मुख्य मजकुरावर जा

Paul बद्दल बायबलमधील वचने: Is confined in the castle

7 वचने · 103 पैलू

Is confined in the castle बद्दल वचने

  1. तेव्हा सेनापतीने पौलाला आत बराकीत आणण्याची आज्ञा केली. लोक त्याच्यावर इतके का ओरडत आहेत, हे समजावे म्हणून त्याने फटके मारून त्याची चौकशी करण्यास सांगितले.

  2. जेव्हा ते पौलाला फटके मारण्यासाठी बांधत होते त्यावेळेस पौल तिथे उभा असलेल्या शताधिपतीला म्हणाला, “ज्या मनुष्यावर दोषारोप अजून सिद्ध झालेला नाही, अशा रोमी नागरिकाला फटके मारणे हे कायद्याने योग्य आहे का?”

  3. ते ऐकल्याबरोबर तो अधिकारी शताधिपती सेनापतीकडे गेला व म्हणाला, “आपण काय करत आहात? हा मनुष्य तर रोमी नागरिक आहे.”

  4. तेव्हा तो सेनापती पौलाकडे गेला आणि त्याने त्याला विचारले, “मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?” त्याने उत्तर दिले. “होय, मी आहे.”

  5. त्यावर तो सेनापती बोलला, “मला नागरिकत्व मिळण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागले.” “परंतु मी जन्मतःच रोमी नागरिक आहे,” पौलाने उत्तर दिले.

  6. यामुळे जे त्याला प्रश्न विचारून त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ निघून गेले. सेनापतीला जेव्हा समजले की, पौल एक रोमी नागरिक आहे आणि त्याचा आरोप सिद्ध होण्यापूर्वी त्याला साखळदंडानी बांधले गेले होते, तो फार घाबरून गेला.

  7. सेनापतीला हे शोधून काढायचे होते की, खरोखर कोणत्या कारणाने यहूदी लोक पौलाला आरोपी ठरवीत आहेत. म्हणून त्याने दुसर्‍या दिवशी पौलाला मुक्त केले आणि मुख्य याजक व सर्व न्यायसभेचे सभासद यांना एकत्र होण्याचा हुकूम केला. त्यांनी पौलाला न्यायसभेपुढे आणून उभे केले.