंगी येऊन गाढ झोप लागली. तो गाढ झोपेत असताना, तिसर्या मजल्यावरून खाली जमिनीवर पडला आणि त्यास उचलले तेव्हा तो मरण पावला आहे असे दिसून आले.
तेव्हा पौल खाली गेला आणि त्या तरुणावर पाखर घालून आपल्या हाताने कवटाळले व म्हणाला, “भयभीत होऊ नका, तो जिवंत आहे!”
मग तो पुन्हा वरच्या मजल्यावर गेला आणि त्याने भाकर मोडून खाल्ली. पहाट होईपर्यंत बोलत राहिल्यावर तो रवाना झाला.
लोक त्या तरुणाला जिवंत घरी घेऊन आले म्हणून त्यांना अतिशय समाधान वाटले.